मध्यान्ह आहार अनुदान २०२१-२२ मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करणेसंबंधी –

मध्यान्ह आहार अनुदान आता मुख्याध्यापकांच्या खात्यावरून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार –  

यावर्षी विद्यार्थ्यांचे आधार E-KYC पासून मिळाली सुटका.पण २०२२-२३ विद्यार्थ्यांचे आधार E-KYC  करणे आवश्यक – 




 

 

 

 

1ली ते 8 वी विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुट्टीतील मे व जून 2021 महिन्यातील मध्यान्ह आहार स्वंयपाक खर्च DBT ऐवजी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा करणेसंबंधी आदेश – दि. 14/03/2022

 

   मे व जून 2021 महिन्यातील एकूण 50 दिवसांच्या उन्हाळी सुट्टीतील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे धान्य वितरण सर्व शाळेतून करण्यात आले आहे.पण सदर 50 दिवसाचे जेवण तयार करण्यासाठी येणारा खर्च मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना DBT द्वारे बँक खात्यात जमा करण्याचा आदेश कर्नाटक अर्थ खात्याने दिला होता.




     पण DBT साठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक खाते ई केवायसी करणे आवश्यक असते.त्यासाठी विद्यार्थ्याची आधार कार्डवरील माहिती वा SATS पोर्टल वरील माहिती एकसारखी असणे आवश्यक असते.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले.पण कांहीं तांत्रिक अडचणीमुळे ईकेवायसी करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

    त्यामुळे फक्त २०२१-२२ मधील सदर अनुदान DBT द्वारे जमा न करता सर्व विद्यार्थ्यांची अनुदान रक्कम खजाने – 2 (K2) च्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.व मुख्याध्यापकांनी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करायची आहे.तर २०२२-२३ पासून मध्यान्ह आहार खर्च फक्त DBT द्वारेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे असे कर्नाटक अर्थ खात्याने म्हटले आहे.




आता लवकरच २०२१-२२ सालातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचे मे व जून महिन्यातील मध्यान्ह आहार तयार करण्याचा खर्च DBT ऐवजी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मुख्याध्यापकांनी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासंबंधी अर्थ खात्याने तयारी सुरु केली आहे.
 
काय आहे DBT पद्धत? –

DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही 1 जानेवारी 2013 रोजी भारत सरकारने सुरू केलेला सबसिडी हस्तांतरित करण्याच्या पद्धतीतील मोठा बदल आहे.कोणतेही सरकारी अनुदान थेट लोकांना त्यांच्या बँक खात्यांत जमा करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.



 
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –



Download Link


Share with your best friend :)