9. कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद
I.खालील
प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) कर्नाटक
विद्यावर्धक संघ किती साली स्थापन केला?
उत्तर – कर्नाटक
विद्यावर्धक संघ 1890 साली स्थापन झाला.
2) कर्नाटक
कुलपुरोहीत असे कोणाला म्हणतात ?
उत्तर – कर्नाटक
कुल पुरोहित असे आलुर व्यंकटराव यांना म्हणतात.
3) कर्नाटक
एकीकरणाला योगदान दिलेल्या दोन संघटनांची नावे लिहा.
उत्तर – कर्नाटक
एकीकरणाला योगदान दिलेल्या दोन संघटनांची नावे खालील प्रमाणे –
कर्नाटक साहित्य परिषद
कर्नाटक एकीकरण सभा
4) ‘उदयवागली
नम्म चेलूव कन्नड नाडू‘ हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर – उदय
वागली नम्म चेलुव कन्नड नाडू हे गीत हुईलगोळ नारायणराव यांनी लिहिले आहे.
5) विशाल
मैसूरु राज्य केव्हा अस्तित्वात आले?
उत्तर – विशाल
म्हैसूर राज्य 1 नोव्हेंबर
1956
साली अस्तित्वात आले.
6) ‘कर्नाटक‘ असे नामकरण कोणी व केव्हा केले?
उत्तर –1 नोव्हेंबर 1973 या दिवशी त्यावेळचे मुख्यमंत्री डी. देवराज अरस यांनी
कर्नाटक राज्य असे नामकरण केले.
II.गटात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कर्नाटक
एकीकरणाला प्रेरणा दिलेले कवी कोण? व त्यांच्या कविता कोणत्या?
उत्तर – कर्नाटक
एकीकरणाला प्रेरणा दिलेले कवी व त्यांचे साहित्य खालील प्रमाणे
आलूर व्यंकटराव -कर्नाटकाचे गतवैभव
कुवेंपू – नाडगीताची रचना
हुईलगोळ नारायणराव – उदय वागली नम्म चेलुव कन्नड नाडू
मंजेश्वर गोविंद पै –
कन्नडगीर ताई
2) राज्य
पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष व सदस्य कोण होते?
उत्तर – राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष एस.फजल अली हे होते आणि H.N.
कुंजु व के.एम.पतिकर हे सदस्य होते.