सन 2020-21 सालातील कर्नाटक राज्यातील इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा 21/06/2021 ते 05/07/2021 दरम्यान होणार होती.पण सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळाने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे खालील आदेशानुसार सांगितले आहे.
नवीन परीक्षा वेळापत्रक 20 दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल तसेच परीक्षेसंबंधी इतर माहिती वेळोवेळी परीक्षा मंडळाकडून देण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी घरी सुरक्षित राहून अभ्यास करून परीक्षेसाठी सिद्ध व्हावे.विद्यार्थ्यांनी कोणतीही नकारात्मकता न बाळगता या कठीण परीस्थितीतून बाहेर पडून पुढील जीवनास धैर्याने सामोरे जाण्यास परीक्षा मंडळ मदत करेल.तसेच शिक्षक / मुख्याध्यापक यांनी दूरध्वनी आणि इतर तंत्राच्या सहाय्याने विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क साधून विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.
सविस्तर माहितीसाठी खालील आदेश पहावा. Click here