निर्मिती – गिरीश दारुंटे (सर) मनमाड , नाशिक.
दरवर्षी आपण 28 फेब्रुवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो.कारण आपल्या देशाला विज्ञानातील पहिलं नोबेल पारितोषिक मिळवून देणारे शास्त्रज्ञ, चंद्रारशेखर व्यंकट रामन (C.V.RAMAN) यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध, 28 फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता. हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी.
परदेश प्रवासाला निघालेले रामन,जहाजाच्या डेकवर उभे होते.वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी.त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.म्हणून विज्ञान हे एक शास्त्र आहे.