SAHAVI SAMAJ – PRACHIN SAMAJ

 सहावी समाज विज्ञान 

पाठ 3 – प्राचीन समाज

569




””””””””””””””””””””””””””””””””””””” 

प्रश्नोत्तरे 

प्रश्न (1) समाज कशाला म्हणतात ?

उत्तर__ एका निश्चित प्रदेशांमध्ये रहात असलेल्या लोकांच्या समूहाला समाज म्हणतात

प्रश्न (2)  समाजाचे प्रकार कोणते ?

उत्तर__ग्रामीण समाज शहरी समाज आदिवासी समाज ही तीन प्रकार होत

प्रश्न ( 3) समाजाची वैशिष्ट्ये सांगा ?

उत्तर 1) लोक एकत्र राहतात 

2 )  लोक सहकार्याने राहतात

 3 ) समाजात एकमेकाला मदत करतात 

4)एकमेकांच्या कार्यात मदत करतात

प्रश्न (4) ग्रामीण समाजात कोणते व्यवसाय करतात ?

उत्तर __ ग्रामीण समाजात सुतार ,लोहार,चांभार ,कुंभार , सोनार ,विणकाम , बुट्ट्या तयार करणार इत्यादी प्रकारचे व्यवसाय करतात

प्रश्न ( 5) ग्रामीण भागातील समस्या कोणत्या ?

उत्तर आरोग्य, स्वच्छता समस्या ,शिक्षण समस्या ,उद्योग समस्या,व्यवसाय , पाणी समस्या आरोग्य समस्याइत्यादी प्रकारच्या समस्या आढळतात

प्रश्न (6) ग्राम विकासासाठी सरकारने कोणत्या योजना आखल्या आहेत ?

उत्तर 1) जवाहर ग्राम समृद्धी योजना 

2) सर्व शिक्षण अभियान 

3) निर्मल ग्राम योजना 

4) भाग्यलक्ष्मी योजना

 5)आश्रय योजना इत्यादी योजना आखल्या आहेत

 प्रश्न (7) शहरात गेल्यावर तू काय पाहशील ?

उत्तर__  मी कारखाने उद्योगधंदे ,मोठमोठी दुकाने ,कॉलेज ,हॉटेल ,इमारती ,वेगळ्या प्रकारची वाहने, लोक दवाखाने , बाग , स्मारके, पुतळे इत्यादी पाहीन

प्रश्न (8) शहरांमधील समस्या कोणत्या?

उत्तर _ वाहतूक प्रदूषण टाकाऊकचरा ,झोपडपट्ट्या , जलप्रदूषण ,भिकारी , गटारी , शिक्षण , इत्यादी समस्या पहावयास मिळतात

प्रश्न (9) आदिवासी समाज कशाला म्हणतात ? 

उत्तर_  दाट अरण्य जंगल अथवा डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now