- सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द.
- नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.
- या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो.ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही.
- ’तो’ हा शब्द रामा,वाडा,कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
- कांही नेहमीच्या वापरातील सर्वनामे –
मी आम्ही तू तुम्ही तो ती ते ते त्या ती आपण
स्वत: काय कोणाला आपण