संकलित मूल्यमापन-2 (SA-2): इयत्ता 5वी मराठी नमुना प्रश्नपत्रिका 2 (2025-2026)

नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो,
शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. संकलित मूल्यमापन-2 (SA-2) म्हणजेच वार्षिक परीक्षा आता जवळ आली आहे. विद्यार्थ्यांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे व्हावा आणि त्यांना परीक्षेच्या स्वरूपाचा अंदाज यावा, यासाठी आम्ही खास इयत्ता 5वी मराठी विषयाची नमुना प्रश्नपत्रिका (Sample Paper) तयार केली आहे.
या पोस्टची वैशिष्ट्ये:
- अद्ययावत अभ्यासक्रम: ही प्रश्नपत्रिका 2025-26 च्या शैक्षणिक धोरणानुसार आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे.
- परिपूर्ण आराखडा: एकूण 40 गुण आणि 90 मिनिटे वेळ असलेल्या या पेपरमध्ये गद्य, पद्य आणि व्याकरण या सर्व विभागांचा समतोल राखला आहे.
- कौशल्यांवर आधारित: प्रश्न केवळ पाठांतरावर नसून विद्यार्थ्यांचे आकलन, अभिव्यक्ती आणि भाषिक कौशल्य तपासणारे आहेत.
- डाऊनलोडसाठी उपलब्ध: शिक्षकांना वर्गात सराव घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना घरी सरावासाठी ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे.
प्रश्नपत्रिकेचा तपशील:
- इयत्ता: 5वी
- विषय: मराठी
- गुण: 40
- वेळ: 90 मिनिटे
परीक्षेचा ताण न घेता, आत्मविश्वासाने सराव करण्यासाठी ही प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेसोबतच मॉडेल उत्तरपत्रिका (Model Answer Sheet) आणि तोंडी परीक्षेचा (Oral Test) आराखडा देखील पाहायला मिळेल.
संकलित मूल्यमापन – 2 (2025 – 2026)
नमूना प्रश्नपत्रिका – 2
प्रश्न 1. खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा / रिकाम्या जागा भरा. (10 गुण)
-
1. मधूला कोणत्या भाज्या खाणे आवडायचे?(अ) मेथी आणि पालक (ब) वाटाण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी (क) गाजर आणि काकडी (ड) शेवग्याच्या शेंगा आणि कारले
-
2. स्वातंत्र्य दिन या दिवशी साजरा करतात.(अ) 5 सप्टेंबर (ब) 15 ऑगस्ट (क) 26 जानेवारी
-
3. जागतिक रेडिओ दिन ______ दिवशी साजरा करतात.(अ) 30 मे (ब) 13 फेब्रुवारी (क) 15 ऑगस्ट
-
4. ‘घाम फुटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ______(अ) कष्ट करणे (ब) भीती वाटणे (क) गरम होणे
-
5. देवतुल्य आईबाबा या कवितेचे कवी कोण आहेत?(अ) कुसुमाग्रज (ब) उमाकांत काणेकर (क) केशवसुत
-
6. दिनूचे वडील ______ होते.(अ) वकील (ब) पोलीस (क) डॉक्टर
-
7. ‘कोषागार’ या शब्दाचा अर्थ ______(अ) सल्लागार (ब) खजिना (क) शस्त्रभांडार
-
8. पणती ______ पासून बनवतात.(अ) कागद (ब) लाकूड (क) माती
-
9. बसवेश्वरांच्या काव्यांना ______ असे म्हणतात.(अ) ओवी (ब) बसववचन (क) दोहा
-
10. मानवाच्या जीवनामध्ये सर्व काही ______ असावे.(अ) प्रमाणात (ब) जास्त (क) प्रमाणाबाहेर
प्रश्न 2. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. (10 गुण)
- 11. समतोल आहार म्हणजे काय?
- 12. रेडिओवर कोणत्या प्रकारची माहिती मिळते?
- 13. शेती का पिकली नाही?
- 14. शीण कशाने येतो?
- 15. भटजींच्या पत्नीने भटजींना कोणते काम सांगितले?
प्रश्न 3. खालील प्रश्नांची 3-4 वाक्यांत / सविस्तर उत्तरे लिहा. (12 गुण)
- 16. बिल घेतल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपण काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत?
- 17. बसवेश्वरांच्या मते खरा धर्म कसा असावा?
- 18. दुष्काळ पडल्यामुळे काय काय घडले?
- 19. पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा:
(1) कॉम्प्युटर (2) फॅन (3) चॅनल (4) रेफ्रिजरेटर
प्रश्न 4. खालील प्रश्नांची 3-4 वाक्यांत / सविस्तर उत्तरे लिहा. (8 गुण)
- 20. दिव्याची ज्योत कोणता संदेश देते?
-
21. कवितेच्या ओळी पूर्ण करा व लिहा.
देवतुल्य _________________________
______________________________
______________________________
______________________________
_________________ वरदहस्त डोई ||1||
MODEL ANSWER SHEET (नमुना उत्तरपत्रिका)
विभाग 1: वस्तुनिष्ठ उत्तरे (Objective)
1. (ब) वाटाण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी
2. (ब) 15 ऑगस्ट
3. (ब) 13 फेब्रुवारी
4. (ब) भीती वाटणे
5. (ब) उमाकांत काणेकर
6. (क) डॉक्टर
7. (ब) खजिना
8. (क) माती
9. (ब) बसववचन
10. (अ) प्रमाणात
2. (ब) 15 ऑगस्ट
3. (ब) 13 फेब्रुवारी
4. (ब) भीती वाटणे
5. (ब) उमाकांत काणेकर
6. (क) डॉक्टर
7. (ब) खजिना
8. (क) माती
9. (ब) बसववचन
10. (अ) प्रमाणात
विभाग 2: लघूत्तरी (Short Answer)
11. समतोल आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक (पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे) योग्य प्रमाणात असतात.
12. रेडिओवर हवामानासंबंधी, करमणुकीचे कार्यक्रम व मुलाखती अशा अनेक प्रकारची माहिती मिळते.
13. दुष्काळ पडल्यामुळे (पाऊस न पडल्यामुळे) शेती पिकली नाही.
14. सतत पद्य पाठ केल्यामुळे शीण येतो.
15. भटजींच्या पत्नीने भटजींना नदीला जाऊन पिण्याचे पाणी आणण्याचे काम सांगितले.
12. रेडिओवर हवामानासंबंधी, करमणुकीचे कार्यक्रम व मुलाखती अशा अनेक प्रकारची माहिती मिळते.
13. दुष्काळ पडल्यामुळे (पाऊस न पडल्यामुळे) शेती पिकली नाही.
14. सतत पद्य पाठ केल्यामुळे शीण येतो.
15. भटजींच्या पत्नीने भटजींना नदीला जाऊन पिण्याचे पाणी आणण्याचे काम सांगितले.
विभाग 3 & 4: सविस्तर (Detailed)
16. बिल घेताना आपण घेतलेल्या गोष्टी, त्यांचे प्रमाण, दर आणि एकूण रक्कम (Total) बरोबर आहे का ते तपासावे.
17. लोकांच्या कल्याणाकरिता झटणे, दुःखे दूर करणे, स्त्रियांना मातेप्रमाणे मानणे आणि नेहमी सत्य बोलणे हाच खरा धर्म असावा.
18. दुष्काळामुळे विहिरींचे पाणी आटले, नदी-नाले कोरडे पडले आणि शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.
19. (1) संगणक (2) पंखा (3) वाहिनी (4) शीतकपाट.
20. दिव्याची ज्योत स्वतः जळून जगाला प्रकाश देते. ती अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते.
17. लोकांच्या कल्याणाकरिता झटणे, दुःखे दूर करणे, स्त्रियांना मातेप्रमाणे मानणे आणि नेहमी सत्य बोलणे हाच खरा धर्म असावा.
18. दुष्काळामुळे विहिरींचे पाणी आटले, नदी-नाले कोरडे पडले आणि शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.
19. (1) संगणक (2) पंखा (3) वाहिनी (4) शीतकपाट.
20. दिव्याची ज्योत स्वतः जळून जगाला प्रकाश देते. ती अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते.
ORAL TEST (तोंडी परीक्षा)
तोंडी प्रश्न पेढी (20 प्रश्न)
- 1. मधूला जेवणाच्या बाबतीत कशाची तक्रार असायची? → भाज्या खाण्याची
- 2. मधूला स्वप्नात कोणी सल्ला दिला? → फळांनी आणि भाज्यांनी
- 3. ‘किसान’ या शब्दाचा अर्थ काय? → शेतकरी
- 4. आपल्या झेंड्यात किती रंग आहेत? → तीन (तिरंगी)
- 5. एफएम रेडिओचा शोध कोणी लावला? → एडविन हॅवर्ड आर्मस्ट्राँग
- 6. ऐकण्याची क्रिया कोणत्या इंद्रियामार्फत होते? → कान
- 7. ‘सखी’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. → मैत्रीण
- 8. भटजींना कोणती सवय होती? → घरी पाहुणे जेवायला आणण्याची
- 9. कवी रोज कोणाची पूजा करतो? → आई-बाबांची
- 10. ‘नेत्रज्योती’ म्हणजे काय? → डोळे
- 11. दिनू वडिलांबरोबर कोठे गेला होता? → दवाखान्यात
- 12. आईचे बिल पाहून दिनूची अवस्था कशी झाली? → रडू आले
- 13. तेनालीराम कोणाचा सल्लागार होता? → कृष्णदेवरायाचा
- 14. राजाने शेतकऱ्यांना किती मोहरा दिल्या होत्या? → पाचशे
- 15. दिवटी कोणाची आवडती होती? → शेतकऱ्याची
- 16. ‘वीज’ या शब्दाचा पाठातील समानार्थी शब्द सांगा. → बिजली
- 17. बसवेश्वरांचा जन्म कोठे झाला? → बागेवाडी
- 18. बसवेश्वरांच्या पत्नीचे नाव काय होते? → गंगांबिका
- 19. ‘अती कोपता’ काय होते? → कार्य लयाला जाते
- 20. अती काय नसावे? → अती काम / अती कोप




