LBA ८वी मराठी पद्य 7.तिथे | गद्य 8.अतिथी

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3.  इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
  4.  इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  6. इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  7. ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  8. पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी

विषय – मराठी

गुण – 20

पद्य 7 – तिथे | गद्य 8 – अतिथी

प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)

उद्दिष्टानुसार प्रामुख्यतागुण विभागणीकठीण पातळीनुसारगुण विभागणी
स्मरण (Knowledge)7 गुण (35%)सोपे (Easy)9 गुण (45%)
आकलन (Understanding)8 गुण (40%)मध्यम (Average)8 गुण (40%)
अभिव्यक्ती (Expression)5 गुण (25%)कठीण (Difficult)3 गुण (15%)
एकूण20 गुण (100%)एकूण20 गुण (100%)

विभाग अ: पद्य – तिथे (8 गुण)

प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 गुण)

  1. वाऱ्यावर याची फुले डुलतात: (सोपे)
    • अ) कोरांटी
    • ब) गुलबाक्षी
    • क) जाई
    • ड) सोनवळी
  2. करंडासह तेथे कोण बागडतात? (मध्यम)
    • अ) भोरड्या
    • ब) बाभळी
    • क) शेरड्या
    • ड) कुंडले

प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 गुण)

  1. अद्भुत बेटावर राहिल्यासारखे कवीला केव्हा वाटते? (सुलभ)
  2. कवीने कोणत्या वनस्पतीला समशेर म्हटले आहे? (सुलभ)
  3. दोन डोंगरांमधील खोलगट जागा याला काय म्हणतात? (मध्यम)

प्रश्न 3. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 1 = 2 गुण)

  1. कवीने निवडुंगाच्या बेटाजवळ कोणते दृश्य पाहिले? (कठिण)

प्रश्न 4. रिकाम्या जागा भरा. (1 x 1 = 1 गुण)

  1. गणेश हरी पाटील यांचा जन्म _______ साली झाला. (मध्यम)

विभाग ब: गद्य – अतिथी (12 गुण)

प्रश्न 5. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 गुण)

  1. बैलांना सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांचे कोड कौतुक करण्याचा दिवस कोणता? (सोपे)
    • अ) दिवाळी
    • ब) दसरा
    • क) नागपंचमी
    • ड) पोळा
  2. मुलाना सांभाळतो तसे त्या बैलांना सांभाळायचे या वाक्यातील अलंकार ओळखा. (सोपे)
    • अ) अनुप्रास
    • ब) लेष
    • क) उपमा
    • ड) रुपक

प्रश्न 6. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 4 = 4 गुण)

  1. अतिथी या पाठाचा साहित्य प्रकार कोणता? (मध्यम)
  2. भारतीय संस्कृती नेहमी कोणता धडा शिकवते? (सोपे)
  3. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस कोणता? (सोपे)
  4. भूतदया म्हणजे काय? (मध्यम)

प्रश्न 7. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 गुण)

  1. पैकूने आपल्या बैलांना कसे स्वच्छ करून सजविले? (सोपे)
  2. डॉक्टरीणबाईनी इनामाचा एक रुपया दिल्यानंतर पैकूला काय वाटले? (कठीण)

प्रश्न 8. दीर्घोत्तरी प्रश्न (2 गुण)

  1. पैकूने बैलांविषयी कृतज्ञता कशी दाखविली आहे? (कठीण)
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now