घरबसल्या अपडेट करा आधार; आधार कार्डवरील भाषा,नाव, पत्ता आणि जन्मतारीख आपण स्वतः मोबाईलवर बदलू शकता…
आधार कार्डवर कोणतीही माहिती दुरुस्त करायची असल्यास आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.आपल्याला आधार कार्ड सुविधा देणारी संस्था UIDAI ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता आपण पुन्हा एकदा घरबसल्या आपलं नाव, पत्ता आणि जन्मतारीख (Date of Birth) आणि लिंग (Gender) अपडेट करू शकता. UIDAI पत्त्याशिवाय सर्व डेमोग्राफिक डिटेल्सला अपडेट करण्याची सुविधा बंद केली होती. परंतू पुन्हा एकदा UIDAI ती सुविधा सुरू केली आहे.
UIDAI ने केलेल्या ट्विटनुसार –
UIDAI ने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिलीय. आता घरबसल्या आपण UIDAI च्या वेबसाइटवर भाषा नाव, पत्ता, जन्मतारीख आणि जेंडर अपडेट करू शकता. पण आता ही सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
#MeraAadhaarMeriPehchaan
अब आप घर बैठे UIDAI की वेबसाइट पर अपना नाम, पता, जन्मतिथि व लिंग अपडेट करा सकते हैं, https://t.co/II1O6P5IHq पर क्लिक करें और घर बैठे आधार अपडेट कराएँ। #Aadhaar pic.twitter.com/GhuLbLGAG3— Aadhaar (@UIDAI) December 22, 2020
घरबसल्या करू शकता AADHAR अपडेट खालील स्टेप्स वापरा…
>> पहिल्यांदा आपल्याला OFFICIAL WEBSITE वर जावे लागेल
>> इथे आपल्याला माय आधार सेक्शनमध्ये जाऊन ‘Update Your Aadhar’ वर क्लिक करा
>> त्यानंतर ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ वर क्लिक करावे लागेल
>> नवीन पेज ओपन केलं जाईल.
>> त्याशिवाय आपण डायरेक्ट https://ssup.uidai.gov.in/ssup/ भेट देऊ शकता.
>> इथे आपल्याला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल.
>> नव्या ओपन झालेल्या पेजवर 12 डिजिटचा आधार नंबर नोंदवा
>> कॅप्चा कोड टाकल्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा
>> रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येणाऱ्या ओटीपीला निर्धारित स्पेस टाकून सबमिट करा.
>> नव्या उघडलेल्या पेजवर आपल्याला दोन पर्याय मिळतील
1. सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफबरोबर एड्रेससह डेमोग्राफिक डिटेल्सचं अपडेशन
2. एड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे एड्रेस अपडेट करा
>> नाव,भाषा,जन्मतारीख, लिंग, पत्त्यासारखे कोणतेही डॉक्युमेंट्स प्रूफसह अपडेट करण्यासाठी अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर क्लिक करा.
>> त्यानंतर आपल्याला जी माहिती अपडेट करायची आहे, ती निवडा. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
CLICK HERE FOR LIST OF SUPPORTING DOCUMENTS
एक रुपया खर्च न करता PAN CARD साठी येथे क्लिक करा…
रजिस्टर्ड मोबाइल नंबर हवा
ऑनलाइन अपडेशनच्या वेळी नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल. कारण आपल्याला सर्व ओटीपी त्याच नंबरवरून प्राप्त होणार आहेत. (AADHAR REPRINT)