म्हाइंभटी सिक्षापणी
संपा. वा.ना.देशपांडे
(स्मृतीस्थळ)
लेखक परिचय
म्हाइंभट:
म्हाइंभट हे तेराव्या शतकात महानुभाव पंथाशी संबंधित होते. त्यांनी मराठी भाषेत चरित्रलेखनाची नवी परंपरा निर्माण केली. या परंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘स्मृतिस्थळ.’ या ग्रंथात श्री चक्रधर स्वामी यांच्या निधनानंतरच्या आठवणी आणि शिकवणी लिहिल्या आहेत. नागदेवाचार्य (म्हणजे भटोबास) यांच्या सोबत राहिलेल्या व्यक्तींच्या अनुभवांवर आधारित हा ग्रंथ आहे. ना. वा. देशपांडे यांनी संपादित केलेल्या या ग्रंथात अनेक लेखकांचे विचार मिसळलेले आहेत.
महानुभाव पंथाची शिकवण
महानुभाव पंथाचा उद्देश जात-पात न मानता समाजात समानता पसरवणे होता. श्री गोविंदप्रभू आणि श्री चक्रधरस्वामी हे या पंथाचे दैवत होते. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना समान वागणूक दिली. पंथाच्या लोकांनी मराठी भाषेतून या शिकवणीचा प्रचार केला आणि गुरुंच्या आठवणी लिहून ठेवल्या.
सारांश
हा पाठ महानुभाव पंथाशी संबंधित आहे, ज्यात नागदेवाचार्यांनी दिलेल्या शिकवणीचा उल्लेख आहे. महानुभाव पंथाने तेराव्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवे तत्त्वज्ञान मांडले. पंथाचे आद्य गुरु श्रीचक्रधर स्वामी यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट करण्यावर भर दिला. या विचारांचे प्रतिबिंब ‘स्मृतिस्थळ‘ या ग्रंथात दिसते, ज्यामध्ये त्यांचे शिष्य नागदेवाचार्य यांच्या आठवणी व विचारांचा संग्रह आहे.
पाठात एक प्रसंग दिला आहे, ज्यात कोथळोबा नावाच्या व्यक्तीने उमाई नावाच्या उच्चवर्णीय स्त्रीच्या भांड्यातील पाणी पिले. यामुळे उमाई रागावली कारण तिला कोथळोबा हा शूद्र असल्याने अपवित्र वाटला. हा भेदभाव पाहून म्हाइंभटने उमाईला समजावले की सर्व माणसे देवाच्या दृष्टीने समान आहेत. जात-पात आणि भेदभाव ठेवणे अज्ञानाचे लक्षण आहे. म्हाइंभटच्या या शिकवणीमुळे उमाईला आपल्या चुकीची जाणीव झाली, आणि तिने कोथळोबाला माफी मागून दंडवत घातले.
या प्रसंगातून मानवी समानतेचा, जातीभेदमुक्तीचा आणि सर्वांना आदर देण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे.
पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्र.1: महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते?
उत्तर – चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते.
प्र.2: उमाइसा कोथळोबावर का रागावली?
उत्तर – कोथळोबाने तिच्या पात्रातील पाणी न विचारता पिल्यामुळे ती रागावली.
प्र.3: म्हाइंभट उमाइसाला कोणता उपदेश करतात?
उत्तर – म्हाइंभट तिला सांगतात की गोविंदप्रभू आणि चक्रधरस्वामी यांच्या सहवासात असूनही तिने अस्पृश्यतेचा विचार का सोडला नाही. कोथळोबाने पाणी पिल्याचे तुझे दुर्भाग्य नाही असे ते तिला समजावतात.
प्र.4: उमाइसेने पश्चाताप का केला?
उत्तर – तिला समजले की तिचे वागणे चूक होते,कारण गुरुंनी कधीही जातीभेद केला नव्हता. म्हाइंभटांनी उपदेश केल्यानंतर उमाइसा कोथळोबाला दंडवत घालते आणि माफी मागते.
समानार्थी शब्द
1. शूद्र – अस्पृश्य, दलित
2. माता – आई, जननी
3. बंधू – भाऊ, बांधव
4. पात्र – भांडे, पान
5. दंडवत – साष्टांग नमस्कार
6. अनुताप – पश्चाताप




