आधार दुरुस्ती नवीन नियम

आधार कार्ड अपडेट करण्यापूर्वी हे जरुर वाचा.आधार कार्ड नियमांमध्ये मोठे बदल;

        आपल्या दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड गरजेचं असतं. अगदी बँक  खात्यापासून ते पासपोर्टपर्यंत सर्वत्रच या आधारची गरज भासते. पण, अनेकदा आधार कार्ड तयार करताना नकळत झालेल्या काही चुकांमुळे त्यांच्यावर छापून आलेलं नाव, जन्मदिनांक किंवा इतर  माहितीमध्ये चुका आढळून येतात. याच लहान चुका अनेकदा मोठ्या अडचणी उभ्या करतात.   
       आधार कार्ड धारकांपुढे येणाऱ्या याच अडचणी ओळखून, UIDAI ने जन्म दिनांक, नावातील बदल यासाठी काही नव्या अटी लागू केल्या आहेत. तर मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसणार आहे. तुम्हालाही आधार कार्डमध्ये ही माहिती अपडेट करायची असेल तर खालील माहिती लक्षपूर्वक वाचा. 

 नवीन अटी खालीलप्रमाणे – 

चुकीचं नाव छापलं असल्यास काय करावं? 

        आधार कार्डावर तुमचं नाव चुकीचं छापलं गेल्यास आणि तुम्ही त्यात बदल करु इच्छित असाल तर त्यासाठीसुद्धा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. UIDAI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नावात बदल करण्यासाठी आता केवळ दोनदाच संधी दिली जाणार आहे. यानंतरही नाव चुकीचं आल्यास, ते कार्ड अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्यानंतर आधार कार्ड धारकांनी नव्या कार्डासाठी आवेदन करणं आवश्यक असेल.  
नावात बदल करण्यासाठी लागणार ही कागदपत्र 
    आधार कार्डवरील नावात बदल करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाचं प्रमाणपत्र,शासकीय ओळखपत्र,पॅनकार्ड,मतदान कार्ड,वाहन चालनाचा परवाना,जात प्रमाणपत्र,पेंशनसाठीचं ओळखपत्र यांसारख्या  महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्डवर छापण्यात आलेल्या चुकीच्या नावात बदल करण्यासाठीची पुढील प्रक्रिया करु शकता. 

जन्मतारीख चुकीची छापली असल्यास काय करावं? 

      UIDAIकडून आधार कार्डवर जन्म तारीख अपडेट करण्यासाठी नवी अट घालून देण्यात आली आहे. जन्म तारीख बदलण्याच्या परिस्थितीमध्ये तीन वर्षांहून कमी अंतर असेल तर तुम्ही संबंधित कागदपत्रासह जवळच्या कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन हे बदल करुन घेऊ शकता. तीन वर्षांहून जास्तीचं अंतर असेल तर  कागदपत्रांसह क्षेत्रीय आधार केंद्रात जाणं आवश्यक असेल.
आवश्यक कागदपत्रे – 
        जन्म तारखेच्या बदलासाठी जन्मदाखला,पॅन कार्ड, पासपोर्ट,लेटर हेडवर ग्रुप-ए गैजेटेड अधिकाऱ्याकडून मिळालेली प्रमाणित तारीख,ओळखपत्र,केंद्र शासनाच्या आरोग्य सेवेतील फोटो कार्ड किंवा माजी सैनिक असल्यास त्यासंबंधीचं ओळखपत्र , इयत्ता दहावी किंवा १२ वीचं प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक. 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now