प्रजासत्ताक दिन सोहळा : सूत्रसंचालन -5

प्रजासत्ताक दिन सोहळा : सूत्रसंचालन -5 (Republic Day Anchoring Script in Marathi)

प्रजासत्ताक दिन 2026

संपूर्ण सूत्रसंचालन संहिता (Republic Day Anchoring Script)

1. प्रस्तावना (Introduction)

(मंचावर आल्यावर उत्साहात आणि दमदार आवाजात सुरुवात करा)

“तिरंगा हाती घेतला की सगळं विसरून जातो मी,
देशासाठी काहीही करायला तयार होतो क्षणात मी.
केशरी पांढरा हिरवा हे रंग माझ्या रक्तात आहेत,
तिरंग्यासाठी जगणं मरणं माझ्या श्वासात आहे.”

निवेदक: सुप्रभात! शुभ सकाळ! आजच्या या मंगलमय सकाळी उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय अतिथी, व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या सहकारी शिक्षकवृंदांना आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांना माझा सस्नेह नमस्कार.

आज 26 जानेवारी! आपल्या भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन. हा दिवस केवळ सुट्टीचा नाही, तर आपल्या संविधानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण भारत मातेला वंदन करण्यासाठी येथे जमलो आहोत.

2. ध्वजारोहण (Flag Hoisting)

निवेदक: आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळत आहोत. मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक/प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की, त्यांनी ध्वजस्तंभाकडे जावून ध्वजारोहण करावे.

(विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट सूचना – Commanding Tone)

निवेदक: “शाळा… सावधान!”
“सर्व विद्यार्थ्यांनी ताठ उभे राहावे. हालचाल करू नये.”

(पाहुणे दोरी ओढून ध्वज फडकवतात)
निवेदक: “ध्वजारोहण!”

(ध्वज फडकल्यानंतर लगेच)
निवेदक: “राष्ट्रगीत सुरू होईल… सावधान!”

(राष्ट्रगीत झाल्यावर)
निवेदक: “भारत माता की… जय! वंदे… मातरम्!”
“शाळा… विश्राम!”

ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला आहे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे.

3. पाहुण्यांचे स्वागत व दीप प्रज्वलन

निवेदक: आपल्या भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव’ असे मानले जाते, म्हणजेच पाहुणे हे देवासारखे असतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष महोदय यांचे आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया.

“आगतम सुस्वागतम! प्रजासत्ताक दिनी आम्ही करितो आपले स्वागतम.”

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने आणि विद्येची देवता सरस्वतीच्या पूजनाने करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की, त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावे.

(दीप प्रज्वलनासाठी चारोळी)

“मन पूर्ण समर्पित करुनी, तो दीप लावूया एक,
अंतरातली ही ऊर्जा, विहरू पूर्ण अंतराळात.
श्वासांचे करून इंधन, प्राणांची करूया वात,
ही अखंड अस्तित्वाची, तेवत राहूदे ज्योत.”

(मान्यवर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना)
धन्यवाद सर! ज्ञानाची आराध्य देवता सरस्वती आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आपण कार्यक्रमाला पुढे नेऊया.

4. दिवसाचे महत्त्व (Significance of the Day)

(गंभीर आणि अभिमानास्पद आवाजात)

निवेदक: मित्रहो, आज आपण 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यावर 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा करतो?

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण देशाला चालवण्यासाठी स्वतःचे नियम, स्वतःचा कायदा नव्हता. देशाला खरी ओळख मिळाली ती संविधानामुळे!

26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ बनला. या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने अथक परिश्रम घेऊन हे संविधान देशाला अर्पण केले.

पण 26 जानेवारी हीच तारीख का? कारण, स्वातंत्र्य मिळण्याआधी, 26 जानेवारी 1930 रोजी रावी नदीच्या काठी संपूर्ण स्वातंत्र्याची (पूर्ण स्वराज्य) शपथ घेतली गेली होती. त्या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला.

आजचा दिवस संविधानाने आपल्याला दिलेल्या ‘समता, बंधुता आणि स्वातंत्र्य’ या मूल्यांची आठवण करून देण्याचा दिवस आहे. म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो – ‘मेरा भारत महान!’

5. विद्यार्थी भाषणे (Student Speeches)

निवेदक: आजचे हे तरुण विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांच्या मनातील देशभक्तीचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत.

“आज प्रजासत्ताक दिनी मांडायचे आहेत विचार खूप,
देशाचे आहेत आम्ही भावी नागरिक,
स्फुरण चढते या प्रजासत्ताक दिनी.”

मी सर्वप्रथम इयत्ता…. मधील विद्यार्थी/विद्यार्थिनी ‘कुमार/कुमारी [विद्यार्थ्याचे नाव]’ याला/हिला मंचावर आमंत्रित करतो. त्याने/तिने आपले विचार मांडावेत.

(भाषणानंतर) निवेदक: खूपच छान! आपल्या वक्तृत्वातून तू खरोखरच देशभक्तीची ज्योत पेटवलीस. मित्रहो, आजच्या तरुणाईने जर ठरवलं, तर हा देश जगातील सर्वश्रेष्ठ देश बनू शकतो.

“ना सर झुकला आहे कधी, आणि ना झुकवू कधी,
जे आपल्या हिंमतीवर जगले, खरे तर तीच जिंदगी आहे.”

यानंतर मी आमंत्रित करतो, इयत्ता…. मधील ‘कुमार/कुमारी [पुढील विद्यार्थ्याचे नाव]’ याला.

6. आभार प्रदर्शन (Vote of Thanks)

(कार्यक्रमाचा शेवट करताना)

निवेदक: कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो.

आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही सर्व विद्यार्थी, ज्यांनी इतक्या शिस्तीने हा कार्यक्रम पार पाडला, तुमचेही कौतुक!

“आभाराचा भार कशाला, गळा फुलांचे हार कशाला,
हृदयामध्ये घर असावे, त्या हृदयाला दार कशाला.”

जाता-जाता एवढंच सांगेन, देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त सीमेवर लढणं नव्हे, तर एक जबाबदार नागरिक म्हणून वागणं हेच खरं देशप्रेम आहे.

सभागृहातील सर्वांनी माझ्यासोबत मोठ्याने घोषणा द्यायची आहे:

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now