JNVST 2027 EVS : राष्ट्रीय प्रतीके (National Symbols) | इयत्ता 5 वी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक

JNVST 2027
पर्यावरण अभ्यास (EVS)
Social Surroundings
राष्ट्रीय प्रतीके (National Symbols)
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशाची ओळख जगभरात वेगळी करून देणारी काही विशेष चिन्हे म्हणजेच राष्ट्रीय प्रतीके होय. प्रत्येक भारतीय नागरिकाने या प्रतीकांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.JNVST 2027 परीक्षेत या घटकावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रीय प्रतीकाची माहिती समजून घेणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय प्रतीके म्हणजे काय?

एखाद्या देशाची ओळख, इतिहास, संस्कृती, परंपरा आणि अभिमान दर्शविणाऱ्या अधिकृत चिन्हांना राष्ट्रीय प्रतीके असे म्हणतात.ही प्रतीके भारत सरकारने अधिकृतपणे स्वीकारलेली आहेत.

भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतीके

राष्ट्रीय प्रतीकमाहिती
राष्ट्रीय ध्वजतिरंगा
राष्ट्रीय चिन्हअशोक स्तंभ
राष्ट्रीय गीतवंदे मातरम्
राष्ट्रीय गानजन गण मन
राष्ट्रीय प्राणीवाघ
राष्ट्रीय पक्षीमोर
राष्ट्रीय फूलकमळ
राष्ट्रीय वृक्षवड
राष्ट्रीय फळआंबा
राष्ट्रीय नदीगंगा
राष्ट्रीय जलचरगंगेतील डॉल्फिन
राष्ट्रीय वारसा प्राणीभारतीय हत्ती
राष्ट्रीय चलन चिन्ह

राष्ट्रीय ध्वज (तिरंगा)

भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहेत.
  • केशरी – शौर्य आणि त्याग
  • पांढरा – शांतता आणि सत्य
  • हिरवा – समृद्धी आणि विकास
  • मध्यभागी 24 आरे असलेले निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.

राष्ट्रीय चिन्ह

राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावर आधारित आहे.यामध्ये चार सिंह आहेत.खाली “सत्यमेव जयते” हे बोधवाक्य लिहिलेले असते.याचा अर्थ — सत्याचाच विजय होतो.

राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत

राष्ट्रीय गान : जन गण मनहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले.

राष्ट्रीय गीत : वंदे मातरम्हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले.

राष्ट्रीय प्राणी, पक्षी आणि फूल

राष्ट्रीय प्राणी : वाघ
  • भारताची शक्ती आणि धैर्य दर्शवतो.
  • वाघांचे संरक्षण करण्यासाठी Project Tiger सुरू करण्यात आला.
राष्ट्रीय पक्षी : मोर
  • अत्यंत सुंदर आणि आकर्षक पक्षी.
  • पावसाळ्यात मोर नाचतो.
राष्ट्रीय फूल : कमळ
  • चिखलात उगवूनही स्वच्छ राहते.
  • पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक.

राष्ट्रीय वृक्ष, फळ आणि नदी

राष्ट्रीय वृक्ष : वड
  • दीर्घायुष्य आणि विशालपणाचे प्रतीक.
राष्ट्रीय फळ : आंबा
  • भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फळ.
राष्ट्रीय नदी : गंगा
  • भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते.

विद्यार्थ्यांसाठी उदाहरण

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी शाळेत तिरंगा फडकवला जातो.राष्ट्रगीत म्हणताना सर्व विद्यार्थी सावधान स्थितीत उभे राहतात.राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे.

लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

✔ राष्ट्रीय ध्वज – तिरंगा
✔ राष्ट्रीय प्राणी – वाघ
✔ राष्ट्रीय पक्षी – मोर
✔ राष्ट्रीय फूल – कमळ
✔ राष्ट्रीय वृक्ष – वड
✔ राष्ट्रीय फळ – आंबा
✔ राष्ट्रीय नदी – गंगा
✔ राष्ट्रीय गान – जन गण मन
✔ राष्ट्रीय गीत – वंदे मातरम्
✔ राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ

JNVST 2027 अपेक्षित MCQs

1. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
A) सिंह
B) हत्ती
C) वाघ
D) चित्ता

उत्तर : C) वाघ
2. राष्ट्रीय ध्वजातील मधोमध काय असते?
A) सिंह
B) चक्र
C) तारा
D) कमळ

उत्तर : B) चक्र
3. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
A) पोपट
B) गरुड
C) मोर
D) कबूतर

उत्तर : C) मोर
4. राष्ट्रीय फूल कोणते आहे?
A) गुलाब
B) कमळ
C) जाई
D) झेंडू

उत्तर : B) कमळ
5. “सत्यमेव जयते” हे कोणाशी संबंधित आहे?
A) राष्ट्रीय गान
B) राष्ट्रीय चिन्ह
C) राष्ट्रीय ध्वज
D) राष्ट्रीय फूल

उत्तर : B) राष्ट्रीय चिन्ह
6. भारताचे राष्ट्रीय गान कोणते?
A) वंदे मातरम्
B) जन गण मन
C) सारे जहाँ से अच्छा
D) जय हो

उत्तर : B) जन गण मन
7. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
A) केळी
B) सफरचंद
C) आंबा
D) द्राक्षे

उत्तर : C) आंबा
8. राष्ट्रीय नदी कोणती आहे?
A) कृष्णा
B) गोदावरी
C) गंगा
D) कावेरी

उत्तर : C) गंगा
JNVST अभ्यास टिप्स
  • सर्व राष्ट्रीय प्रतीके चित्रांसह लक्षात ठेवा.
  • राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत यातील फरक समजून घ्या.
  • तिरंग्यातील प्रत्येक रंगाचा अर्थ लक्षात ठेवा.
  • दररोज किमान 10 MCQs सोडवा.
  • परीक्षेत अशा विषयांवर थेट प्रश्न विचारले जातात.
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now