Chouthi Marathi 16. Maze Gav (पाठ – 16 माझे गाव)

 

पाठ – 16 माझे
गाव 

AVvXsEg9IZTBRf1o5H4bhQfBmG0TSaGv9xGUKH3Oyk7DqV 3C37IEhv hQb rjRvKHGNWp2





नवीन शब्दांचे अर्थ
आमराई – आंब्याची बाग
माया –
प्रेम

 स्वाध्याय
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१) गावाच्या पूर्वेला काय आहे?
उत्तर – गावाच्या पूर्वेला देवाचा डोंगर आहे.
२) नदी कोणत्या दिशेला वाहते ?
उत्तर – नदी उत्तर दिशेला वाहते.
३) शेतमळे कोठे बहरले आहेत ?
उत्तर – शेतमळे नदीच्या किनारी बहरले आहेत.
४) घरात कोण-कोण राहतात असे कवी म्हणतो ?
उत्तर – घरात आई,बाबा,ताई राहतात असे कवी
म्हणतो.

५) केव्हा खेळावे असे कवीने सुचविले आहे?
उत्तर – सायंकाळी खेळावे असे कवीने सुचविले आहे
६) कवितेतील आजोबा कोण ?
उत्तर – देवाचा डोंगर हा कवितेतील आजोबा आहे.




 

आ) खालील प्रश्नांची उत्तरे
२-३ वाक्यात लिहा.

१) गावावर कोणाची
माया आहे असे कवी म्हणतो
?
उत्तर – गावाच्या पूर्वेला देवाचा
डोंगर आहे.तो डोंगर गावाचा आजोबा असून त्याची गावावर माया आहे असे कवी म्हणतो.

२) गावाच्या उत्तरेकडील
परिसराचे वर्णन कसे केले आहे
?
उत्तर – गावाच्या उत्तरेला नदी वाहते.तिच्या
काठावर शेत मळे बहरले असून तिथंच आमराई आहे.

३) घरच्या परिसरात कोणकोणती
झाडे आहेत
?
उत्तर – घराच्या परिसरात पारिजात,
जाई- जुई ही झाडे आहेत.
४) गावातील बालकांना कवीने
कोणता संदेश दिला आहे
?
उत्तर – मन लावून शिका व सायंकाळी
खूप खेळा असा संदेश गावातील बालकांना दिला आहे.

इ)समानार्थी शब्द लिही.
देव = ईश्वर
आई =
माता

नदी =
सरिता

फूल =
सुमन

घर =
सदन




ई) जोड्या जुळव.
                                    
१) पूर्वेला                    अ) नदी
२)
पश्चिमेला
              ब) माझी शाळा
३)
उत्तरेला
                 क) देवाचा डोंगर
४)
दक्षिणेला
              ड)
माझे घर

उत्तर –

       
                            
१) पूर्वेला                    क) देवाचा डोंगर
२)
पश्चिमेला
              ड) माझे घर
३)
उत्तरेला
                 अ) नदी

४) दक्षिणेला               ब)
माझी शाळा



Share with your best friend :)