पाठ 10
मूलभूत हक्क आणि कर्तव्य
————————————
प्रश्न (1) मूलभूत हक्क म्हणजे काय?
उत्तर — व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संविधानाने दिलेल्या
संधी म्हणजेच मूलभूत हक्क होय
प्रश्न (2) हक्क म्हणजे काय?
उत्तर– हक्क म्हणजे नागरिकांना मिळालेले अधिकार होय
प्रश्न (3) मूलभूत हक्काचे प्रकार
सांगा.
उत्तर– 1)समानतेचा हक्क
२) स्वातंत्र्याचा हक्क
3) शोषणाविरुद्ध हक्क
4) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
5) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
6) न्यायालयात दाद मागण्याचा हक्क
प्रश्न (4) स्वातंत्र्याच्या हक्कात
कोणते अधिकार येतात?
उत्तर- 1 )भाषण व विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य
2) शांततेने सभेत भाग घेण्याचे स्वातंत्र्य
3 )संघ संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य
4) देशात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य
5 )भारतात कोठे वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य
6) कोणताही व्यापार व्यवसाय धंदा करण्याचे स्वातंत्र्य
प्रश्न (5) रिट अर्ज कशाला म्हणतात?
उत्तर मूलभूत हक्कासंबंधी सर्वोच्च न्यायालयात अथवा उच्च न्यायालयात
दाद मागण्याच्या अर्जाला रिट अर्ज म्हणतात
प्रश्न (6) न्यायालयात दाद मागण्याचा
हक्क म्हणजे काय?
उत्तर– मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक न्यायालयात दाद मागू
शकतो या हक्काला संविधानानुसार न्यायालयात दाद मागण्याचा हक्क असे म्हणतात
प्रश्न (7 ) समानतेचा हक्क म्हणजे काय?
उत्तर– कायद्यासमोर सर्वजण समान आहेत कायद्यापेक्षा कोणीही मोठे
नाही सर्वांना समान संरक्षण मिळावे याच समानतेचा हक्क म्हणतात
प्रश्न (8) मुलभूत कर्तव्य कोणते?
उत्तर — 1 )राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा मान राखणे
2) भारताच्या एकात्मतेचे रक्षण करणे
3) मातृभूमीचे रक्षण करणे 4 )वैज्ञानिक
मनोभाव वैचारिकता वाढवणे
5) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे
6 )ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण करणे
7 )भारतीय आहोत ही भावना वाढवणे
8) 6 ते 14 वयोगटातील मुलांना
मोफत शिक्षण प्राप्त करणे