इयता – तिसरी
पाठ 9 – रस्ता पार करताना
नवीन शब्दांचे अर्थ
सिग्नल – रहदारी दर्शक दिवे.
खुशीत – आनंदात
चौक – जेथे चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
अ. एका वाक्यात उत्तरे लिही.
1. रोहित व आजोबा कोठे निघाले होते?
उत्तर – रोहित व आजोबा बाजारात निघाले होते
२. रस्त्याने जाताना कोणत्या बाजूने जावे?
उत्तर – रस्त्याने जाताना नेहमी डाव्या बाजूने जावे
३. लाल दिवा काय सांगतो?
उत्तर – लाल दिवा सांगतो थांबा.
४. रोहित व आजोबांनी काय काय आणले ?
उत्तर – रोहित व आजोबांनी यांनी बाजारातून भाजी,फळे आणले.
५. रोहित कोणत्या इयत्तेत शिकत होता?
उत्तर – रोहित इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता.
आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. आजोबांनी रोहितला काय सांगितले?
उत्तर – आजोबांनी रोहितला सांगितले की रस्त्याने जाताना रहदारीचे काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत असे सांगितले.
२. झेब्रा क्रॉस कशाला म्हणतात ?
उत्तर – रस्ता पार करण्यासाठी रस्त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले असतात.त्याला झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात.
३. कोणता दिवा लागताच पुढे जावे ?
उत्तर – हिरवा दिवा लागताच पुढे जावे
जोड्या जुळवा.