इयत्ता – पाचवी
विषय – माय मराठी
पाठ 9 – दसरा झाला हसरा.
नवीन शब्दाचे अर्थ-
सीमोल्लंघन – दसऱ्याचे शिलंगण
चटकदार –
छान
नवल – आश्चर्य
खमंग -स्वादिष्ट,
रुचकर
सरबत्ती करणे -वर्षाव करणे आयडिया (इंग्लिश
शब्द) – कल्पना
त्रिकुट – तीन जणांचा समूह
आ. खालील प्रश्नांची एका वाक्यात
लिही.
1. देवळात कशाचा सुगंध दरवळत होता?
उत्तर – देवळात फुलांचा ,उदबत्त्यांचा
सुगंध दरवळत होता.
2. मिरवणूक कोणाची निघणार होती?
उत्तर – देवीच्या सिमोल्लंघनाची मिरवणूक निघणार
होती.
3.राधा कोठे उभी होती?
उत्तर – राधा कोपर्यात उभी होती.
4. फुलांचे हार कोणी करुन दिले
होते?
उत्तर – फुलांचे हार राधाच्या आईने करुन दिले
होते.
5.गजरे कोणी विकले?
उत्तर – मुग्धा आणि राधाने गजरे विकले.
6. समीर व प्रकाश यांनी काय विकले
?
उत्तर – समीर व प्रकाश यांनी हार विकले.
7. दसरा हसरा का झाला?
उत्तर – आपली वर्ग मैत्रीण राधाला मदत
केल्यामुळे मुलांचा दसरा हसरा झाला.
इ. रिकाम्या जागी योग्य शब्द भर.
1. मुग्धाला रंगीबेरंगी बांगड्या घ्यावयाच्या होत्या.
2. वर्गमित्रांना पाहून राधा थोडी भांबावली.
3. आपल्याला आई-बाबा रागावणार नाहीत.
4. गजरे घ्या गजरे सुंदर,सुंदर गजरे.
5. हार घ्या हार छान,छान हार.
6. राधा त्यांच्याच वर्गात शिकत होती.
खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात
उत्तरे लिही.
1. जत्रेत कशाकशाची दुकाने आली होती?
उत्तर – जत्रेत पूजा साहित्य,खेळणी व खाऊची
दुकानं आली होती.
2. मुग्धाने राधाला कोणकोणते प्रश्न
विचारले ?
उत्तर – मुग्धाने राधाला “राधा,
तू इथं कशी? आणि हे हार गजरे कसले? आणि तुला नाही का या जत्रेत फिरायचं?” असे प्रश्न
विचारले.
3. राधा हार गजरे विकण्यास का आली
होती?
उत्तर – कारण राधाचे बाबा आजारी होते. त्यामुळे
ते कामाला जाऊ शकत नव्हते.त्यामुळे राधाची आई एका दुकानात कामाला जात होती.पण
राधाने खूप शिकाव असं तिला वाटायचं.म्हणून मग राधाला ती कांही काम करु देत नव्हती.
पण सुट्टीच्या दिवशी कांहीतरी काम करुन तिला हातभार लावायचाच असं ठरवून आईने
दिलेले हार ,गजरे विकण्यास ती आली होती.
4. मित्र मैत्रिणीनी राधाला कशी मदत
केली?
उत्तर – मित्र-मैत्रिणीनी राधाचे हार,गजरे
विकून मदत केली.समीर आणि प्रकाशाने हार विकले आणि मुग्धा व राधाने गजरे विकले.
5. प्रकाशने काय करण्याचे ठरविले?
उत्तर – प्रकाशने राधाला तिचे हार,गजरे
विकून तिला मदत करायची व त्यानंतर सर्वांनी भेळ खाऊन यात्रेचा आनंद घ्यायचे
ठरविले.
खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते
लिही.
1.“अग, हो हो, एकदम किती प्रश्न विचारतेस!”
उत्तर – वरील वाक्य समीरने मुग्धाला
उद्देशून म्हटले आहे.
2.”अगं माझे बाबा आजारी आहेत”
उत्तर – वरील वाक्य राधाने आपली वर्गमैत्रीण
मुग्धाला उद्देशून म्हटले आहे.
3.”आता पणबिण कांही नाही”
उत्तर – वरील वाक्य प्रकाशने राधाला
उद्देशून म्हटले आहे.
4.“आपल्याला आई बाबा रागावणार नाहीत.”
उत्तर – वरील वाक्य मुग्धाने सर्व मित्र
मैत्रीणीना उद्देशून म्हटले आहे.