प्रार्थना / गीताचे नाव –
देवा तुझे किती सुंदर आकाश….
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पदे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
शालेय प्रार्थना,गीते ऐका व डाऊनलोड करा.
➖➖➖➖♾️➖➖➖➖