इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
घटक – 4
उष्णता
स्वाध्याय
1. प्रयोगशाळेतील तापमापक आणि वैद्यकीय तापमापक
यातील साम्य आणि फरक स्पष्ट करा.
उत्तरः प्रयोगशाळेतील तापमापक आणि वैद्यकीय तापमापक यातील साम्य -:
i) दोन्ही तापमापकात एकसारखी काचेची नलिका
असते.
ii) दोन्ही तापमापकात पारा असतो.
iii) दोन्ही प्रकारचे तापमापकावर अंश सेल्सिअसमध्ये
मापन करता येते.
फरक :
वैद्यकीय तापमापक | प्रयोगशाळेतील तापमापक |
पल्ला 35°C | पल्ला -10°C |
फुग्याजवळ खाच असते. | खाच नसते. |
2.उष्णतेचे वाहक आणि रोधक
यांची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या..
उत्तरः उष्णतेचे वाहक : अल्युमिनियम,लोखंड,तांबे
उष्णतेचे रोधक : प्लास्टिक,लाकूड
3.रिकाम्या जागा भरा.
(a) एखाद्या
वस्तुची उष्णता ही त्याच्या तापमानावरून निश्चित
केली जाते.
(b) उकळत्या
पाण्याचे तापमान वैद्यकीय तापमापकाने मोजणे शक्य नाही.
(c) तापमान हे
डीग्री सेल्सिअस मध्ये मोजले जाते.
(d) उष्णता संक्रमणाच्या
उत्सर्जन या प्रक्रियेत माध्यमाची आवश्यकत नाही.
(e) थंड चमचा
गरम दुधाच्या कपामध्ये बुडविला. त्यात उष्णता एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे संक्रमित
वहन या क्रियेद्वारे होते.
(1) गडद रंगाचे कपडे फिकट रंगाच्या कपड्यापेक्षा जास्त प्रमाणात
उष्णता शोषून घेतात.
4. जोड्या जुळवा.
A B
(i) जमिनीवरील
वारे वाहण्याचा काळ (a)
उन्हाळा
(ii) समुद्रावरील
वारे वाहण्याचा काळ (b) हिवाळा
(iii) गडद रंगाच्या
कपड्यांना या
कालावधीत
पसंदी दिली जाते (c) दिवस
(iv) फिकट रंगाच्या
कपड्यांना
या कालावधीत पसंती दिली जाते. (d) रात्र
उत्तर – :
A B
(i) जमिनीवरील
वारे वाहण्याचा काळ (d) रात्र
(ii) समुद्रावरील
वारे वाहण्याचा काळ (c) दिवस
(iii) गडद रंगाच्या
कपड्यांना या
कालावधीत
पसंदी दिली जाते. (b) हिवाळा
(iv) फिकट रंगाच्या
कपड्यांना
या कालावधीत पसंती दिली जाते. (a) उन्हाळा
5.हिवाळ्यात एकच परंतु जाड असलेले
कपडे घालण्याऐवजी एकावर एक असे जास्त कपडे घातल्यास ऊब मिळते याचे कारण काय याची चर्चा
करा.
उत्तरः कारण एकच जाड असलेले कपडे घातले तर काही
वेळाने तो जाड कपडा थंड पडतो व आपणास थंडी वाजू लागते.पण एकावर एक असे जास्त कपडे
घातल्यास त्यामध्ये असलेला हवेचा थर असतो.हवा
ही उष्णतेची मंदवाहक असल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर जात नाही.त्यामुळे आपणास
थंडी वाजत नाही.म्हणून हिवाळ्यात एकच जाड कपडा वापरण्याऐवजी एकावर एक असे दोन/तीन कपडे
घातल्यास ऊब मिळते.हिवाळ्यात एकच परंतु जाड असलेले कपडे घालण्याऐवजी एकावर एक असे जास्त
कपडे घालावेत.
6. 4.13 चित्र पहा. यात उष्णतेचे
संक्रमण हे वहन, अभिसरण, उत्सर्जन या क्रियेद्वारे कोठे होते ते दर्शवा. (चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात
पहा)
उत्तरः वहन – बर्नरपासून
भांड्यात उष्णतेचे संक्रमण वहन क्रियेद्वारे होते.
अभिसरण – पाण्यात उष्णतेचे संक्रमण अभिसरण क्रियेद्वारे
होते.
उत्सर्जन – बर्नर,जाळी व भांडे गरम झाल्याने भोवतालच्या
हवेत उष्णतेचे संक्रमण उत्सर्जन क्रियेने होते.
7. उष्ण हवामानाच्या प्रदेशात घरांच्या भिंती
बाहेरील बाजूने पांढऱ्या रंगाने रंगविण्याचा सल्ला देतात. कारण स्पष्ट करा.
उत्तरः गरम हवामानाच्या ठिकाणी,
घराच्या बाहेरील भिंती पांढऱ्या रंगाने रंगवण्याचा सल्ला दिला जातो कारण
पांढरा रंग त्यावर पडणाऱ्या प्राकाशाचे परावर्तन करतो.थोडक्यात आपण असे म्हणू शकतो
कीपांढरा रंग कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतो आणि घर थंड ठेवतो.
8. 30°C तापमान असलेले एक लीटर पाणी 50°C तापमान असलेल्या एक लीटर पाण्यात मिसळले तर त्या मिश्रणाचे तापमान
(i) 80°C
(ii) 50°C पेक्षा जास्त
आणि 80°C पेक्षा कमी
(iii) 20°C
(iv) 30°C ते 50°C
च्या मध्ये
उत्तर – (iv) 30°C ते 50°C च्या मध्ये
9. एका भांड्यात 40°C तापमान असलेले पाणी आहे. त्यात 40°C तापमान असलेला एक लोखंडी गोळा घातला तर उष्णता
(a) लोखंडी गोळ्यातून
पाण्यात जाईल.
(b) लोखंडी गोळ्यातून
पाण्यात जाणार नाही की पाण्यातून लोखंडी गोळ्याकडे.
(c) पाण्यातून
लोखंडी गोळ्याकडे जाईल.
(d) दोन्हीचे
तापमान वाढेल.
उत्तर – (b) पाण्यातून
लोखंडी गोळ्याकडे जाईल.
10.लोखंडी गोळ्यातून पाण्यात जाणार
नाही की एक लाकडी चमचा आईसक्रिममध्ये घातला तर त्याची दुसरा बाजू –
(a) वहन क्रियेने
थंड होईल.
(b) अभिसरण क्रियेने
थंड होईल.
(c) उत्सर्जन
क्रियेने थंड होईल.
(d) थंड होणार
नाही.
उत्तर – (d) थंड
होणार नाही.
11.स्टेनलेस स्टीलच्या (stainless steel) कढईला नेहमी तांबे या धातूचा तळ बसवितात.
याला कारण –
(a) तांब्याच्या
तळामुळे कढईचा टिकाऊपणा वाढतो.
(b) अशा कढया
आकर्षक दिसतात.
(c) तांबे स्टेनलेस
स्टीलपेक्षा उष्णतेचे चांगले सुवाहक आहे.
(d) तांबे स्टेनलेस
स्टीलपेक्षा स्वच्छ करण्यास सोपे जाते.
उत्तर (c) तांबे
स्टेनलेस स्टीलपेक्षा उष्णतेचे चांगले सुवाहक आहे.
GHHhzbz