SATAVI VIDNYAN 3. TANTU TE VASTRA

 


 

घटक 3. तंतू ते वस्त्र

प्रश्नोत्तरे 

%25E0%25A4%2597%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4

रिकाम्या जागा भरा.

1.कृत्रिम तंतूंना कृत्रिम अथवा मानवनिर्मित
तंतू संबोधतात.

2.कृत्रिम तंतू ची निर्मिती कच्चा मालापासून केली जाते त्याला पेट्रोकेमिकल्स
असे म्हणतात.

3.रेयन धागा (तंतू) लाकडी लगद्यापासून
प्राप्त करतात.

4.कृत्रिम तंतू प्रमाणे प्लास्टिक ही एक पॉलिमर आहे.




 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. तंतू
याचा अर्थ काय
?

उत्तर – तंतू याचा
अर्थ धागा असा होतो.

2. आपण
कपडे का वापरतो
?

उत्तर – आपण कपडे शरीर झाकण्यासाठी,सुंदर दिसण्यासाठी,ऊन,वारा,थंडी,पाऊस
यापासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी वापरतो.

3. नैसर्गिक
धागे कशापासून प्राप्त होतात उदाहरणे द्या.

उत्तर – नैसर्गिक धागे वनस्पती व प्राण्यांच्या पासून प्राप्त
होतात उदा
. कापूस,लोकर,रेशीम,ताग इत्यादी.

4. कृत्रिम
धागे कशापासून तयार होतात
?

उत्तर – कृत्रिम धागे रासायनिक पदार्थांपासून तयार होतात उदा. नायलॉन,पॉलिस्टर
इत्यादी.

5. रेशीम
तंतू कशापासून प्राप्त करतात
?

उत्तर – रेशीम तंतू रेशीम केल्यापासून प्राप्त करतात.

6. कृत्रिम
रेशीम म्हणून कोणत्या धाग्याला ओळखतात
?

उत्तर – रेयॉन धाग्याला कृत्रिम रेशीम म्हणून ओळखतात.




 

7. नायलॉन
पासून बनवलेल्या वस्तूंची उदाहरणे द्या.

उत्तर – नायलॉन पासून मोजे,दात स्वच्छ
करण्याचे ब्रश
,कारच्या शेडचे पट्टे,स्लीपिंग बॅग,पडदे
इत्यादी वस्तू बनतात.

8. नायलॉनच्या
धाग्याचा उपयोग पर्वत चढण्यासाठी पॅराशूट आणि दोर बनवण्यासाठी
करतात
कारण काय
?

उत्तर –  कारण नायलॉन धागा स्टील तारेपेक्षा मजबूत
असतो म्हणून तो पॅराशूट आणि दोरखंड बनवण्यासाठी उपयोग करतात.

9. कोणत्या
धाग्या पासुन बनलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत
?

उत्तर –  पॉलिस्टर धाग्यापासुन
बनलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत
.

10. कृत्रिम
धागे
हे नैसर्गिक धाग्यापेक्षा
अधिक लोकप्रिय आहेत कारण काय
?

उत्तर – कारण कृत्रिम धाग्यापासून
बनलेले कपडे स्वस्त,टिकाऊ आणि आकर्षक असतात.म्हणून कृत्रिम धागे हे नैसर्गिक धा
ग्यापेक्षा अधिक
लोकप्रिय आहेत

11. कृत्रिम
धाग्याचे गुणधर्म लिहा.

उत्तर – कृत्रिम धाग्याचे गुणधर्मात खालील प्रमाणे

              1.     
लवकर वातात

              2.     
टिकाऊ असतात.

              3.     
स्वस्त असतात.

             4.     
अधिक आकर्षक असतात.

                     


 

12. हिवाळ्यामध्ये
वापरले जाणारे स्वेटर,शाल,चादरी या कशापासून बनले
ल्या
असतात
?

उत्तर – हिवाळ्यामध्ये वापरले जाणारे स्वेटर,शाल,चादरी जरी लोकराप्रमाणे
दिसत असल्या तरी त्या नैसर्गिक लोकरीपासून बनवलेल्या नसतात.कारण नैसर्गिक लोकर फार
महाग असते.त्यामुळे
स्वस्त असलेल्या आर्कलिक नावाच्या रासायनिक
धाग्यापासून या वस्तू बनविलेल्या असतात.

13. तुमच्या
घरातील काही प्लास्टिक वस्तूंची नावे लिहा.

उत्तर – प्लास्टिक भांडी,खेळणी,पिशव्या,टेबल-खुर्ची,धागे,शुभेच्छा
वस्तू इत्यादी अनेक वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आम्ही घरी वापरतो.

14. काही
धातूच्या भांड्याच्या मुठींना व इलेक्ट्रिक उपकरणांना प्लास्टिकचे वेस्टन किंवा
कव्हर बसवलेले
असते
का
?

उत्तर – कारण प्लास्टिक हे उष्णतेचे आणि विद्युतप्रवाहाचे मंद वाहक
असते.उष्णतेमुळे मिळणारा चटका आणि विद्युत प्रवाहामुळे मिळणारा झटका
आपणाला बसू नये म्हणून काही धातूंच्या भांड्याच्या मूर्तींना व इलेक्ट्रिक
उपकरणांना प्लास्टिकचे वेस्टन बसवलेले असते.

15. प्लास्टिकचे
गुणधर्म लिहा.

उत्तर – प्लास्टिकचे गुणधर्म खालील प्रमाणे 

 1. प्लास्टिक अक्रियाशील असते.

2. हलके टिकाऊ मजबूत असते.

3.उष्णता,विद्युतप्रवाहाचे मंदवाहक असते.






 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now