संकलित मूल्यमापन – 2 (2025-2026)
नमूना प्रश्नपत्रिका – 2
प्र. 1. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. (10 गुण)
1. बदकाची पिल्ले कुठे राहत होती?
- (अ) पिंजऱ्यात
- (ब) समुद्रात
- (क) तळ्यात
- (ड) घरट्यात
2. गौरीच्या गावाचे नाव काय?
- (अ) मुंबई
- (ब) पळसवणे
- (क) पळस्पे
- (ड) पाळींद्रे
3. गगनात कोणता तारा मंदावला आहे?
- (अ) मंगळ
- (ब) बुध
- (क) गुरु
- (ड) शुक्र
4. लेखिकेला कोणता ताजा रस आवडायचा?
- (अ) आंब्याचा
- (ब) लिंबूचा
- (क) उसाचा
- (ड) कडुनिंबाचा
5. मिथिलेचा राजा कोण आहे?
- (अ) अर्जुन
- (ब) जनक
- (क) रावण
- (ड) राजयोग
6. वाऱ्यावर याची फुले डुलतात.
- (अ) कोरांटी
- (ब) गुलबाक्षी
- (क) जाई
- (ड) सोनवळी
7. जनावरांचे म्हणजे बैलांच्या ओरडण्याचा आवाज कसा असतो?
- (अ) भु-भु
- (ब) म्याव-म्याव
- (क) हंबार
- (ड) उदो उदो
8. ‘हताश’ या शब्दाचा समानार्थी शब्द हा आहे.
- (अ) हतबल
- (ब) दुर्बल
- (क) निराश
- (ड) जवळ
9. डॉ. कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?
- (अ) दहावे
- (ब) आठवे
- (क) अकरावे
- (ड) सातवे
10. ‘अंघोळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द हा आहे.
- (अ) स्नाथ
- (ब) स्नेहल
- (क) स्नान
- (ड) धुतन
प्र. 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (10 गुण)
1. राजहंस पक्षी कोणता चारा खातो?
2. गौरीला न्यायला कोण कोण येणार आहेत?
3. यशोदा कोणाला उठवत आहे?
4. सुखाची चव या पाठाचे मूल्य कोणते?
5. हिंद देशाने कोणाला राजा मानले आहे?
6. दिवाकरांचे पूर्ण नाव काय आहे?
7. पाखरे कोठे चिव चिव करतात?
8. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस कोणता?
9. प्रथम मानवाने देवाकडे काय मागितले?
10. कलामांचे सायन्स मास्तर कोणत्या विचाराचे होते?
2. गौरीला न्यायला कोण कोण येणार आहेत?
3. यशोदा कोणाला उठवत आहे?
4. सुखाची चव या पाठाचे मूल्य कोणते?
5. हिंद देशाने कोणाला राजा मानले आहे?
6. दिवाकरांचे पूर्ण नाव काय आहे?
7. पाखरे कोठे चिव चिव करतात?
8. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस कोणता?
9. प्रथम मानवाने देवाकडे काय मागितले?
10. कलामांचे सायन्स मास्तर कोणत्या विचाराचे होते?
प्र. 3. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. (10 गुण)
1. बदकाच्या पिल्लास कोणते दुःख होते?
2. गौरी व शिवांगीचे मुंबई दर्शन अर्धवट का राहिले?
3. गोकुळ बेचैन का झाले आहे?
4. म्हातारीच्या मुलान पत्रात काय लिहिले होते?
5. गरीब शेतकऱ्याने पाहुण्यांचे स्वागत कसे केले?
2. गौरी व शिवांगीचे मुंबई दर्शन अर्धवट का राहिले?
3. गोकुळ बेचैन का झाले आहे?
4. म्हातारीच्या मुलान पत्रात काय लिहिले होते?
5. गरीब शेतकऱ्याने पाहुण्यांचे स्वागत कसे केले?
प्र. 4. व्याकरण (10 गुण)
अ. समानार्थी शब्द लिहा. (2 गुण)
1. बाबा 2. आनंदब. विरुद्धार्थी शब्द लिहा. (2 गुण)
1. सुख 2. सत्यक. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (4 गुण)
1. किंचाळणे 2. आडवे होणेड. खालील शब्दांचा संधी विग्रह करून लिहा. (2 गुण)
1. सूर्यास्त 2. विद्यार्थीप्र. 5. खालील प्रश्नांची सविस्तर (पाच-सहा वाक्यांत) उत्तरे लिहा. (10 गुण)
1. ‘तो राजहंस एक’ या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
2. श्री संत गाडगे महाराज यांनी समाजाचा उद्धार करण्यासाठी काय काय केले?
2. श्री संत गाडगे महाराज यांनी समाजाचा उद्धार करण्यासाठी काय काय केले?
Model Answer Sheet (उत्तरपत्रिका)
प्र. 1. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा.
1. (क) तळ्यात
2. (क) पळस्पे
3. (ड) शुक्र
4. (क) उसाचा
5. (ब) जनक
6. (ड) सोनवळी
7. (क) हंबार
8. (क) निराश
9. (क) अकरावे
10. (क) स्नान
प्र. 2. एका वाक्यात उत्तरे.
1. राजहंस पक्षी मोत्याचा चारा खातो.
2. गौरीला न्यायला दादा, आई व बाबा येणार आहेत.
3. यशोदा मुकुंदाला (श्रीकृष्णाला) उठवत आहे.
4. सुखाची चव या पाठाचे मूल्य ‘संयम’ आहे.
5. हिंद देशाने सत्याला राजा मानले आहे.
6. दिवाकरांचे पूर्ण नाव शंकर काशीनाथ गर्गे आहे.
7. पाखरे सानूली झऱ्यामध्ये चिव चिव करतात.
8. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पोळा (बैलपोळा) आहे.
9. प्रथम मानवाने देवाकडे शस्त्र मागितले.
10. कलामांचे सायन्स मास्तर पुरोगामी विचाराचे होते.
प्र. 3. दोन-तीन वाक्यात उत्तरे.
1. त्या पिल्लाची चौकशी इतर बदकाची पिल्ले (त्याचे भाऊबंद) करीत नाहीत, म्हणून त्याला वाईट वाटत असे, ते स्वतःच रडत बसत असे. आपले हे दुःख ते इतर कुणालाही सांगू शकत नव्हते.
2. गौरीच्या आईच्या बांगड्या चोरीला गेल्यामुळे गौरी व शिवांगीचे मुंबई दर्शन अर्धवट राहिले.
3. श्रीकृष्ण अजून झोपेमध्ये अनेक स्वप्नाच्या मालिकेत रमला होता. त्याला जाग येत नव्हती, म्हणून गोकुळात राहणाऱ्यांनी मुकुंदाचे नाव घेऊन लवकर ऊठ असे म्हणून मोठ्यानी हाका मारल्या, यामुळे गोकुळ बेचैन झाले.
4. म्हातारीच्या मुलान पत्रात आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यान लिहिलेलं असतं.
5. गरीब शेतकऱ्याने पाहुण्यांचे स्वागत राम राम करून केले. पाहुणा लांबून चालत आल्याने त्याला आंघोळीला पाणी, पिठलं आणि ज्वारीची भाकरी दिली.
प्र. 4. व्याकरण
अ. समानार्थी शब्द: 1. बाबा – पिता / वडील / जनक 2. आनंद – हर्ष
ब. विरुद्धार्थी शब्द: 1. सुख – दुःख 2. सत्य – असत्य
क. वाक्प्रचार:
1. किंचाळणे – मोठ्याने ओरडणे. (वाक्य: साप पाहिल्यावर लहान मुलगी भीतीने किंचाळली.)
2. आडवे होणे – कामा नंतर जरा विश्रांती घेणे / झोपणे. (वाक्य: शेतातील कष्टाची कामे आटोपल्यावर शेतकरी झाडाखाली आडवे होतात.)
1. किंचाळणे – मोठ्याने ओरडणे. (वाक्य: साप पाहिल्यावर लहान मुलगी भीतीने किंचाळली.)
2. आडवे होणे – कामा नंतर जरा विश्रांती घेणे / झोपणे. (वाक्य: शेतातील कष्टाची कामे आटोपल्यावर शेतकरी झाडाखाली आडवे होतात.)
ड. संधी विग्रह: 1. सूर्यास्त = सूर्य + अस्त 2. विद्यार्थी = विद्या + अर्थी
प्र. 5. सविस्तर उत्तरे.
1. प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना आपण इतरांप्रमाणे नाही, आपल्याला कोणी विचारीत नाहीत, नावे ठेवतात याच एका विचाराने दुःखी कष्टी होऊ नये. इतरांहून आपल्याकडे अन्य कोणते चांगले गुण आहेत हे जाणून घेतल्यावर, स्वतःला बदक समजून वावरताना दुःखी झालेल्या पिल्लाला जेव्हा आपण राजहंस असल्याची जाणीव झाली, तेव्हा त्याचे दुःख व भीती दूर पळाली. तसे त्या व्यक्तीचेही होऊ शकते, मात्र स्वतःच त्याचा शोध घ्यावा लागतो, हेच या भावगीतातून कवीने सांगितले आहे.
2. श्री संत गाडगे महाराज यांनी महाराष्ट्रभर फिरून समाजातील दैन्यावस्था, अंधश्रद्धा आणि रूढी दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी वृद्धाश्रम, दवाखाने, शिक्षण संस्था व विधवाश्रम सुरू केले. त्यांनी स्वच्छतेवर भर देऊन स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान सुरू केले.
Oral Test Question Paper (तोंडी परीक्षा)
एकूण गुण: 20 (प्रत्येक प्रश्नाला 1 गुण)
1. ‘सुखाची चव’ या पाठाचा साहित्यप्रकार कोणता आहे?
उत्तर: ललितलेख
2. ‘हा हिंद देश माझा’ या देशभक्तीपर गीताचे कवी कोण आहेत?
उत्तर: आनंदराव टेकाडे
3. मराठी व्याकरणात शब्दांच्या एकूण जाती किती आहेत?
उत्तर: 8 (आठ)
4. नाम म्हणजे काय?
उत्तर: वस्तूच्या, व्यक्तीच्या किंवा पदार्थाच्या नावाला नाम म्हणतात.
5. ‘कलिजा’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
उत्तर: काळीज
6. ‘यंदा’ या शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर: यावर्षी
7. ‘अपूर्ण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल?
उत्तर: पूर्ण
8. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: विष्णू वामन शिरवाडकर
9. रामेश्वरम मध्ये पुस्तकांचा संग्रह कोणाकडे होता?
उत्तर: एस. टी. आर. मणिकम
10. डॉ. कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
उत्तर: विंग्ज ऑफ फायर (अग्निपंख)
11. ‘पोळा’ हा सण कोणत्या देवतेची आज्ञा पाळावयाचा दिवस आहे?
उत्तर: कृषीदेवतेची
12. विनायक नरहर भावे यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो?
उत्तर: विनोबा भावे
13. कर्नाटकाला एकूण किती ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत?
उत्तर: आठ
14. गुढीपाडवा हा सण कर्नाटकात कोणत्या नावाने साजरा होतो?
उत्तर: युगादी पाडडे
15. ‘आलोकाबाईस पत्र’ हे पत्र कोणी लिहिले आहे?
उत्तर: संत गाडगे महाराज
16. ‘माय’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर: वामन सुदामा निंबाळकर
17. मुक्ताईला कोणी आपले गुरु मानले?
उत्तर: चांगदेवाने
18. ‘शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी’ या पाठाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: कृ. वि. सोहनी
19. संत कान्होपात्रा यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर: श्यामा
20. ‘दीप लाव तो’ या कवितेत मानवाने देवाकडे प्रथम काय मागितले होते?
उत्तर: शस्त्र


