दैनंदिन शैक्षणिक क्रिया वेळापत्रक २०२२-२३
राज्यातील सर्व सरकारी,अनुदानित,विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शाळा दैनंदिन वेळापत्रक :-
9.30 ते 9.40 स्वच्छता
9.40 ते 9.50 परिपाठ
9.50 ते 10.00 क्षीरभाग्य
प्राथमिक शाळा १ली ते 7वी/8वी दैनंदिन वेळापत्रक
नली-कली वर्ग असल्यास एकूण ८० मिनिटांच्या 4 तासिका वरील वेळापत्रकाप्रमाने घ्याव्यात.
माध्यमिक शाळा (HIGH SCHOOL) 8वी ते 10 वी
सुचना –
अध्ययन पुनर्प्राप्ती / सेतुबंध –
2०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शाळेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासासाठी वेळ मिळावा या दृष्टीने वार्षिक नियोजन करण्यात आलेले असून यावर्षी अध्ययन पुनर्प्राप्ती (LEARNING RECOVERY) हा उपक्रम इयत्ता पहिली ते नववी साठी आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावीसाठी दरवर्षी प्रमाणे प्रारंभी 1 महिना (म्हणजेच दिनांक 16.05.2022 ते 15.06.2022 पर्यंत) सेतुबंध कार्यक्रम अंमलात आणून नंतर वेळापत्रकानुसार सर्व विषयाचे अध्यापन करण्यास सुरुवात करावी.
शाळा स्तरावरील उपक्रम / क्रियाकलाप –
विविध शाळा संघ व क्लब यांच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत.
विविध दिन,जयंती साजरे करणे :-
वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक वेळापत्रकात साजरे केले जाणारे दिवस,जयंती साजऱ्या करणे.जर यापैकी कांही विशेष दिवस,जयंती सरकारी सुट्ट्या/रविवार किंवा सरकारने अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशी आल्यास त्याच्या पुढील दिवशी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सदर दिवसाचे महत्व सांगावे.
मूल्यमापन विश्लेषण –
आकारिक मूल्यमापन (FA) संबंधित विषयाच्या उपलब्ध तासिका वेळेत प्रत्येक दिवशी एक किंवा दोन विषयाचे करावे दैनंदिन अध्यापन कार्य सुरु ठेवावे. संकलित मूल्यमापन मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे दररोज दोन विषयांचे करण्यात यावे.
शिक्षक दिन –
अनेक स्तरावर शिक्षक दिन विविध दिवशी साजरा केला जातो त्यामुळे अध्ययन अध्यापन व शाळा उपक्रम दिवस कमी होत आहेत.त्यामुळे शिक्षक दिन सर्वत्र त्याच दिवशी म्हणजे ०५ सप्टेंबर २०22 सर्व स्तरावर शाळा / तालुका / जिल्हा (शाळेत सकाळी 8.०० ते 10.०० या वेळेत साजरा करण्यात यावा) साजरा करणेत यावा.
उपक्रम यादी –
प्रत्येक शनिवारी किंवा दुसर्या / चौथ्या शनिवारी शाळेत CCE अंतर्गत येणाऱ्या कृती किंवा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण मिळेल असे कार्यक्रम / स्पर्धा आयोजित कराव्यात.
पुस्तक परिचय तासिका –
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ अध्यापन सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयानुसार पुस्तके,चाचणी,मूल्यमापन,विविध उपक्रम,क्रियाकलाप यांची थोडक्यात माहिती द्यावी.
इयत्ता व विषयानुसार वार्षिक नियोजन –
वर्गशिक्षक व विषय शिक्षकांनी इयत्तानुसार/विषयानुसार वार्षिक नियोजन करावे. व मागील वर्षी अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये आलेल्या समस्यांची यादी करावी व त्यावरती उपाय योजना कराव्यात.
क्रियाकलाप / उपक्रम यादी –
सुधारित अभ्यासक्रमावर आधारित व मूल्यमापनास उपयुक्त उपक्रम/कृती प्रत्येक शनिवारी NO BAG DAY अंतर्गत आयोजित करण्यात यावेत.
अंदाजपत्रक 4थीसाठी
8th वार्षिक नियोजन pdf download hot nahi
प्रत्येक शिक्षकाला तासिका कार्यभार किती असतो