8.महिला स्वातंत्र्य सेनानी
अभ्यास
I. खालील वाक्यातील रिकाम्या जागा भरा.
1) राणी अब्बकाच्या स्मरणार्थ उल्लाळमध्ये वीर राणी अब्बक्का उत्सव साजरा करतात.
2) बळ्ळारी सिद्दम्मांचा जन्म 1903 साली झाला.
3) 1938 मध्ये यशोधरम्मानी शिवपुरच्या ध्वज सत्याग्रहा मध्ये भाग घेतला.
4) यशोधरम्मा यानी समाज कल्याण मंत्रीपद भुषविले.
5) स्वदेशी व्रत नाटक उमाबाई कुंदापूर यानी लिहिले.
II. गटात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. उल्लाळच्या रक्षणासाठी पोर्तुगीजाविरुद्ध राणी अब्बक्कादेवी यानी केलेला संघर्ष विवरण करा.
उत्तर – पोर्तुगीजांनी अब्बक्काला राज्य देण्यासाठी दबाव आणला पण त्यांनी त्याला विरोध केला.याचा परिणाम म्हणजे १५५५ मध्ये पोर्तुगीज आणि राणीबरोबर युद्ध पुकारले.या युद्धात अब्बक्का विजयी झाल्यानंतर 1568 मध्ये पोर्तुगीजांचे व्हाईसराय अंटोनी योमोरह यांच्या नेतृत्वाखाली उल्लाळमध्ये प्रवेश केला.राणीने तेथून निसटून 200 सैनिकांच्या सहाय्याने पोर्तुगीज सैन्यावर आक्रमण केले.जनरल पेस्केटो या युद्धात मारला गेला.पोर्तुगीज सैनिकांना बंदी बनवण्यात आले.पुढे झालेल्या आणखी एका युद्धात पोर्तुगीजांना मंगळुरू किल्ला सोडून जाण्यासाठी दबाव आणला.परंतु पोर्तुगीजानी पुन्हा पुन्हा उल्लाळच्या संपत्तीच्या लालसेपोटी युद्ध करतच राहिले.1570 मध्ये विजापूरचा सुलतान आणि कल्लीकोटचा झामोरीन यांच्यात मैत्रीचा
करार झाला.झामोरियन राजाचा सेनापती कुल्पीकूर मार्ककर याने अब्बक्का यांच्यावतीने युद्ध केले व मंगळूर किल्ला जिंकून परत जात असताना पोर्तुगीजांनी त्याला ठार केले.अब्बक्का यांचे पती लक्ष्मण यांच्या साह्याने पोर्तुगिजांनी अब्बक्का देवीचा पराभव केला व कारागृहात पाठविले.त्या कारागृहातच अब्बक्का मरण पावल्या.
2. बहुमुखी प्रतिभा असलेल्या कमलादेवी चटोपाद्याय या कर्नाटक गौरव आहेत याचे स्पष्टीकरण करा.
उत्तर – कमलादेवी चट्टोपाध्याय या केवळ स्वातंत्र्य चळवळीकार न राहता समाज सुधारक,स्त्रीवादी चिंतक,साहित्यिकांनी चलतचित्र नटी म्हणून कार्य केले.त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी 1955 मध्ये पद्मभूषण, 1962 मध्ये वतमूल फौंडेशन प्रशस्ती, 1966 मध्ये रामन म्यागसे इंटरनॅशनल प्रशस्ती, शांतीभारत देसेटीकोतं प्रशस्ती, सेंट्रल अकादमी प्रशस्ती आणि 1987 मध्ये पद्मविभूषण प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले. अशी बहुमुखी प्रतिभा असलेल्या कमलादेवी चटोपाद्याय या कर्नाटकाला गौरवाचा विषय आहेत. या 1988 मध्ये मरण पावल्या.
(3) स्वातंत्र्य चळवळीत उमादेवी कुंदापूर यानी दिलेले योगदान वर्णन करा.
उत्तर – लोकमान्य टिळक गांधीजी आणि हर्डीकर यांच्या राष्ट्रीय तेच या आंदोलनामुळे प्रभावित होऊन मराठी भाषेत स्वदेशी वृत्त हे नाटक लिहून स्वदेशी तत्त्वाचे महत्त्व पटवून दिले.मुंबईमध्ये सारस्वत साहित्य समाज आणि भगिनी मंडळ तसेच टिळक शाळेची जबाबदारी सांभाळली.यांनी स्त्रियांमध्ये स्वदेशी खादीचा प्रचार,राष्ट्रीय शिक्षणाबद्दल जागृती केली.टिळकांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळीत भाग घेतला.1923 मध्ये एन.एस.हर्डीकर यांनी स्थापन केलेल्या सेवा दलाच्या महिला गटाचे नेतृत्व स्वीकारले.1924 साली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनात महत्त्वाची भूमिका निभावली.मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला यासाठी चार महिने हिंडलगा,येरवडा जेलमध्ये कारावास भोगला.जेलमधून सुटका झाल्यानंतर अंकोला,शिरशी,सिद्धापूर इतर ठिकाणी सत्याग्रहात भाग घेऊन शिक्षा भोगली.उमादेवी कुंदापूर यांनी अनेक निराश्रित महिलांना आश्रय दिला.अनारोग्याच्या कारणामुळे 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात प्रत्यक्ष भाग न घेता.भूमिगत
चळवळीतील कार्यकर्त्यांना आश्रय देऊन पाठिंबा दर्शविला.गांधीजींच्या सल्ल्यानुसार कस्तुरबा निधीची जबाबदारी निभावली व समाज सुधारणेच्या कार्यात अग्रेसर राहिला.अशा निस्वार्थी व्यक्ती असलेल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या उमाबाई कुंदापूर या 1992 मध्ये मरण पावल्या.