इयत्ता – दुसरी
विषय – मराठी
घटक 3
बाहुलीची शाळा
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. शाळेमध्ये कोणाचे नाव घालायचे आहे ?
उत्तर – शाळेमध्ये बाहुलीचे नाव घालायचे आहे.
२. गणवेष कोण शिवून देणार ?
उत्तर – गणवेष आई शिवून देणार आहे.
३. पुस्तके घेण्यासाठी मुलगी कोठे जाऊ असे म्हणते?
उत्तर – पुस्तके घेण्यासाठी मुलगी शाळेतच जाऊ असे म्हणते.
४. डबा नको असे तिने का म्हटले आहे ?
उत्तर- शाळेत वरण भात जेवण असते म्हणून डबा नको असे तिने
म्हटले आहे.
५. शाळेच्या जेवणात कोणते पदार्थ आहेत?
उत्तर- शाळेच्या जेवणात वरण,भात हे पदार्थ आहेत.
इ.चूक की बरोबर ते सांगा.
१. शाळेत गणवेष घालून जावे. (बरोबर)
२. शाळेत कधीही जावे. (चूक)
३. वर्गात खूप दंगा करावा. (चूक)
४. शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण करावा. (बरोबर)
५. गुरुजनांचा नेहमी आदर ठेवावा. (बरोबर)
ई. खालील दिलेल्या शब्दांच्या मदतीने रिकाम्या
जागा भर.
(वर,बरोबर,मध्ये,जवळ)
१. घराजवळ देऊळ आहे.
२. बागेमध्ये गुलाबाचे झाड आहे.
३. झाडावर पेरु आहे.
४. मी, आईबरोबर बाजारात जाईन.