अभ्यास
I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा.
1. पृथ्वीराज
चौहान याने तराईच्या युद्धात महंमद घोरीचा पराभव केला.
2. अल्लाउद्दिन
खिलजीने दिल्लीत सिरी किल्ल्याची निर्मीती केली.
3. इब्राहीम
लोदीचा पराभव बाबर याने केला.
II. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने कोणाचा पराभव केला?
उत्तर – तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने पृथ्वीराज
चव्हाण यांचा पराभव केला.
2. कुतुबमिनार कोणी निर्माण केला?
उत्तर – कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक यांनी निर्माण केला.
3. दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला कोण?
उत्तर – दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला
रजिया सुलतान होय.
4. दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाऊद्दीन खिलजीचा
सेनापती कोण?
उत्तर – दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दीन खिलजी
चा सेनापती मल्लिक कपूर होय.
5. महंमद बिन तुघलखाने राजधानी कोठून कोठे स्तलांतरीत केली?
उत्तर – महंमद बिन तुघलकने राजधानी दिल्लीहून दौलताबाद (देवगिरी) येथे
स्थलांतरित केली.
6. मी देवाचा प्रतिनिधी असे कोणत्या राजाने म्हटले?
उत्तर – मी देवाचा
प्रतिनिधी असे बल्बन राजाने म्हटले.
III. गटात चर्चा करुन उत्तरे लिहा.
1. महंमद गझनीच्या स्वाऱ्यांचे परिणाम लिहा.
उत्तर – महंमद गझनी याने भारतावर आक्रमण केले.हा अफगाणिस्तानातील
गझनी नावाच्या छोट्या राज्याचा सुलतान होता.त्यांनी भारतावर सतरा वेळा स्वार्या
केल्या मुळे भारतातील अनेक ऐश्वर्य संपन्न शहरे उध्वस्त झाली.धार्मिक स्थळे नाश
पावली.त्यामध्ये मथुरा येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर तसेच गुजरात मधील
ऐश्वर्यसंपन्न सोमनाथ मंदिर यांचा समावेश होता.
2. दिल्लीवर कोणकोणत्या घराण्यानी राज्य केले?
उत्तर – दिल्लीवर खालील घराण्यांनी राज्य केले.
1.गुलाम
2.खिलजी
3.तुघलक
4.सय्यद
5.लोदी
3. कुतुबुद्दीन ऐबकाची कामगिरी लिहा.
उत्तर – कुतुबुद्दीन ऐबक हा सुरुवातीला मोहम्मद घोरीचा गुलाम होता
त्यामुळे त्यांना गुलाम वंशाचा म्हणतात.त्याने
शत्रूला जिंकून तुर्कांचे राज्य बळकट केले.आपल्याला मिळालेल्या विजयाची
आठवण म्हणून दिल्ली येथील मेहरोली मध्ये कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली.
4. अल्लाउद्दीन खिलजीची महत्वाकांच्छा काय होती?
उत्तर – संपूर्ण
भारत जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणावे अशी अल्लाउद्दीन यांची महत्वकांक्षा होती.
5. महंमद बिन तुघलकाने कैलेले प्रयोग कोणते?
उत्तर – तुघलक घराण्यामध्ये महम्मद बिन तुघलक हा प्रमुख सुलतान होऊन
गेला.त्याने आपली राजधानी दिल्ली ऐवजी भारताच्या मध्यभागी असलेल्या देवगिरी येथे
केल्यास ते आपल्याला आपल्या साम्राज्याचे मध्यवर्ती ठिकाण होईल असे त्याचे मत होते
आणि चांदीच्या नाणे ऐवजी तांब्याची तेवढ्याच तांब्याची नाणी चलनात आणली.परंतु
तांब्याची नाणी छापण्याचा अधिकार फक्त सरकारलाच असेल अशी राजाज्ञा केली
नाही.त्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला इत्यादी महम्मद बिन तुघलकने केलेले प्रयोग
होय.
6. दिल्लीच्या सुलतानानी वास्तुशिल्पकला व साहित्याला दिलेले
योगदान कोणते?
उत्तर – दिल्ली सुलतानांच्या काळातील प्रमुख वास्तुशिल्प म्हणजे
प्रसिद्ध कुतुबमिनार (71 मी.उंच) अलाई दरवाजा हे सुंदर द्वार कव्वत-उल-इस्लाम मशीद
आणि सिरी किल्ला हे होत.
अमीर
खुस्त्रो हा संगीतकार होता.जयशी कवीने पद्मावत हे सुफी काव्य लिहिले.कबीर,राईदास,मीरा
यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली.
IV. अ गटातील घटकांचा ब गटातील घटकाशी जोड्या जुळवा.
अ ब
जयशी पद्मावत
दौलताबाद देवगिरी
अल्लाउद्दीन
खिलजी अलाई दरवाजा
अमीर खुस्रो सितार