प्रजासत्ताक दिन सोहळा : सूत्रसंचालन –6
77वा प्रजासत्ताक दिन सोहळा: सूत्रसंचालन संहिता
(मंचावर उत्साहाने आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रवेश करा)
सूत्रसंचालक:
सुप्रभात आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर चारोळीने करूया:
या मातीचं रिण कधी फेडता येत नाही,
26 जानेवारीला मान झुकवतो आम्ही,
या देशासाठी जगणं हेच आमचं जीवन.”
आज आपण आपल्या महान भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, आजचे प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
सूत्रसंचालक:
आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळत आहोत, तो म्हणजे ध्वजारोहण. तिरंगा हा आपल्या देशाची शान आणि मान आहे.
मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की, त्यांनी ध्वजस्तंभाजवळ जाऊन ध्वजारोहण करावे.
शाळा… सावधान! (School… Attention!)
(सर्व विद्यार्थ्यांनी सरळ रेषेत, ताठ उभे राहावे. हालचाल करू नये.)
ध्वजारोहण! (Flag Hoisting)
(ध्वज फडकल्यानंतर)
ध्वजाला… सलामी! (Salute!)
राष्ट्रगीत… सुरू करा! (जन-गण-मन…)
(राष्ट्रगीत संपल्यानंतर)
शाळा… विश्राम! (Stand at Ease!)
सर्वांनी जोरात घोषणा द्यायची आहे – भारत माता की… जय! वंदे… मातरम्! [4]
सूत्रसंचालक:
धन्यवाद सर. आता मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे.
आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते – ‘अतिथी देवो भव’. पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आणि संस्कृती आहे.
कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने आणि विद्येची आराध्य देवता सरस्वती तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावे.
(दीपप्रज्वलनासाठी निवेदन):
अंतरातली ही ऊर्जा, विहरू पूर्ण अंतराळात.”
हा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येवो, हीच प्रार्थना.
(गंभीर आणि स्पष्ट आवाजात)
सूत्रसंचालक:
मित्रांनो, आज आपण 26 जानेवारीलाच हा दिवस का साजरा करतो?
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, ब्रिटीशांचा युनियन जॅक उतरला आणि आपला तिरंगा डौलाने फडकू लागला. पण देशाला चालवण्यासाठी स्वतःचे नियम आणि कायद्याची गरज होती.
देशातील बुद्धीजीवी आणि विद्वान लोकांनी एकत्र येऊन संविधानाची निर्मिती केली. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने लिहिलेले हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला अर्पण करण्यात आले आणि लागू झाले.
आजचा दिवस हा केवळ सुट्टीचा नसून, संविधानाने दिलेल्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. याच दिवशी 1930 साली रावी नदीच्या काठी ‘पूर्ण स्वराज्या’ची घोषणा झाली होती, त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. या संविधानामुळेच आज आपण एक सार्वभौम आणि लोकशाही देशाचे नागरिक म्हणून अभिमानाने जगत आहोत.
सूत्रसंचालक:
आता आपण वळूया आपल्या उद्याच्या भविष्याकडे. आपल्या शाळेतील विद्यार्थी त्यांचे विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यातील जोश पाहून मला म्हणावंसं वाटतं:
स्फुरण चढते या प्रजासत्ताक दिनी.”
1. सर्वप्रथम मी इयत्ता …. मधील (विद्यार्थ्याचे नाव) याला आमंत्रित करतो.
(भाषणानंतर): “वाह! खूपच सुंदर विचार मांडले.”
2. यानंतर येत आहे (विद्यार्थ्याचे नाव).
वंदे मातरम गाताना मन भरून येतं.”
या ऊर्जेने विचार मांडण्यासाठी येत आहे…. (विद्यार्थ्याचे नाव).
(भाषणानंतर): “अतिशय ओजस्वी भाषण! टाळ्या वाजवून आपण या विद्यार्थ्यांचे कौतुक करूया.”
सूत्रसंचालक:
कोणत्याही कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होते.
आजच्या या सोहळ्यासाठी आपला अमूल्य वेळ देणारे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला ते आमचे मुख्याध्यापक, आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली ते सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, यांचे मी मनापासून आभार मानतो.
तसेच, शांततेत बसून हा कार्यक्रम पाहणाऱ्या माझ्या शिस्तप्रिय विद्यार्थी मित्रांचेही विशेष आभार.
शेवटी जाता-जाता एवढेच म्हणेन:
हृदयामध्ये घर असावे, त्या हृदयाला दार कशाला.”
सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपण सर्वांनी एकत्र जोरात जयघोष करूया:


