विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 1
दिवस – 4 (गुरुवार)
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)
| • कृती : 1 • टाळ्या वाजवून आणि टीचकी वाजवून मुलांना वर्गात प्रवेश द्या. “गुडमॅनिंग, कसे आहात?” असे म्हणून मुलांना शुभेच्छा द्या. · आणि “गुडमनिंग टीचर” चा प्रचार करून मुलांना प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करा. आम्ही छान आहोत, धन्यवाद ! “. · जोपर्यंत मुले अभिवादनांना आत्मविश्वासाने प्रतिसाद देत नाहीत तोपर्यंत कृती कृती पुन्हा करा. | |
गुजगोष्टी (सकाळच्या सामुहिक कृती)
| कृती – क्लॅप आणि क्लॅप पद्धत: · मुलांना वर्तुळात उभे करा, · तालात टाळ्या वाजवण्याचा परिचय करून द्या. · हे काही वेळा पुन्हा करा. मग त्याच पद्धतीने, हळूहळू मुलांना तुमच्यासोबत करायला लावा. · नंतर सूचनेप्रमाणे त्याच लयामध्ये तुमचे नाव सांगा : “माझे नाव ………………” ( टाळ्या वाजवत ) • • मुलाला त्याच लयामध्ये त्याचे / तिच्या नावाचा परिचय करून करून देण्यासाठी त्याच पद्धतीचा वापर करण्यास सांगा. प्रत्येक मुलाला त्याच्या / तिच्या नावाचा परिचय करून करून देण्याची संधी द्या. | |
माझा वेळ (Free Indoor play) (‘माझा वेळ’ मध्ये मुले त्याच्या आवडीनुसार कृती करतील) | अंमलबजावणी पद्धत : मूल त्याच्या / तिच्या आवडीच्या अध्ययन कोपऱ्यात जाऊन दिलेली कृती लक्षपूर्वक करत आहे याची खात्री करून घेणे. * आवश्यक तेथे मुलाला योग्य मार्गदर्शन करणे. * आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेकडे लक्ष देणे.
* दिव्यांग मुलांना कोपऱ्यात जाण्यासाठी तसेच कृती सहजपणे पूर्ण करण्यासाठी मदत करणे. * कृतीचे साहित्य वापरताना मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे. (तोंडात रंग टाकणे, … फेकणे.. इत्यादी.
* मुलाच्या आधीच्या दिवशीच्या अपूर्ण असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे. * शिक्षकांनी मुलाची आवड आणि सर्जनशीलता लक्षात घेवून, प्रशंसा करून आवश्यक तिथे प्रेरणा देणे. * दिलेली कृती आणि साहित्य वापरून मुलासाठी अध्ययनाचे व्यासपीठ प्रदान केल्याची शिक्षकांनी स्वतः खात्री करणे. * मुलांना उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे. * मुले प्रत्येक दिवशी निर्दिष्ट केलेल्या जागेवर आणि प्रत्येक जागेवरील कृतींमध्ये व्यस्त राहतील याची काळजी घेणे.
| |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य: आकाराची संकल्पना कृती – 26 आकार ओळखून त्यांना नावे देणे (ध्येय : 3) उद्देश:- विविध आकार ओळखा आणि त्यांची नावे द्या. आवश्यक गोष्टी: विविध आकार, डफली, ऑडिओ प्लेयर, टी.व्ही पद्धत: प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू द्या, आकाराबद्दल गाणे/कविता लिहा किंवा गा. मुलांना गाणे / कवितेतील आकार दाखवून गाण्याची पुनरावृत्ती करू द्या. प्रत्येक मुलाला त्यांच्या समोर असलेल्या आकाराला स्पर्श करण्यास सांगा आणि नंतर मुलांना आकाराविषयी थोडक्यात बोलण्यास प्रोत्साहित करा. गणित अध्ययन किटमधील आकार घेवून खेळ खेळणे. वर्ग- 2 त्याने पाहिलेल्या विविध आकाराच्या वस्तूंची नावे सांगणे. उदा: भाकरी, बशी, सूर्य / चंद्र- वर्तुळाकार, फळा- आयताकार, टेबल – चौरसाकार, गॅस सिलिंडर- वृत्तचीत्ती, वाढदिवसाची कागदाची टोपी – शंकू आकार इत्यादी. वर्ग – 3 1. त्याला माहीत असलेल्या आकृत्यांची नावे आणि त्यांच्याविषयी थोडक्यात बोलण्यास प्रेरित करणे. 2. त्याला माहीत असलेली आकृती काढायला सांगणे. * वापरण्यासाठी सराव पत्रके : I.L-2 & 3 ( वर्ग – 1 ली, 2 री, 3री ) | |
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्य ( मुलांची कृती ) | सामर्थ्य : स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल जागरूकता, मौखिक भाषा विकास, शब्द भांडार वाढवितात. कृती – 2 अभिनय गीत/ नाटक ध्येय – 1 उद्देश – · शारीरिक वाढ व विकास होतो. · शब्द भांडार वृद्धिंगत करण्यासाठी यमक, लय, संदर्भ आणि स्पष्ट उच्चारणे करतात. · हावभाव ओळखतात. साहित्य : गाणे ( टिंग टिंग टिंगाक ) : टिंग टिंग टिंगाक ……. टिंग टिंग टिंगाक टिंग टिंग टिंगाक ……. टिंग … (2) डोळ्यांनी पाहू सुंदर जग कानांनी ऐकू गाणी मग… टिंग टिंग टिंगाक ……. टिंग टिंग टिंगाक टिंग टिंग टिंगाक ……. टिंग … (2) नाकाने सुगंध घेतो पटपट जिभेची चव चटपट चटपट… टिंग टिंग टिंगाक ….. टिंग टिंग टिंगाक…… टिंग टिंग टिंगाक …. टिंग … (२) त्वचेने होते स्पर्श ज्ञान , देहाचे करते रक्षण छान…. टिंग टिंग टिंगाक ….. टिंग टिंग टिंगाक….. टिंग टिंग टिंगाक … टिंग …(२) पद्धत : मुलांना गोलाकार उभे करणे. सुलभकार तालबद्ध कृती पूर्ण करण्यासाठी मुलांना संधी देणे. बालगीते, अभिनय गीते, गाणी साधने वापरून किंवा हावभाव करत म्हणणे. उदा. शरीराच्या अवयवांची ओळख करून देण्यासाठी डोळे, नाक, जीभ, त्वचा आणि कान दाखविण्यासाठी वरील गीत अभिनयासाहित म्हणणे. सूचना : 2 री आणि 3 री वर्गांतील मुलांना अभिनय गीते गायल्यानंतर प्रश्न विचारून उत्तर मिळविणे. * सोडवायचे अभ्यास पत्रक : H. W. – 1 ( इयत्ता 1ली, 2री, 3री ) | |
भाषा वि का स आणि पायाभूत साक्षरता | श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य : ध्वनी शास्त्राबबद्दल जागरूकता, शब्दभांडाराची वृद्धी, चालना कौशल्य ( Motor skill ) विकास कृती : 15 लयबद्ध शब्द ऐकणे (ध्येय – 02 ) ECL – 4 उद्देश : · * ध्वनी शास्त्राबद्दल जागृती निर्माण करणे. · * लयबद्ध शब्दांचा शब्दभांडार वाढविणे. · * स्थूल आणि सूक्ष्म चालना (Motor skill) कौशल्याचा विकास करणे. · आवश्यक साहित्य – नाही · पद्धत: * मुलांना परिचित असलेली बालगीते निवडणे. * गाणे म्हणताना लयबद्ध शब्दांवर जोर देणे. * बालगीते म्हणत अभिनयासहीत सादर करणे. वर्गवार विवर : 2 री आणि 3 रीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुकरण करून लयबद्धरित्या अभिनायासाहित गाणे. ( 8 व्या दिवसाला पुढील भाग आहे.) |
भाषा वि का स आणि पायाभूत साक्षरता | आकलानासहित वाचन | सामर्थ्य: शब्दभांडाराची अभिवृद्धि, स्वयं अभिव्यक्ती, घटना वाचतात. कृती 1: चित्र वाचा ( ध्येय – 2 ) उद्देश : विविध घटना / संदर्भाची चित्रे पाहून संदर्भाला अनुसरून काय? का? कसे? अशा प्रश्नांची उत्तरे देतात. * आवश्यक साहित्य : विविध घटना / स्थळ/ जत्रेची चित्रे / बाग / बाजार / शाळा / प्राणी संग्रहालय / सण / यांची चित्रे पद्धत: दुसऱ्या दिवसातील चित्र वाचन कृती चालू ठेवून मुलांचे गट करून आधी वापरलेल्या संदर्भाचे चित्र देणे. मुलांनी चित्र पाहून घटना समजून घेतील. त्यानंतर शिक्षक आजूबाजूच्या परिसराला अनुसरून प्रश्न विचारून उत्तर मिळविणे. शिक्षक एखाद्या संदर्भाचे चित्र दाखवून त्यावर आधारीत खालील प्रमाणे प्रश्न विचारु शकतो. * तुम्ही कधी अशा स्थळाला गेला आहात का? * या संदर्भातील तुम्हाला काय काय आठवते? * या चित्रामध्ये असलेल्या व्यक्ती काय करत आहेत? * या चित्रामध्ये असलेल्या व्यक्ती काय खेळत आहेत? इत्यादी 2 री आणि 3 री वर्गांसाठी : शिक्षक विशिष्ट संदर्भासाठी तार्किक प्रश्न प्रश्न विचारत असताना व्यक्तिगत अभिव्यक्तीला वाव देणे. विशेष सूचना : या कृतीचा पुढील भाग दुसऱ्या आठवड्यातील 8 व्या दिवशी घेतलेला आहे.
| |
उद्देशीत लेखन | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चालना आणि सृजनात्मक अभिव्यक्ती कृती 51: ठिपक्या जोडून रंग भरणे. ( ध्येय : 01 ) ECW – 4 · उद्देश : · *सूक्ष्म स्नायू चालना कौशल्याचा विकास करणे. · *मुलांच्या सृजनात्मक अभिव्यक्तीला वाव देणे. · साहित्य: क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल, खडू पद्धत: पाटी किंवा पेपरवर ठिपक्यांनी विविध आकार काढणे. मुलांना या ठिपक्या जोडून रंग भरायला सांगणे. वर्गवार विवरण : 2 री आणि 3 री च्या मुलांना ठिपक्या घेवून विविध आकार तयार करण्यास सांगून इयता पहिलीच्या मुलांना सोबत घेवून ठिपके जोडून रंग भरण्यास सांगणे. यासाठी ते मोठ्या वर्गातील मुलांच्या सहकार्याने सामुहिक कृतीचे आयोजन करणे. | ||
मैदानी खेळ | कृती : आत बाहेर सामर्थ्य : एकाग्रता वाढवितात, श्रवण कौशल्य वाढवितात, शारीरिक संतुलित विकास साहित्य : काठी पद्धत : · मुलांची संख्या लक्षात घेवून काठीच्या सहाय्याने एक मोठे वर्तुळ आखणे. · मुले वर्तुळाच्या रेषेच्या बाहेर उभे राहतील. • · शिक्षकांच्या ‘आत / बाहेर’ या सूचनेप्रमाणे खेळ खेळण्यास सांगणे. • · सूचनेचे पालन न करणारी मुले खेळातून बाहेर जातील. • 2 री आणि 3 री च्या मुलांनी हा खेळ पुढे चालू ठेवावा. | ||
रंजक कथा | Ø शीर्षक : सिंह आणि उंदीर Ø आवश्यक साहित्य : संभाषण असलेली दृकपट्टी / फ्लॅशकार्ड Ø उद्देश : Ø ऐकण्याचे सामर्थ्य विकसित करणे. Ø अंदाज बांधण्याचे कौशल्य वृद्धिंगत करणे. Ø विचारशक्ती विकसित करणे. Ø प्रश्न विचारण्याच्या वृतीचा विकास करणे. Ø गोष्टीशी संबंधित चित्रांचा संग्रह करण्याची आवड निर्माण करणे. Ø अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे. Ø अस्खलित बोलण्याचे कौशल्य विकसित करणे. Ø
पद्धत :
Ø शिक्षकांनी गोष्टीचे पुनरावलोकन करणे. Ø गोष्टीचा सारांश सांगण्यासाठी दुसरी आणि तिसरीच्या मुलांना मदत करणे. Ø फ्लॅशकार्ड घेवून पात्रांचे संभाषण सांगणे. Ø मुलांनी गोष्ट सांगताना चूक केल्यास चूक सुधारून त्यानंतर योग्य गोष्ट पुढे चालू ठेवण्यास मदत करणे. | ||
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. · ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |