इयत्ता – तिसरी
पाठ 8
नवीन शब्दांचे अर्थ
इवले – लहान
लपंडाव – लपाछपीचा खेळ
तुजसंगे- तुझ्याबरोबर
तव – तुझे
मौज – मजा
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
१. कवितेतील कोणाला कोणता प्रश्न पडला आहे?
उत्तर – कवितेतील मुलगीला फुलपाखराला सुंदर सुंदर रंगानी कोणी रंगविले? हा प्रश्न पडला आहे.
२. फुलपाखराचे अंग कसे आहे?
उत्तर – फुलपाखराचे अंग मऊ मऊ आहे.
३. मुलीला कशामध्ये मौज वाटते?
उत्तर – मुलीला फुलपाखरासोबत धावायला आवडते.
४. मुलीला फुलपाखरांबरोबर कोणता खेळ खेळावासा वाटतो?
उत्तर – मुलीला फुलपाखरांबरोबर लपंडाव हा खेळ खेळावासा वाटतो.
५. फुलपाखरु कशामुळे उडते ?
उत्तर – फुलपाखरु त्याच्या पंखांमुळे उडते.
आ. खालील ओळी पूर्ण कर.
१. सुंदर सुंदर रंगानी
रंगविले तुजला कोणी?
२. मऊ मऊ तव अंग किती
किती करसी गमती जमती!
३. तुजसंगे धावायला
मौज वाटते फार मला!
४. फुलपाखरा ये इकडे
छान गडे तू छान गडे!
इ. तुला माहीत असलेल्या खेळांची नावे सांग.
उत्तर – लपंडाव,लिंबू चमचा,आंधळी कोशिंबीर, तळ्यात मळ्यात, कबड्डी, क्रिकेट इत्यादी.
ई. नमुन्याप्रमाणे पुढील गाळलेल्या जागा भर.
१. मऊ मऊ …..कापूस
२. निळे निळे …..आकाश
३. गार गार ……. वारा
४. झुळ झुळ……पाणी
उ. खालील शब्दांच्या जोड्या जुळव व शब्द पुन्हा लिही.
अ ब
उत्तर
१. पिवळा बुंद पिवळा धमक
२. काळा शुभ्र काळाभोर
३. निळा गार निळाशार
४. लाल भोर लालबुंद
५. हिरवा धमक हिरवागार
६. पांढरा शार पांढराशुभ्र