MARATHI RAJBHASHA DIN (कविता – कणा )

 मराठी भाषा दिन निमित्त विशेष माहिती व भाषणे 

निर्मिती – गिरीश दारुंटे (सर) मनमाड , नाशिक.

 


 



 


कुसुमाग्रजांच्या कविता प्रेरणादायी आहेत.त्यांच्या अनेक प्रेरणादायी कवितांपैकी एक कविता म्हणजे “कणा”
कणा 
कवी – कुसुमाग्रज 

ओळखलत का सर मला ? पावसात
आला कोणी
,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती
पाणी.

गंगामाई पाहुणी आली, गेली
घरट्यात राहुन

क्षणभर बसला नंतर हसला बोलला
वरती पाहून :
 

माहेरवाशीण पोरीसारखी चार
भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको
मात्र वाचली.

माहेरवाशीण पोरीसारखी चार
भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको
मात्र वाचली.
 

भिंत खचली, चूल
विझली
, होते
नव्हते नेले

प्रसाद म्हणून पापण्यांवरती
पाणी थोडे ठेवले.
 

कारभारणीला घेउन संगे सर आता
लढतो आहे
 

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ
काढतो आहे
,

खिशाकडे हात जाताच हसत हसत
उठला
 

पैसे नकोत सर, जरा
एकटेपणा वाटला.
 

मोडून पडला संसार तरी मोडला
नाही कणा
 

पाठीवरती हात ठेउन, फक्त
लढ म्हणा
‘!

 



 

 
  




 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *