पाठ ५ स्वातंत्र्य चळवळ
गांधी युग (1919 – 1947)
I. रिकाम्या जागी
योग्य शब्द लिहा.
1) गोपालकृष्ण गोखले हे गांधीजीचे राजकीय गुरु होते.
2) गांधीजीनी अहमदाबाद जवळ स्थापन केलेला आश्रम साबरमती होय.
3) चौरिचौरा हत्याकांड 1922 साली घडले.
4) संपुर्ण स्वराज्य निर्णय 1929
साली स्वीकारण्यात आला.
5) काँग्रेस सोशॅलिस्ट पक्षाचे महाकार्यदर्शी जयप्रकाश
नारायण हे होते.
6) संपूर्ण क्रांती आंदोलन 1974ला सुरू झाले.
7) स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधान मंत्री पंडित
जवाहरलाल नेहरू हे होते.
II. खालील
प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) गांधीजींचा जन्म केव्हा व कोठे झाला?
उत्तर
– गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर अठराशे 69 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर
येथे झाला.
2) गांधीजींचे राजकीय गुरु कोण ?
उत्तर
-गांधीजींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले हे होते.
3) पुणे करार कोणामध्ये झाला ?
उत्तर
-पुणे करार गांधीजी व डॉ.आंबेडकर यांच्यामध्ये झाला.
4) फॉरवर्ड ब्लॉक ची सुरूवात कोणी केली ?
उत्तर
– फॉरवर्ड ब्लॉक ची सुरुवात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी केली.
5) आय.एन.ए. चा विस्तार करा.
उत्तर
-आय.एन.ए.चा विस्तार इंडियन नॅशनल आर्मी होय.
6) ‘भारत छोडो‘ आंदोलनात गांधीजींनी कोणती घोषणा केली ?
उत्तर
– भारत छोडो आंदोलनात गांधीजींनी ‘ब्रिटिशांनो भारत सोडून जा‘ ही घोषणा दिली.
7) ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो‘.
अशी घोषणा कोणी केली ?
उत्तर
–‘तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला
स्वातंत्र्य देतो.‘ अशी घोषणा नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी
केली.
8) डॉ. आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर
– डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.
9) भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात ?
उत्तर
– भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात.
10) ‘लोक नायक‘ असे कोणाला म्हणतात ?
उत्तर
-लोकनायक असे जयप्रकाश नारायण यांना म्हणतात.
गटात चर्चा करून खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) गांधीजीच्या
कायदेभंग चळवळीबाबत लिहा.
उत्तर – कायदेभंगाची चळवळ 15 मार्च 1930 रोजी
गांधीजीनी प्रसिद्ध दांडी यात्रेत पासून सुरू केली. आपल्या 78 अनुयायांसह गांधीजींनी साबरमती आश्रमापासून पदयात्रा आरंभिली.ती
गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या गावापर्यंत.सुमारे 375 किलोमीटर दूरवर असलेल्या या ठिकाणी लोकांकडून मीठ तयार करून घेऊन मिठाचा
कायदा मोडण्याचा उद्देश होता.
2) भारत छोडो आंदोलनाबाबत लिहा.
उत्तर – क्रिप्स आयोगाच्या विफलता नंतर भारतीयांना चिड
आली.गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे काँग्रेसचे अधिवेशन
घेतले.या अधिवेशनात ‘ब्रिटिशांनो भारत सोडून जा‘(छोडो भारत)असा ठराव संमत करण्यात आला.गांधीजींनी ‘करा
किंवा मरा‘असे आवाहन भारतीयांना दिले. राष्ट्रीय नेत्यांच्या
अटकेची बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली.शाळा कॉलेज व कारखान्यात संप पाळण्यात
आला.विरोधात्मक घटना चालू झाल्यावर पोलीस ठाण्यावर,टपाल
कचेऱ्यावर,रेल्वे स्थानकावर,विविध
ठिकाणी आक्रमणे सुरू झाली. विद्यार्थ्यांनी कामगारांनी आणि शेतकऱ्यानी बंडाळी
माजवली.
३) सुभाषचंद्र बोस यांचा
स्वातंत्र्य लढा संक्षिप्तपणे विवरण करा.
उत्तर – स्वातंत्र्याच्या चळवळीत सुभाषचंद्र बोस यांची
भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.ते कलकत्ता विश्वविद्यालयातील प्रतिभावंत
विद्यार्थी होते. लंडनमध्ये झालेल्या आय.सी.एस.परीक्षेत ते चौथ्या क्रमांकावर
होते.देशबंधू चित्तरंजन दास यांच्या प्रभावामुळे चाललेला चळवळीमध्ये आकर्षित होऊन
सुभाषबाबू राजकीय क्षेत्रात समाविष्ट झाले. खास करून स्वामी विवेकानंदांचे जीवन
आणि लेखनामुळे त्यांनी स्फूर्ती घेतली.1931 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा
राजीनामा देऊन ते पक्षातून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी ‘फॉरवर्ड
ब्लॉक‘ नावाचा नवीन पक्ष संघटित केला.सुभाष चंद्र बोस हे एक
धोकादायक नेते आहेत असे समजून त्यांच्याच घरी नजर कैद करण्यात आली. सुभाषचंद्रांनी
तेथून सुटका करून घेतली आणि पेशावर व काबुल या मार्गाने मास्को येथे जाण्याचा
धाडसी निर्णय घेतला.मास्कोहुन विमानाने ते जर्मनीच्या बर्लिन शहरात
पोहोचले.जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलरची भेट घेऊन त्याच्या बरोबर एक करार
केला.ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याची त्यांची महान महत्त्वकांक्षा होती.या
काळात जपानने ब्रिटिशांच्या विरुद्ध दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. युद्धात
ब्रिटिशांच्या सेवेत असलेले सुमारे 40 हजार भारतीय सैनिक
जपानचे युद्धकैदी झाले होते.त्यांना मोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय
राष्ट्रीय सेना (इंडियन नॅशनल आर्मी) अथवा (आझाद हिंद सेना) या नावाने संघटित
करण्यात आले.1943 मध्ये सुभाषचंद्रांनी सिंगापूरला येऊन I.N.A.चे नेतृत्व स्वीकारले ‘नेताजी‘ या नावाने ओळखले जाऊ लागले.
४) डॉ.आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी हाती घेतलेल्या लढ्याची माहिती लिहा.
डॉ. आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशातील ‘महू‘ येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. वडीलांचे नाव रामजी सकपाळ व
आईचे नाव भिमाबाई होते. आंबेडकरांचे लहानपणीचे नाव भिमराव होते. त्यांचे प्राथमिक
शिक्षण स्थानिक शाळेत झाले. नंतर बाँम्बेच्या इल्फीनस्टन विद्यालयात शिकले. उच्च
शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स,कोलंबिया
विश्वविद्यालयातून (अमेरिका) पी.एच.डी. एल.एल.डी. बार अॅटलॉ पदव्या संपादन केल्या.
शिक्षण घेत असताना स्वतःचे व्यक्तीत्व विकसीत केले.
‘महार‘ या अस्पृश्य जातीत जन्मलेल्या आंबेडकर यानी
लहानपणी कटू अनुभव अनुभवले. सामाजिक असमानता दूर करण्यासाठी संविधानात्मक मार्गावर
विश्वास ठेवला. एवढेच नाही तर दलीत आणि शोषिताना राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्यासच
त्यांचा विकास साध्य आहे असा त्याना विश्वास होता.यासाठी अस्पृश्यतेच्या विरुद्ध
चळवळ हाती घेतली. त्यामध्ये महाडचा सत्याग्रह, नाशिकचे
कलाराम देवालयातील प्रवेश अशा यशस्वी चळवळी हाती घेतल्या. दलीतामध्ये जागृती आणि
स्वाभिमान निर्माण केला. ‘मूकनायक‘ आणि
‘बहिष्कृत भारत‘ या पत्रकांचे संपादक
पद भूषवून दलित, शोषित आणि अस्पृश्यांचा आवाज बनले. बहिष्कृत
हीत रक्षण सभा नावाची संघटना स्थापन केली.
डॉ. आंबेडकर
दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडन येथे चाललेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला.
ब्रिटिशानी घोषित केलेल्या ‘धर्माचा निर्णय‘ (कम्यूनल अवार्ड) (1932) दलित वर्गाला स्वतंत्र निवडणूक क्षेत्र निर्माण करणे हा उद्देश होता. हा
निर्णय गांधीजीना पसंत न पडल्यामुळे येरवडा तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. अखेरीस
गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार (1932) होऊन ही
समस्या सुटली. पुढे स्वतंत्र भारताच्या संविधान रचना समितीचे अध्यक्ष बनून संविधान
तयार करण्याची जबाबदारी निभावली. तेव्हापासून त्याना ‘संविधान
शिल्पकार‘ म्हणून प्रसिद्ध झाले.नंतर स्वतंत्र भारताचे पहिले
कायदामंत्री झाले.त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.त्यानी काही महिने अगोदर बौद्ध धर्माचा स्वीकार केला.1990
मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारत रत्न‘ प्रदान करण्यात आले.