SATAVI MARATHI 5. RASHTRIYA KHEL – HOKEY (5. राष्ट्रीय खेळ – हॉकी)


सातवी- मराठी 

5. राष्ट्रीय खेळ – हॉकी

नवीन
शब्दार्थ

v
नितांत   – फार

v
सांघिक
– संघभावना

v
भन्नाट
– अतिशय
, प्रचंड

v
निकोप
– रोगमुक्त
, निरोगी

v
सुदृढ
– सशक्त

v
कयास
– कल्पना

v
यार्ड
– तीन फूट लांबीचे मापन

v
कसब –
कौशल्य

v
वर्चस्व
– हुकुमत

v
प्रतिष्ठित
– आदराचे स्थान

v
शिरस्त्राण
–  डोक्यावरील सुरक्षा कवच

v
ग्लोव्हज
– हातातील मोजे

अ.
एका वाक्यात उत्तरे लिही.

1. भारताचा
राष्ट्रीय खेळ कोणता
?

उत्तर –
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.

2. हॉकीचा जादूगारअसे कोणाला म्हणतात ?

उत्तर – मेजर
ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असे म्हणतात.

3.
हॉकी या खेळात कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो
?

उत्तर – हॉकी
या खेळात चेंडू,ब्लाऊज,बूट,हॉकी स्टिक,पेड व सिंहगड या साधनांचा वापर केला जातो.

4.
हॉकीच्या खेळाच्या मैदानाची लांबी व रुंदी किती असते
?

उत्तर – हॉकीच्या
खेळाच्या मैदानाची लांबी 100 यार्ड व रुंदी 60 यार्ड असते.

5.
हॉकी या खेळाचा अवधी किती मिनिटांचा असतो
?

उत्तर – हॉकी
खेळाचा अवधी 35-35 मिनिटांच्या दोन अवधी चा असतो.

6.
गोल केव्हा झाला असे मानतात
?

उत्तर – ज्यावेळी
एखादा खेळाडू स्टिक ने चेंडूला मारून गोल पोस्ट मधील क्रॉस बार पार करतो तेव्हा
गोल झाला असे म्हणतात.

आ.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण कर.

1.पूर्वी आयर्लंड मध्ये हॉकी हा खेळ हर्ली या नावाने खेळला जात असे.

अ. शिंटी

ब. हर्ली

क. बॅडी

ड. हॉकी

2. गोलरेषांशी समांतर असणाऱ्या रेषेस निदान रेषा  म्हणतात.

अ. गोलरेषा  

ब. निदान रेषा 

क. मध्यरेषा 

ड.अंत्य रेषा

3. हॉकी खेळामध्ये पांढरा रंगाचा चेंडू असतो.

अ. पांढरा

ब. लाल

क. पिवळा

ड. काळा






इ.
दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिही.

1.
खेळामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात
?

उत्तर – खेळामुळे
खालील फायदे होतात.

v
खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात.

v
साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुण वाढीस लागतो.

v
शरीर कार्यक्षम बनते.

v
खेळामुळे
आत्मविश्वास वाढतो.

2.
हॉकी या खेळात कोणत्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत
?

उत्तर – प्रचंड शारीरिक क्षमता, विजेसारखी चपळाई, भन्नाट
वेग व चेंडूवर ताबा मिळविण्याचे कसब,तीक्ष्ण नजर,चपळ शरीर,लवचिकपणा या गोष्टी हॉकी
या खेळात फार महत्वाच्या आहेत.

3.
हॉकी या खेळातील स्टिक्सचे वर्णन करा.

उत्तर – हॉकी
स्टिक लाकडी असते तिचा आकार छत्रीच्या दांडयासारखा असतो. ती डाव्या बाजूला कांहीशी
चपटी तर दुसऱ्या बाजूला गोल असते. स्टिकचे वजन पुरुषांसाठी 798 ग्रॅमपेक्षा जास्त
नसावे व महिलांसाठी 652 ग्रॅम पेक्षा जास्त नसावे. स्टिकच्या खालच्या बाजूस
आकाराचे वळण असते.
या वळणातून दोन इंच व्यास असलेला चेंडू सहज निघून जाऊ शकतो.

4.
तुझ्या शब्दात हॉकी या खेळाचे वर्णन करा.

उत्तर – भारतात सर्वप्रथम हॉकी हा खेळ कोलकात्यात खेळला गेला.
हा भारताचा राष्ट्रीय मैदानी खेळ आहे. दोन संघांत हा खेळ खेळला जातो. महिला व पुरुष
, मुले, मुली हा खेळ खेळतात. मेजर ध्यानचंद यांनी या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली. हॉकी
या खेळाचे मैदान आयताकृती असते.
हॉकीच्या खेळाच्या मैदानाची लांबी 100 यार्ड व रुंदी 60
यार्ड असते.हॉकीच्या एका संघात 11 खेळाडू असतात.

ई.
खालील खेळाडू व खेळ यांच्या जोड्या जुळवा.

उत्तर –   

1. सचिन तेंडुलकर   इ) क्रिकेट


2. पेले             
  
     उ)
फुटबॉल


3. ध्यानचंद     –         ई) हॉकी


4. अभिनव बिंद्रा 
  
 अ)
नेमबाज


5. विश्वनाथन आनंद – आ) बुद्धिबळ


उ.
खालील खेळांचे मैदानी खेळ व बैठे खेळ असे वर्गीकरण करा.

    कबड्डी, कॅरम, क्रिकेट,
बुद्धिबळ, खो-खो, टेनिस,
हॉकी, सारीपाट, बास्केट
बॉल.

मैदानी खेळ

बैठे खेळ

कबड्डी,क्रिकेट,खो-खो

हॉकी,बास्केट बॉल,टेनिस

कॅरम,बुद्धिबळ,सारीपाट

 


व्याकरण

5 ) क्रियाविशेषण अव्यय – क्रियापदाबद्दल विशेष
माहिती सांगणाऱ्या शब्दाला
क्रिया विशेषण‘ (अव्यय) असे म्हणतात. 

उदा. संथ, सावकाश, जलद, मागे, पुढे, फार इ.

6) शब्दयोगी अव्यय – जे शब्द नामांना व सर्व
नामाना जोडून येतात व शब्दामधील संबंध दाखवितात त्या शब्दांना
शब्दयोगी अव्ययसे म्हणतात.  उदा. झाडावर, टेबलाखाली, घरामागे त्याच्यामुळे इ.


स्वाध्याय

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय,क्रियाविशेषण अव्यय ओळख.

1.                1.दिव्याखाली
अंधार.     

              खाली
शब्दयोगी अव्यय

2. माझ्याजवळ दहा रुपये आहेत.  

    जवळ – शब्दयोगी अव्यय

3. वर ठेवलेली पुस्तके खाली आण. 

    वर – क्रियाविशेषण
अव्यय

4. कारक म्हणजे बदल होणारे. 

    कारक – क्रियाविशेषण
अव्यय

5. तुला मी आधी कळविले होते. 

    आधी – क्रियाविशेषण
अव्यय

6. काटयावाचून गुलाब नाही. 

    वाचून – शब्दयोगी अव्यय

7. नुकसानकारक घटना घडू नये. 

     कारक-  क्रियाविशेषण अव्यय

8. पुस्तकातून ज्ञान घ्यावे. 

    तून – शब्दयोगी अव्यय


वरील नोट्स च्या pdf साठी येथे क्लिक करा.. 





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *