इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
इतिहास
पाठ – ८ मराठे
नवीन
शब्दः
गनिमी कावा : शत्रुशी
समोरासमोर युद्ध न करता लपून केलेले युद्ध
छत्रपती : महाराज
अभ्यास
रिकाम्या
जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा.
1. शिवाजी
महाराजांचे गुरु दादोजी
कोंडदेव हे होते.
2. शिवाजी महाराजांनी व्याघ्र
नखांच्याच्या सहाय्याने अफजलखानाचा
वध केला.
3. औरंजेबाच्या राजा जयसिंग या सरदाराने शिवाजी महाराजांचा पराभव केला.
II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे
झाला?
उत्तर – शिवाजी
महाराजांचा जन्म पुण्याजवळील
शिवनेरी किल्ल्यावर झाला .
2. शिवाजी महाराजांच्या आई वडिलांची नावे सांगा.
उत्तर – शिवाजी
महाराजांच्या आईचे नाव
जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले
3. विजयपुरच्या सुलतानाने शिवाजीला
का विरोध केला?
उत्तर – शिवाजी
महाराजांनी वयाच्या एकोणिसाव्या
वर्षी विजापूरच्या आदिलशहाच्या अधीन असलेल्या तोरणा किल्ला जिंकून घेतला. नंतर रायगड,सिंहगड,प्रतापगड
इत्यादी किल्ले जिंकून घेतले.त्यामुळे क्रोधीत झालेल्या विजापूरच्या सुलतानाने शिवाजीला
विरोध केला.
4. शाहिस्तेखान कोण होता?
उत्तर – शाहिस्तेखान
हा औरंगजेबाच्या दरबारातील एक सरदार होता.
5.शिवाजीचा राज्याभिषेक कोठे झाला ? त्यावेळी
त्यानी कोणती पदवी धारण केली ?
उत्तर – शिवाजी महाराजांचा
राज्याभिषेक रायगड येथे झाला वेळी त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली.
6. मराठा साम्राज्यातील प्रमुख पेशव्यांची नावे
लिहा.
१. बाळाजी विश्वनाथ
२.पहिले बाजीराव
३. बाळाजी बाजीराव इत्यादी होय.
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.. – CLICK HERE
रायगड किल्ला