आठवी – राज्यशास्त्र
1. राज्यशास्त्राचा अर्थ आणि महत्त्व
रिकाम्या जागा भरा.
1.राज्यशास्त्र हे समाज विज्ञानाचे अंग आहे.
2 .प्लेटो ने रिपब्लिक हे पुस्तक लिहिले.
3.राज्यशास्त्राचा पितामह असे ॲरिस्टॉटल यास म्हणतात.
4.अरिस्टोटल यांनी पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिले.
5. राज्यशास्त्र म्हणजे राज्याचे चौफेर अध्ययन होय.
6. ग्रीकांनी राज यांच्या अभ्यासाला पॉलिटिक्स हा शब्द वापरला.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. राज्यशास्त्र म्हणजे काय?
उत्तर – राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा उगम विकास स्वरूप राजे पद्धती राज्यांची कार्य व्याप्ती नागरिकांचे हक्क व कर्तव्य या सर्वांचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र
2. राज्यशास्त्र मधील प्रमुख विचारवंत कोण?
उत्तर – राज्य शास्त्रांमध्ये अरिस्टॉटल प्लेटो साक्रेटीस हे प्रमुख विचारवंत होत
3. राज्यशास्त्राच्या कक्षेत कोण कोणत्या गोष्टी येतात?
उत्तर – राज्य सरकार आणि मानवाचे राजकीय उपक्रम आणि इतर समस्या या सर्वांचा समावेश राज्यशास्त्राच्या कक्षेत येतो
4. राज्यशास्त्राचे महत्त्व सांगा.
उत्तर – राज्यशास्त्राचे महत्व खालीलप्रमाणे –
1 राज्याचा जन्म व विकास समजण्यासाठी राज्यशास्त्र मदत करते.
2 राज्य सरकार ची रचना आणि कार्य यांची माहिती मिळते.
3 आधुनिक विकसित राज्य निर्माण करण्यास मदत –
4 राज्याची घटना आणि कायदे यांच्या विषयी ज्ञान मिळते.
5 कायदेमंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्या कार्याविषयी माहिती.
6 उत्तम नेतृत्व व उत्तम नागरिक घडविण्याचे काम करते.
7 स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व समजतं.
8 आंतरराष्ट्रीय युद्ध व शांतता सहकार्य वाढवण्यासाठी मदत होते.