इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
घटक – 6
भौतिक आणि रासायनिक बदल
1. खालील प्रमाणे दिलेल्या बदलांचे भौतिक आणि रासायनिक बदलात वर्गीकरण करा.
(a) प्रकाश
संश्लेषण (b) पाण्यात
साखर विरघळवणे (c) कोळसा जाळणे
(d)
मेण वितळणे (e) अॅल्यूमिनीयम बडवून पातळ पत्रा
बनविणे (f) अन्नाचे पचन
उत्तर – |
भौतिक बदल | रासायनिक बदल |
(b) पाण्यात (d) मेण वितळणे (e) अॅल्यूमिनीयम | (a) प्रकाश (c) कोळसा (f) अन्नाचे |
2. खालील विधाने बरोबर की चूक ओळखा आणि चुकीची विधाने दुरुस्त करुन तुमच्या वहीत
लिहा.
(a) लाकडाचा ओंडका कापून त्याचे तुकडे करणे हा रासायनिक ( बरोबर / चूक)
उत्तर – चूक
कारण – लाकडाचा ओंडका कापून त्याचे तुकडे करणे
हा भौतिक बदल आहे.
(b) पानांपासून सेंद्रीय खत बनविणे हा भौतिक बदल आहे. (बरोबर / चूक)
उत्तर – चूक
कारण – पानांपासून सेंद्रिय खत बनविणे
हा रासायनिक बदल आहे
(c) झींकचा मुलामा दिलेले लोखंडी पाईप सहज गंजत नाहीत. (बरोबर / चूक)
उत्तर – बरोबर
(d) लोखंड आणि गंजलेली राख हे दोन्ही पदार्थ एकच आहेत (बरोबर
/ चूक)
उत्तर – चूक
– लोखंड आणि गंजलेली राख हे दोन्ही पदार्थ एकच
नाहीत.गंजलेले राख लोखंडाचे ऑक्साइड असते.
(e) वाफेचे द्रवीभवन हा रासायनिक बदल नाही. (बरोबर / चूक)
उत्तर – चूक
– वाफेचे द्रवीभवन हा भौतिक बदल आहे
3. खालील वाक्यामधील रिकाम्या जागा भरा.
(a) चुन्याच्या
निवळीतून कार्बनडाय ऑक्साईड वायू जाऊ दिल्यास निवळी पांढरीशुभ्र दुधासारखी कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) मुळे
होते.
(b) बेकींग
सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट
आहे.
(c) लोखंडाचे
गंजणे टाळण्याचे दोन उपाय रंग लावणे आणि लोखंड दमट हवेच्या संपर्कात न येणे हे आहेत.
(d) पदार्थांच्या गुणधर्मात बदल झाल्यास
त्या बदलाला भौतिक बदल म्हणतात.
(e) ज्या बदलामुळे
नविन पदार्थाची निर्मिती होते त्याला रासायनिक
बदल म्हणतात.
4. बेकींग सोडा लिंबूरसात मिसळल्यास बुडबुड्यांच्या स्वरुपात वायू निर्माण होतो.
हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? स्पष्टीकरण करा.
उत्तर – बेकिंग सोडा
लिंबू रसात मिसळणे हा एक रासायनिक बदल आहे.यावेळी लिंबू रसातील सीट्रीक आम्ल बेकिंग सोड्याबरोबर क्रिया करून कार्बन डायऑक्साईड
वायू बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो व इतर पदार्थ तयार होतात.
5. मेणबत्ती जळताना दोन्ही प्रकारचे बदल-भौतिक आणि रासायनिक बदल घडून येतात ते
बदल ओळखा. अशाप्रकारचे आपल्या परिचयाचे आणखी एक उदाहरण द्या ज्यामध्ये भौतिक आणि रासायनिक
असे दोन्ही बदल एकाचवेळी घडून येतात.
उत्तर – मेणबत्ती जळत
असताना दिसून येणारे फरक खालील प्रमाणे
भौतिक बदल | रासायनिक बदल |
मेणबत्तीचे में वितळणे | मेणबत्तीची वात जळून |
वरील बदल आपल्याला एकाच वेळी घडत असलेले दिसून येतात
अशा प्रकारचे बदल आपण 1)अन्नाचे पचन होणे व 2) ओल्या लाकडाचे जळणे यामध्ये पाहू शकतो.
6. दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल आहे हे कसे स्पष्ट कराल?
उत्तर – दुधापासून
दही बनवणे हा एक कायमस्वरूपी बदल आहे.यामध्ये बॅक्टेरिया दुधाचे रासायनिक क्रिया च्या
सहाय्याने दह्यामध्ये रूपांतर करतात.यावरून हा एक रासायनिक बदल आहे हे स्पष्ट होते.
7. लाकडाचे जळणे आणि कापून तुकडे करणे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत हे
कसे स्पष्ट कराल?
लाकडाचे जळणे | कापून तुकडे करणे |
1. कायमस्वरूपी रासायनिक 2.लाकूड जळून नवीन | 1.भौतिक बदल 2. लाकूड कापल्या |
वरील निरीक्षणानुसार
हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत हे स्पष्ट होते.
8. कॉपर सल्फेटचे स्फटिक कसे तयार करतात त्याचे वर्णन करा.
साहित्य – पाणी,कॉपर
सल्फेटचे स्फटिक,चंचुपात्र,ढवळणी
कृती – कॉपर सल्फेट
हे निळ्या रंगाच्या स्फटिक स्वरूपात असते.हे स्फटिक एका छोट्या साधनामध्ये बारीक पूड
करून घ्या.आता ही पूड 10 मिली पाणी असलेल्या चंचुपात्रात घाला.ढवळणीच्या सहाय्याने
हळूहळू ढवळा.पाण्याला निळा रंग प्राप्त झालेला दिसून येतो.
सिद्धता – वरील तयार
मिश्रणाला कॉपर सल्फेटचे द्रावण असे म्हणतात.
9. लोखंडाला गंजण्यापासून रोखण्यासाठी त्याला रंगविणे हे कसे उपयोगी पडते ते सांगा.
उत्तर – लोखंडाला रंग
दिल्यामुळे त्याचा बाहेरील हवेशी येणारा थेट संपर्क खंडित होऊन ऑक्सिडेशन क्रियेला
आळा बसतो.यामुळे गंजण्याची क्रिया रोखण्यासाठी त्याला रंग देणे उपयोगी पडते.
10. लोखंडी वस्तू गंजण्याची क्रिया वाळवंटी प्रदेशापेक्षा किनारपट्टी वरील प्रदेशात
जलद गतीने का होते याचे वर्णन करा.
उत्तर – लोखंडी वस्तू
गंजण्याची क्रिया होण्यासाठी हवेत दमटपणा असण्याची आवश्यकता असते. वाळवंटी प्रदेशातील
तापमान जास्त असल्यामुळे दमटपणा कमी असतो.पण किनारपट्टीजवळ प्रदेशात दमटपणा जास्त असल्यामुळे
वस्तू बनवण्याची क्रिया जलद गतीने होते.
11. स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या गॅसला (Liquified Petrolemum
Gas-LPG) द्रवरुप पेट्रोलीयम वायू म्हणतात. सिलींडरमध्ये हा वायू द्रवरुपात
असतो. जेव्हा सिलिंडरमधून हा वायू बाहेर येतो त्यावेळी त्याचे रुपांतर वायूत होते
(A-बदल) त्यानंतर तो जळतो (बदल- B) या संबंधी
खाली काही विधाने दिली आहेत त्यापैकी अचूक वाक्य ओळखा.
(i) A ही क्रिया
रासायनिक बदल आहे.
(ii) B ही क्रिया
रासायनिक बदल आहे.
(iii) A व B
दोन्ही क्रिया रासायनिक बदल आहेत.
(iv) यापैकी
कोणतीही क्रिया रासायनिक बदल नाही.
उत्तर – (ii)
B ही क्रिया रासायनिक बदल आहे.
12. अॅनारोबीक बॅक्टेरीया प्राण्यांनी उत्सर्जित केलेल्या पदार्थांचे पचन करुन
जैविक वायू (बायोगॅस) निर्माण करतात. (बदल-A) त्यानंतर हा वायू
जळणासाठी इंधन म्हणून वापरतात. (बदल-B) खालीलप्रमाणे या बदलासंबंधित
विधाने दिलेली आहेत. त्यापैकी अचूक विधान निवडा.
(i) A हा रासायनिक
बदल आहे.
(ii) B ही क्रिया
रासायनिक बदल दर्शविते.
(iii)
A व B हया दोन्ही क्रिया रासायनिक क्रिया आहेत.
(iv)
यापैकी कोणतीही क्रिया रासायनिक क्रिया नाही.
उत्तर – (iii)
A व B हया दोन्ही क्रिया रासायनिक क्रिया आहेत.