22/02/2021 पासून 6 ते 8 वर्ग पूर्ण वेळ सुरु करण्यासंबंधी सरकारी आदेशाप्रमाणे मार्गदर्शक सुचना व वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
Ø 22/02/2021 पासून
कर्नाटकातील बेंगळूर शहर BBMP आणि केरळ राज्याच्या आसपास भागातील शाळा
सोडून इतर भागातील शाळा आतापर्यंत वापरलेल्या सुरक्षा नियमानुसार 6वी,7वी व 8वी वर्ग दररोज पूर्ण दिवस चालू ठेवणे.
Ø
बेंगळूर शहर BBMP आणि केरळ राज्याच्या आसपास भागातील 6वी,7वी च्या वर्गांना
विद्यागम कार्यक्रम चालू ठेवणे व 8वी वर्ग पूर्ण दिवस चालू ठेवणे.
Ø
राज्यातील निवडक शाळा व वसतिगृहांमध्ये वेळोवेळी आरोग्य विभागामार्फत
विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्यांच्या कोरोना चाचणीचे परीक्षण करण्यात
यावे.
Ø
केरळ त्राज्यातून येणारे शिक्षक,विद्यार्थी व इतर कर्मचारी याना कोरोना चाचणी
करून घेणे बंधनकारक आहे.
Ø
पूर्ण दिवस चालू असणाऱ्या शाळेतील 6 ते 8 वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण
घरातून घेऊन येण्याची सुचना देणे..
Ø
समाज कल्याण विभाग, मागासवर्गीय व अल्पसंख्याक विभाग यांच्याकडून
चालू असलेली वसतिगृहे व इतर वसतिगृहे आरोग्य विभागाच्या एसओपी नुसार प्रारंभ करणे,
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ज्यादा बस सोडण्यासाठी संबंधित बस नियामक
मंडळाने उपलब्ध करावे.
विद्यार्थी शाळेत येताना किंवा विद्यागम कार्यक्रमास येताना पालकांचे अनुमती
पत्र आवश्यक आहे.सदर अनुमती पत्रात पाल्यास COVID 19 ची लक्षणे
नसल्याबद्दल दृढीकरण करून घेणे.
Ø
जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यास इच्छुक नाहीत त्यांच्या शिक्षणासाठी
ऑनलाईन किंवा इतर योग्य पद्धतीचा वापर करावा.
Ø
शाळेत विद्यार्थ्यांनी हजर राहणे बंधनकारक नाही.
वेळापत्रक
माध्यमिक
शाळेत 8,9 व 10 या
वर्गांसाठी वेळापत्रक
वार | वेळ | इयत्ता |
सोमवार | 10.00 ते 4.30 | 8,9 व 10वी |
मंगळवार | 10.00 ते 4.30 | 8,9 व 10वी |
बुधवार | 10.00 ते 4.30 | 8,9 व 10वी |
गुरुवार | 10.00 ते 4.30 | 8,9 व 10वी |
शुक्रवार | 10.00 ते 4.30 | 8,9 व 10वी |
शनिवार | 10.00 12.30 | 8,9 व 10वी |
उच्च
प्राथमिक शाळेत 6 , 7 व 8 वर्गांचे
वेळापत्रक (बेंगळूर शहर BBMP आणि केरळ राज्याच्या आसपास भागातील
शाळा सोडून)
वार | वेळ | इयत्ता |
सोमवार | 10.00 ते 4.30 | 6,7 व 8वी |
मंगळवार | 10.00 ते 4.30 | 6,7 व 8वी |
बुधवार | 10.00 ते 4.30 | 6,7 व 8वी |
गुरुवार | 10.00 ते 4.30 | 6,7 व 8वी |
शुक्रवार | 10.00 ते 4.30 | 6,7 व 8वी |
शनिवार | 10.00 12.30 | 6,7 व 8वी |
बेंगळूर
शहर BBMP आणि केरळ
राज्याच्या आसपास भागातील 6वी,7वी च्या वर्गांना
विद्यागम कार्यक्रम चालू ठेवणे व 8वी वर्ग पूर्ण दिवस
चालू ठेवण्यासंबंधी वेळापत्रक
6 ते 8 वर्ग असणाऱ्या शाळांचे वेळापत्रक
वार | वेळ | इयत्ता |
सोमवार | 10.00 ते 4.30 | 8वी |
10.00 12.30 | 6वी | |
मंगळवार | 10.00 ते 4.30 | 8वी |
10.00 12.30 | 7वी | |
बुधवार | 10.00 ते 4.30 | 8वी |
10.00 12.30 | 6वी | |
गुरुवार | 10.00 ते 4.30 | 8वी |
10.00 12.30 | 7वी | |
शुक्रवार | 10.00 ते 4.30 | 8वी |
10.00 12.30 | 6वी | |
शनिवार | 10.00 12.30 | 8वी |
10.00 12.30 | 7वी |
विशेष सुचना –
1.
पूर्ण
वेळ वर्ग चालू ठेवण्यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक वर्ग खोली
व शिक्षकांचे नियोजन करणे व शाळेत SOP
नियमाचे पालन करणे.
2.
कोविड
19 संबंधी सरकारकडून व शिक्षक खात्याकडून येणाऱ्या सूचनांचे
पालन करणे.