chouthi marathi 3. darodari ek zad (चौथी मराठी 3. दारोदारी एक झाड )

 

पाठ 3. दारोदारी एक झाड

स्वाध्याय

नवीन शब्दांचे अर्थ

Ø  कैऱ्या –  लहान, कच्चे हिरवे आंबे

Ø  त्वचारोग – शरीरावरील कातडीला होणारे रोग

Ø  रोप लहान रोपटे

Ø  पन्हे कैरीचे सरबत

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

१) मुले प्रार्थनेला कुठे जमली?

उत्तर – मुले प्रार्थनेला पटांगणात जमली.

२) वनमहोत्सव केव्हा साजरा करतात?

उत्तर – वनमहोत्सव जुलै महिन्यात साजरा करतात.

३) कच्या कैऱ्यांपासून कोणते पदार्थ तयार केले जातात?

उत्तर – कच्च्या कैऱ्यापासून पन्हे,चटणी,जाम,लोणचे हे पदार्थ तयार केले जातात.

४) वनमहोत्सव म्हणजे काय ?

उत्तर – वनमहोत्सव म्हणजे वाणांचा मोठा उत्सव.

५) पावसाचे प्रमाण कमी का होत आहे ?

उत्तर – झाडे तोडल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

६) कोणते शहर ग्रीन सिटीम्हणून ओळखले जाते ?

उत्तर – बेंगळूरू हे शहर ग्रीन सिटीम्हणून ओळखले जाते

इ) खालील वाक्य कोणी कोणाला उद्देशून म्हटले आहे ते लिही.

 

१) मी आंब्याचे रोप आणले आहे”

उत्तर – वरील वाक्य श्रीधरने शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.

२) ये वेडाबाई!

उत्तर – हे वाक्य गोविंदने मंजिरीला उद्देशून म्हटले आहे.

३) वनमहोत्सव म्हणजे वनाचा मोठा उत्सव”

उत्तर – हे वाक्य शिक्षकांनी महादेवाला उद्देशून म्हटले आहे.

४) सर, सारीच झाडे उपयुक्त आहेत का हो ?”

उत्तर – हे वाक्य जॉंनने शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.

५) सर, आणखी औषधी वनस्पती कोणकोणत्या ?’

उत्तर – हे वाक्य सायलीने शिक्षकांना उद्देशून म्हटले आहे.

१) तुळशी या औषधी वनस्पतीपासून कोणते फायदे होतात?

उत्तर: तुळस ही एक खूप उपयुक्त औषधी वनस्पती आहे. तिच्यामुळे आपल्या सभोवतालची हवा स्वच्छ आणि निरोगी राहते. तुळशीच्या पानांचा किंवा रसाचा वापर केल्याने आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, तसेच घट्ट झालेला कफ पातळ व्हायला मदत होते.

२) कडुनिंबातील औषधी गुण कोणते?

उत्तर: कडुनिंबाच्या झाडाचे पान, फूल, साल, खोड, काड्या, लिंबोळ्या सर्व काही औषधी आहे. यापासून रक्त शुद्ध होते. खरूज, गजकर्ण, नायटा यांसारखे त्वचेचे रोग बरे होण्यास मदत होते. याच्या काड्या दातातील कीड मारतात.

३) पर्यावरणातील सर्व झाडे उपयुक्त कशी आहेत?

उत्तर: पर्यावरणातील सर्व झाडे खूप उपयुक्त आहेत कारण ती हवा शुद्ध ठेवतात. झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते आणि शेतीसाठी आवश्यक पाऊस पडतो. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, जो आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे.

४) वनमहोत्सव का साजरा केला जातो?

उत्तर: वनमहोत्सव साजरा केला जातो कारण आपल्या देशात लोकसंख्या वाढत असल्यामुळे विकासासाठी खूप झाडे तोडली जातात. यामुळे पाऊस कमी होतो आणि उष्णता वाढते, ज्यामुळे मानवी जीवनावर वाईट परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी आपण झाडे लावून त्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगतो.

५) तू लावलेल्या रोपाची निगा कशी राखशील ते लिही.

उत्तर: मी लावलेल्या रोपाची निगा खूप काळजीपूर्वक राखेन. मी त्याला दररोज नियमित पाणी देईन, त्याच्याभोवतीचे गवत काढीन जेणेकरून त्याला पुरेसे अन्न मिळेल. तसेच, मी त्याला योग्य सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवीन आणि कोणत्याही प्राण्यांपासून त्याचे संरक्षण करीन.

 

ई) खालील वाक्य अर्थपूर्ण पद्धतीने लिही.

१) पानांचे तोरण / जाते / बांधले शुभप्रसंगी.

उत्तर – शुभप्रसंगी पानांचे तोरण बांधले जाते.

२) आहे / रोप / तुळशीचे / मी / आणले.

उत्तर – मी तुळशीचे रोप आणले आहे.

३) प्राणवायूचा / तुळशीच्या / पुरवठा / रोपामुळे / होतो / भरपूर.

उत्तर – तुळशीच्या रोपामुळे प्राणवायुचा भरपूर पुरवठा होतो.

४) उपयुक्त / सारीच / आहेत / झाडे.

उत्तर – सारीच झाडे उपयुक्त आहेत.

५) हवा / राहते / शुद्ध / झाडामुळे

उत्तर – झाडामुळे हवा शुद्ध राहते.




Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now