इयत्ता – 9वी
विषय – गणित
भाग – 1
प्रकरण 3: सहनिर्देशक भूमिती (Coordinate Geometry)
नमुना उत्तरे
- प्रतलात एखाद्या वस्तू किंवा बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषांची आवश्यकता असते.
- यातील आडव्या रेषेला x-अक्ष आणि उभ्या रेषेला y-अक्ष म्हणतात.
- ज्या प्रतलात हे अक्ष काढले जातात त्याला कार्तेशियन प्रतल किंवा सहनिर्देशक प्रतल म्हणतात.
- अक्ष ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्या छेदनबिंदूला आरंभबिंदू (Origin) म्हणतात.
- निर्देशक अक्ष प्रतलाला 4 समान भागांमध्ये विभागतात, या भागांना चरण असे म्हणतात.
- I, II, III आणि IV ही चरणे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मोजली जातात.
- y-अक्षापासून कोणत्याही बिंदूच्या अंतराला त्याचा x-निर्देशक किंवा भुज (Abscissa) म्हणतात.
- x-अक्षापासून बिंदूच्या अंतराला त्याचा y-निर्देशक किंवा कोटी (Ordinate) म्हणतात.
- जर बिंदूचा x-निर्देशक x आणि y-निर्देशक y असेल, तर (x, y) ला त्या बिंदूचे सहनिर्देशक म्हणतात.
- आरंभबिंदूचे सहनिर्देशक नेहमी (0, 0) असतात.
- x-अक्षावरील कोणत्याही बिंदूचे सहनिर्देशक (x, 0) या स्वरूपात असतात.
- y-अक्षावरील कोणत्याही बिंदूचे सहनिर्देशक (0, y) या स्वरूपात असतात.
- पहिल्या (I) चरणातील बिंदू (+, +) स्वरूपात असतात.
- दुसऱ्या (II) चरणातील बिंदू (-, +) स्वरूपात असतात.
- तिसऱ्या (III) चरणातील बिंदू (-, -) स्वरूपात असतात.
- चौथ्या (IV) चरणातील बिंदू (+, -) स्वरूपात असतात.
स्वाध्याय 3.1
1. तुम्ही तुमच्या खोलीतील अभ्यासाच्या टेबलवरील टेबल लॅम्पचे स्थान दुसऱ्या व्यक्तिला कसे सांगाल?
उत्तर: समजा टेबलचा पृष्ठभाग एक प्रतल (plane) आहे आणि टेबल लॅम्प हा त्यावरील एक बिंदू आहे. टेबलच्या दोन लंब असणाऱ्या कडा (edges) आपण X-अक्ष आणि Y-अक्ष मानू. आता, लॅम्पचे एका कडेपासूनचे लंब अंतर आणि दुसऱ्या कडेपासूनचे लंब अंतर मोजू. उदाहरणार्थ, जर एका कडेपासूनचे अंतर 2 फूट आणि दुसऱ्या कडेपासूनचे अंतर 1.5 फूट असेल, तर या दोन अंतरांचा वापर करून आपण लॅम्पचे अचूक स्थान (2, 1.5) असे सांगू शकतो.
2. (रस्त्याचा नकाशा) : एका शहराला मुख्य दोन रस्ते आहेत… (i) (4, 3) जाणारे किती वळण (क्रॉस) रस्ते मिळतील? (ii) (3, 4) मानले जाणारे किती क्रॉस रस्ते मिळतील?
- (i) (4, 3) जाणारे किती वळण रस्ते मिळतील: केवळ 1 क्रॉस रस्ता मिळेल. कारण प्रतलात (4, 3) हा एक अद्वितीय (unique) बिंदू आहे.
- (ii) (3, 4) मानले जाणारे किती क्रॉस रस्ते मिळतील: केवळ 1 क्रॉस रस्ता मिळेल. कारण (3, 4) हे देखील एकाच अद्वितीय क्रॉस रस्त्याचे स्थान दर्शविते.
स्वाध्याय 3.2
1. खालील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे लिहा.
-
(i) कार्तेशियन प्रतलात एखाद्या बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी आडवी रेषा व उभी रेषा काढली जाते त्यांचे नाव काय ?
उत्तर: आडव्या रेषेला X-अक्ष (x-अक्ष) आणि उभ्या रेषेला Y-अक्ष (y-अक्ष) असे म्हणतात. -
(ii) दोन रेषांनी बनलेल्या प्रतलाच्या प्रत्येक भागाचे नाव काय ?
उत्तर: या प्रत्येक भागाला ‘चरण’ (Quadrant) असे म्हणतात. -
(iii) जेथे दोन रेषा परस्परास छेदतात त्या छेदन बिंदूचे नाव लिहा.
उत्तर: या छेदन बिंदूला ‘आरंभबिंदू’ (Origin) असे म्हणतात.
2. आकृती 3.14 पहा व खालील उत्तरे लिहा.
- (i) B बिंदूचे सहनिर्देशक कोणते ? उत्तर: (-5, 2)
- (ii) C बिंदूचे सहनिर्देशक कोणते ? उत्तर: (5, -5)
- (iii) सहनिर्देशक (-3, -5) असलेला बिंदू ओळखा. उत्तर: बिंदू E
- (iv) (2, -4) सहनिर्देशक असलेला बिंदू ओळखा. उत्तर: बिंदू G
- (v) बिंदू D चा x-निर्देशक (भुज) सांगा. उत्तर: 6
- (vi) बिंदू H चा y-निर्देशक (कोटी) सांगा. उत्तर: -3
- (vii) बिंदू L चे सहनिर्देशक सांगा. उत्तर: (0, 5)
- (viii) बिंदू M चे सहनिर्देशक सांगा. उत्तर: (-3, 0)





