महाराष्ट्र टीईटी २०२४: मराठी विषयाचे प्रश्न आणि उत्तरे (सविस्तर स्पष्टीकरणासह)
परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे!
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) २०२४ मधील मराठी विषयाच्या (पेपर II) संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण (Detailed Analysis) आणि तपासलेले (Verified) उत्तरे (Answer Key) येथे उपलब्ध आहेत.
या पोस्टमध्ये तुम्हाला खालील गोष्टी मिळतील:
- संपूर्ण ३० मराठी प्रश्नांचा संच (Question Bank).
- प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर आणि ते उत्तर का योग्य आहे, याचे सोप्या भाषेत सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation).
- मराठी व्याकरण, शब्दसंपदा, म्हणी, वाक्प्रचार, तसेच उतारा आणि कवितेवर आधारित प्रश्नांचे विश्लेषण.
- संयुक्त वाक्य, मिश्रवाक्य, विभक्ती प्रत्यय, समास, अलंकार आणि संधी यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण.
आगामी परीक्षेच्या तयारीसाठी प्रश्नांचा नेमका कल आणि स्वरूप समजून घेण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा. यामुळे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल आणि तुमचा अंतिम स्कोर वाढविण्यात मदत होईल!
आत्ताच वाचा आणि TET परीक्षेची तुमची तयारी अधिक मजबूत करा!
महाराष्ट्र टीईटी २०२४ – विषय: मराठी (प्रश्नसंच)
१. खालील अक्षरांपासून तयार होणा-या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
ते, ते, रि, व्वा, त, पो, री , उ, स, हा, चे, धा
२. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय ?
३. ‘वनवास’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
४. ‘आरती सुरू झाली. घंटानाद सुरू झाला.’ यांचे मिश्रवाक्य कसे होईल ?
५. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते ?
६. ‘बद’ उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता ?
७. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे ?
८. ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत ?
९. सर्व लघू मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता ?
१०. ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो ______________’ या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा.
११. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा :
१२. पुढीलपैकी वचननियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?
१३. ‘सूर्य उगवला’ कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?
१४. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे _______________ होय.
१५. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
१६. ‘लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
१७. अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे ?
१८. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे ‘वा’ प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही ?
१९. अरेरे, आणि, कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत ?
२०. ‘आज पाऊस येईल बहुतेक’ या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो ?
२१. पुढीलपैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?
२२. कृतघ्न, घरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत ?
२३. पुढीलपैकी ‘तलाव’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
२४. पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती ?
उताऱ्यावर आधारित प्रश्न (प्रश्न क्र. २५ ते २७)
उतारा:
साने गुरुर्जीनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुरवास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋर्षीचा आश्रम होता. पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी चार महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पहात होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कु-हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागे. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दुस-या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले तेंव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे तिथे ही फुले उमललेली होती.
२५. शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते ?
२६. या उता-यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे ?
२७. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उता-यात आलेला नाही ?
कवितेवर आधारित प्रश्न (प्रश्न क्र. २८ ते ३०)
कविता:
तू कैदयांमधला कैदी। मी मुक्तामधले मुक्त
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ? ।।
माझ्यावर लिहिती गीते या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते गरूडाची गर्द भरारी ।।
जड लंगर तुझिया पायी
माझ्याहुन आहे योग्य
आभाळ म्हणाले ‘नाही’
भूमीही म्हणाली ‘नाही’।
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही।।
पापण्यात जळली लंका
उच्चारून होण्याआधी लाह्यांपरी आसू झाले।
उच्चाटन ‘शब्दा’ आले ।।
तू पीस कसा होणार ?।
भूमीला प्रश्न विचार।।
दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली।
‘मी कागद झाले आहे चल लिही’ असे ती वदली ।।
२८. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे ?
२९. ‘जड लंगर तुझिया पायी’ या ओळीतून काय सूचित होते ?
३०. ‘दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली’ या ओळीत कोणता अलंकार आला आहे ?




