
LBA Update Date – 14.08.2025
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 1 – अनंतशक्ति परमेश्वरु
पद्य 1 – पैल तो गे काऊ कोकताहे
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 1 – अनंतशक्ति परमेश्वरु | पद्य 1 – पैल तो गे काऊ कोकताहे
प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)
| उद्दिष्टानुसार प्रामुख्यता | गुण विभागणी | कठीण पातळीनुसार | गुण विभागणी |
|---|---|---|---|
| स्मरण (Knowledge) | 9 गुण (45%) | सोपे (Easy) | 11 गुण (55%) |
| आकलन (Understanding) | 6 गुण (30%) | मध्यम (Average) | 6 गुण (30%) |
| अभिव्यक्ती (Expression) | 5 गुण (25%) | कठीण (Difficult) | 3 गुण (15%) |
| एकूण (Total) | 20 गुण (100%) | एकूण (Total) | 20 गुण (100%) |
विभाग अ: गद्य – अनंतशक्ति परमेश्वरु (10 Marks)
प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)
- ‘जात्यंध’ शब्दाचा संधी विग्रह असा होतो.
- अ) जात + अंध
- ब) जात्य + अंध
- क) जात यंद
- ड) जाति + अंध
- ‘परमेश्वर’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता?
- अ) स्वर संधी
- ब) विसर्ग संधी
- क) व्यंजन संधी
- ड) यापैकी नाही
प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)
- महानुभाव पंथाचे संस्थापक कोण?
- हत्ती पाहण्यासाठी कोण गेले?
- पोट पाहणाऱ्यास हत्ती कसा वाटला?
प्रश्न 3. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)
- डोळस मनुष्य आंधळ्याना काय म्हणाला?
- ‘अनंतशक्ति परमेश्वरु’ या कथेचे तात्पर्य कोणते?
प्रश्न 4. संबंध ओळखून लिहा. (1 Mark)
- सर्व जाणणारा : सर्वज्ञ :: जन्मापासून अंध :________
विभाग ब: पद्य – पैल तो गे काऊ कोकताहे (10 Marks)
प्रश्न 5. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)
- ‘कोकताहे’ या शब्दाचा संधी विग्रह असा होतो.
- अ) कोकत + आहे
- ब) कोक + आहे
- क) कोकः + आहे
- ड) का + कताहे
- पंढरीराव या सामाजिक शब्दाचा समास हा होतो.
- अ) अव्ययीभाव
- ब) षष्ठी तत्पुरुष
- क) बहुव्रीही
- ड) द्वंद्व
प्रश्न 6. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)
- ज्ञानेश्वर कोणाशी बोलत आहेत?
- लोकसाहित्यात कोणत्या पक्षाला माहेरचा दूत मानले जाते?
- पाहुणे म्हणून घरी कोण यावे असे कवीला वाटते?
प्रश्न 7. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)
- हवा असलेला शकुन सांगण्यासाठी कवी कावळ्याला कोणकोणत्या गोष्टी देऊ करतो?
- “पाहुणे पंढरीरावो घरा कै येती.” संदर्भसहित स्पष्टीकरण करा.
प्रश्न 8. अलंकार ओळखून लक्षणे सांगा. (1 Mark)
- सुसंगती सदा घडो सुज्जन वाक्य कानी पडो |




