8TH SCIENCE 8. JOR ANI DAAB 8.जोर आणि दाब (Force And Pressure)




इयत्ता – आठवी 

विषय – विज्ञान 

घटक – 8 

PART – 1 

बल आणि दाब  (Force And Pressure)







SHORT NOTES 

बल – वस्तू ढकलणे किंवा ओढणे म्हणजे बल होय बल ‘F’ ने दर्शवतात.

बलाचे SI एकक न्यूटन (N)

बलाचे परिणाम

पदार्थाच्या आकारात बदल होतो.

पदार्थाच्या वेगात बदल होतो.

उदा.- चेंडूला लाथ मारणे,गोलकीपर ने बॉल वाचविला,टेबलावरील पुस्तक उचलणे इत्यादी.

 F= ma    बल = वस्तुमान × प्रवेग




  

समान बल आणि असमान बल

संतुलित बल जर पदार्थावर कार्य करणारी दोन बले सारखीच असतील तर त्या संतुलित बल म्हणतात. संतुलित बलामुळे पदार्थ आहे त्याच स्थितीत राहतो.

असंतुलित बल – जर पदार्थावर कार्य करणारी दोन बले भिन्न असतील तर त्यास असंतुलित बल म्हणतात.

असंतुलित बलामुळे वस्तूची स्थिती बदलते.वेगात बदल होतो. दिशा बदलते.

संपर्कातील बल – दोन वस्तूंचा किंवा पदार्थांचा एकमेकात संपर्क येतो व कार्य घडते तेव्हा लागलेला बल म्हणजे संपर्कातील बल होय.

A. स्नायू बल –स्नायूच्या क्रियेमुळे निर्माण होणाऱ्या बलास स्नायू बल असे म्हणतात.

उदा. बैलगाडी द्वारे बैलांची शारीरिक क्रिया करून ओझे वहन करणे.

B.घर्षण बल –पदार्थाच्या गतीत बदल घडवून आणणाऱ्या बलास घर्षण बल म्हणतात.

उदा. मैदानावरून चेंडू घरंगळत जाणे,पाण्यातील बोट वल्हे मारल्याने बोट पुढे जाते इत्यादी.




असंपर्कीय बल- दोन वस्तूंचा किंवा पदार्थांचा एकमेकात संपर्क येत नाही व कार्य घडते तेव्हा लागलेला बल म्हणजे असंपर्कीय बल होय

A.चुंबकीय बल चुंबकm लोखंडी वस्तूंना आकर्षणाचा जो लावतो आणि वस्तू स्वतःकडे खेचून घेतो येथे असंपर्कीय बल दिसतो.

B. विद्युत स्थितीज बल – भारीत पदार्थाने दुसऱ्या भार नसलेल्या पदार्थावर किंवा भार असलेल्या पदार्थावर निर्माण केलेला बल म्हणजे विद्युत स्थितीज बल होय. उदा.रेशमी कापड प्लास्टिक खुर्चीवर विद्युत स्थितीज बल निर्माण करते,कंगवा व केस

C. गुरुत्व बल- पदार्थ हवेत फेकला असता जमिनीवर पडतो कारण पृथ्वी त्यांना आकर्षित करून घेते या बलास गुरुत्व बल म्हणतात.(गुरुत्वाकर्षण)

 उदा.- चेंडू वरती उधळल्यास जमिनीवर पडतो.




दाब –एकक क्षेत्रफळावर कार्य करणाऱ्या बलास दाब म्हणतात.

 

 

दाबाचे SI एकक – N/m2  (Nm-2)    

पास्कल या शास्त्रज्ञाने दाबा विषयी तत्वे मांडली म्हणून दाबाचे SI एकक Pa होय.

वातावरणीय दाब –एकक क्षेत्रातील हवेच्या वजनाला वातावरणीय दाब म्हणतात.

आपल्या शरीरातील दाब हा वातावरणातील दाबा इतकाच असतो.




स्वाध्याय –

1. वस्तूच्या गतीच्या अवस्थेत बदल होण्याकरीता ओढणे किंवा ढकलणे या स्थितीची प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे द्या.

ओढणे  – विहिरीतून पाणी काढताना आपण दोरी ओढतो,फुटबॉल खेळाडूने पेनल्टी कीक मारणे.

ढकलणे- ड्रॉवर काढताना,दरवाजा बंद किंवा उघडताना

2. प्रयुक्त केलेल्या बलामुळे वस्तूच्या आकारात बदल होणाऱ्या स्थितीची दोन उदाहरणे द्या.

उत्तर – पीठ मळताना ,फुगा फुगवताना

3. खालील विधानातील रिकाम्या जागा भरा.

(a) विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपणाला दोर ओढावा लागतो.

(b) प्रभारीत वस्तू अप्रभारीत वस्तूला आपल्याकडे आकर्षून घेते.

(c) भरलेली ट्रॉली सरकविण्याकरीता आपल्याला तिला ढकलावे लागते.

(d) चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला अपसरण  करतो.




4. आपल्या लक्ष्यावर नेम धरताना धर्नुधारी आपले धनुष्य ताणतो नंतर बाण सोडते जो बाण लक्षाकडे जातो. या माहीतीवरुन खालील विधानातील रिकाम्या जागा खालील शब्द वापरुन भरा.

स्नायूंचे, संपर्क, असंपर्क, गुरुत्व, घर्षण, आकार,आकर्षण

(a) धनुष्य ताणण्यासाठी धर्नुधारी जे बल लावतो त्यामुळे त्याच्या आकारांमध्ये बदल होतो.

 (b) धनुधारीने धनुष्य ताणण्याकरिता वापरलेले बल हे स्नायू बलाचे उदाहरण आहे.

(c) बाणाच्या गतीच्या अवस्थेत होणाऱ्या बदलास जबाबादार असणाऱ्या बलाचा प्रकार संपर्क बल या प्रकारचे उदाहरण आहे.

(d) जेव्हा बाण आपल्या लक्ष्याकडे जातो त्याबर कार्य करणारे बल हवेच्या घर्षणामुळे आणि गुरुत्वामुळे कार्य करते.

5. खालील स्थितीमध्ये बल आणि ज्या पदार्थावर ते कार्य करते त्यांच्यात प्रयत्न करणारे मध्यस्थ ओळखा प्रत्येक स्थितीत बलाचे परिणाम सांगा.

(a) लिंबूचे काप (फोडी) बोटामध्ये धरुन पिळणे.

उत्तर – लिंबूच्या
फोडींचा आकार बदलतो.

(b) टुथपेस्ट असलेल्या ट्युबमधून टुथपेस्ट बाहेर
काढणे.

उत्तर – टूथपेस्ट बाहेर काढले तर ट्यूबचा आकार बदलतो.

(c) भिंतीवर टांगलेल्या स्प्रिंगला वजन अडकविणे.

उत्तर – स्प्रिंगचा आकार बदलतो.

(d) उंचीवर ठेवलेल्या बार वरुन उडी घेण्याकरीता खेळाडूने मारलेली उंच उडी.

उत्तर – खेळाडूंमध्ये गती निर्माण होते.




6 लोहार उपकरणे बनविण्यासाठी तप्त लोखंडाचा तुकडा हातोडयाने ठोकतो. हातोडयाने ठोकल्यानंतर निर्माण झालेले बल लोखंडाच्या तुकडयावर कसा परिणाम करते?

उत्तर – लोखंडाच्या तुकड्यावर जर हातोडा मारला तर लोखंडाचा आकार बदलतो.तो लोखंडी पत्रा पातळ व चपटा होतो.

7. कृत्रिम धाग्यांनी बनविलेल्या कापडावर फुगविलेला फुगा घासल्यानंतर तो भिंतीवर दाबला तर तो भिंतीवर चिकटल्याचे आढळले. फुगा आणि भिंत यांच्यातील आकर्षणास कोणते बल कारणीभूत आहे?

उत्तर – फुगा आणि भिंत यांच्यातील आकर्षणास विद्युत स्थितीज बल कारणीभूत आहे.

8. पाण्याने भरलेली प्लॅस्टिकची बादली तुमच्या हातात धरलेली असताना तिच्यावर कोणती बले कार्य करतात त्यांची नांवे लिहा. बादलीवर कार्य करणारे बल तिच्या गतीच्या अवस्थेत बदल का घडवून आणत नाहीत याची चर्चा करा.

उत्तर – पाण्याने भरलेली प्लास्टिकची बादली आमच्या हातात धरलेली असताना तिच्यावर स्नायू व गुरुत्व बल व कार्य करतात.स्नायू व गुरुत्व बल विरुद्ध असतात त्यामुळे गती निर्माण होत नाही.

9. उपग्रह त्याच्या कक्षेत सोडण्याकरिता रॉकेट वरील दिशेने
पेटविले गेले लॉचिंग पॅड सोडल्यानंतर तात्काळ रॉकेटवर कार्य करणाऱ्या दोन बलांची
नांवे सांगा.

उत्तर – गुरुत्व बल वातावरणीय घर्षण बल इत्यादी

10. जेव्हा आपण ड्रॉपरचा फुगा पाण्यात असताना दाबतो, तेव्हा त्याच्यातील हवा बुडबुडयाच्या स्वरुपात बाहेर पडते फुग्यावरील दाब एकदा काढल्यानंतर फुग्यात पाणी भरले जाते. फुग्यात पाणी वर चढण्याचे कारण

(a) पाण्याचा दाब

(b) पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण

(c) रबराच्या फुग्याचा आकार

(d) हवेचा (वातावरणाचा) दाव

उत्तर – हवेचा दाब







 

Share with your best friend :)