सुरक्षेसाठी बहुतेक आधार कार्डला प्लास्टिकचे लॅमिनेशन केले जाते. काही जण प्लास्टिक आधार वापरतात.जर आपण हे केले असेल तर आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.UIDAIने या आधी सुचना जारी केली आहे की,जर आपण आधार कार्ड प्लास्टिक लॅमिनेशन केले तर आधारचा क्यू आर कोड काम करणे बंद करू शकतो.त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय तुमची माहिती कोणीही चोरू शकतो.
प्लास्टिक किंवा पीविसी सीटवर आधार प्रिंट काढण्यासाठी लोक ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत पैसे खर्च करतात.पण UIDAIने अस करण्यास मनाई केली आहे.कारण अशा अनऑथाराईज्ड प्रिंटींगमुळे आधारवरील क्यू आर कोड अकार्यक्षम होतो.त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या परवानगीशिवाय शेयर होऊ शकते.
हे आधार कार्ड आहेत वैध
साधारण पेपरवर असलेले आधार कार्ड,ओरिजिनल आधार तसेच एम आधार पूर्णपणे मान्य आहे.यासाठी तुम्हाला प्लास्टिक किंवा पीविसी सीटवर आधार प्रिंट काढण्याच्या भानगडीत पडण्याची गरज नाही.जर तुमचे आधार हरवले असेल तर तुम्ही https://eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.
UIDAIचे उत्तर खाली दिले आहे..