हार्दिक आभार
विद्याप्रवेश संबंधी महत्वाची माहिती –
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयानुसार विद्याप्रवेश या उपक्रमाची निर्मिती झाली असली तरी संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ही शालेय पूर्वतयारी योजना आहे.
‘विद्याप्रवेश’ हा उपक्रम ‘खेळत खेळत शिक’ या तत्वावर आधारित आहे.
इयत्ता पहिली ते तिसरीसाठी ‘विद्याप्रवेश’ हा उपक्रम असेल.
कालावधी – 72 दिवस किंवा 12 आठवडे
विद्याप्रवेश – काय? व कशासाठी?
> राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयाप्रमाणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्याच्या अथवा बारा आठवड्यांच्या ‘खेळत खेळत शिक’ या तत्वांवर आधारित ‘विद्याप्रवेश’ या शालेय पूर्वतयारी उपक्रमाची शिफारस करण्यात आली आहे.
> कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांचे शाळेमध्ये स्वागत करणे व अध्ययन प्रक्रियेशी त्यांची पुनर्जोडणी करण्याची संधी इथे आपल्याला मिळत आहे.
> सर्व मुलांना घर व शाळेमध्ये आनंदी, आपुलकीचे, सुरक्षित व अध्ययनपूरक वातावरण निर्माण करण्यामध्ये विद्याप्रवेश उपक्रम खूपच मार्गदर्शक ठरतो.
> मुलांना तणावमुक्त वातावरणात शिकण्याची संधी देण्याबरोबरच दिव्यांगांच्या गरजा ओळखण्याकडेही येथे लक्ष देण्यात आले आहे. मुलांची मातृभाषा आणि घरच्या भाषेचा स्वीकार करण्याबरोबरच अन्य भाषेच्या अध्ययनाला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच सांकेतिक भाषेलाही महत्व दिले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयानुसार विद्याप्रवेशची निर्मिती झाली असली तरी संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ही शालेय पूर्वतयारी योजना आहे.
इयत्ता पाहिलीच्या मुलांना बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तयार करणारी चौकट आपल्याला याद्वारे मिळते.
मुलाच्या मुक्त अध्ययनाला मानसिक विकासाच्या टप्प्याकडून शैक्षणिक मनोवैज्ञानिक टप्याकडे घेऊन जाणाऱ्या कृतींची रचना करण्याची संधी यामुळे मिळते.
नियोजित अध्ययन प्रक्रियेमध्ये अध्ययनासाठी दिलेला वेळ आणि त्याचा सदुपयोग करण्यासाठी दिलेल्या दिवसवार आणि आठवडावर कृतींचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे.
1.2 विद्याप्रवेश- काय? व कशासाठी?
1.3 विद्याप्रवेश – महत्व
1.4 विद्याप्रवेश व्याप्ती
1.5 विद्याप्रवेश उदेश
1.6 विद्याप्रवेशन- अध्यापन तत्व
1.7 नियोजन आणि व्यवस्थापन
1.8 विद्यार्थ्यांची प्रगती आणि नियमावली
1.9 विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत पालक आणि समाजाचा सहभाग
1.10 नमुना वेळापत्रक
2.1 विद्याप्रवेश- विकासात्मक ध्येयाधारित सामर्थ्य आणि अध्ययन निष्पत्ती
2.1.1 विकासात्मक ध्येय-1 उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखण्यात मुले सक्षम होतात. (HW)
2.1.2 विकासात्मक ध्येय-1, मुख्य सामर्थ्य
2.2 विकासात्मक ध्येय-1. अध्ययन निष्पत्ती
2.2 .1 विकासात्मक ध्येय-2, मुले प्रभावी संवादक बनतात. (EC) विकासात्मक ध्येय-2, मुख्य घटकांश
2.2 .2 विकासात्मक ध्येय-2, मुख्य सामर्थ्य
2.2 .3 विकासात्मक ध्येय-2, अध्ययन निष्पत्ती
2.3 अभिवृद्धी ध्येय – 3 मुले सक्रीय अध्ययनार्थी बनून सभोवतालच्या बातावरणाशी जोडली जातात. (IL)
2.3.1 विकासात्मक ध्येय-3, मुख्य घटकांश
2.3.2 विकासात्मक ध्येय-3, मुख्य सामर्थ्ये
3.3.3 विकासात्मक ध्येय-3, अध्ययन निष्पत्ती
4.1 विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
4.2 मासिक मूल्यमापन मार्गसूची 1 ला महिना
4.3 मासिक मूल्यमापन मार्गसूची 2 रा महिना
4.4 मासिक मूल्यमापन मार्गसूची 3 रा महिना