टीप – DSERT कडून प्रश्नसंच तयार करण्याचे कार्य सुरू आहे तत्पूर्वी सरावासाठी आम्ही खालील प्रश्नसंच दिलेला आहे..
CLASS – 2
MEDIUM – MARATHI
SUBJECT – MAAY MARATHI
SYLLABUS – KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
फक्त सरावासाठी
पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली
पाठ आधारित प्रश्नपेढी (सरावासाठी) Class -2
पाठ – ५ गौरव
पाठ: गौरव
एक राजा होता. तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा. त्यांची नेहमी काळजी घ्यायचा. राजा खूप खूप दयाळू व न्यायप्रिय होता.
एकदा राजा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. अचानक वाटेत त्याला ठेच लागली. त्याने पाहिले तर रस्त्याच्या मधोमध मध्यम आकाराचा दगड जमिनीत रुतला होता. त्याने मनाशी विचार केला की हा दगड इथे बऱ्याच दिवसापासून पडलेला दिसतो. पण याला इथून कुणीच कसे बाजूला सारले नाही. बघू येणारा जाणारा कुणी हा दगड हटवतो का? असे म्हणून राजा एका झाडामागे लपून बसला.
थोड्याच वेळात एक शेतकरी बैलजोडी घेऊन त्याच वाटेने चालला होता. शेतकऱ्याने तो दगड पाहिला आणि बाजूला वळून तो तसाच पुढे गेला. इतक्यात एक घोडेस्वार तिथे आला. राजाने त्याला पाहिले, तो अगदी मजेत गाणे गुणगुणत चालला होता. दगड दिसताच घोडा थांबला. घोडेस्वाराने खाली पाहिले व रागारागाने पुटपुटला. “किती तरी दिवसांपासून मी हा दगड पाहतोय पण याला कुणी हटवत का नाही? इथले लोक फारच आळशी दिसतात.” आणि असे म्हणत तो पुढे निघून गेला.
काही वेळाने एक म्हातारा डोक्यावर फळांची टोपली घेऊन तिथे आला. अचानक ठेच लागून तो खाली पडला. त्याची फळे सर्वत्र विखुरली. एक विद्यार्थी तेथूनच शाळेला निघाला होता. त्याने धावत पळत येऊन त्या आजोबांना मदत केली. त्यांना हाताला धरुन उठविले. फळे गोळा करुन टोपलीत भरली. आजोबांनी मुलाला आशीर्वाद दिला व आजोबा निघून गेले.
त्या विद्यार्थ्यां तो दगड हलविण्याचा प्रयत्न केला. पण दगड काही हलेना. एक व्यक्ती तेथे आली व त्या मुलाला तिने मदत केली दोघांनी तो दगड रस्त्याच्या बाजूला सरकवला त्या व्यक्तीने मुलाला त्याचे नाव विचारले. पाठशाळेचे नाव विचारले. दुसऱ्या दिवशी राजा पाठशाळेत आला. सर्व गुरुजनांसमोर व विद्याथ्यर्थ्यांसमोर त्याने त्या मुलाला बक्षीस दिले. त्याने केलेल्या कामाबद्दल त्याचा गौरव केला. तेंव्हाच त्या मुलालाही कळाले की दगड हलविण्यास आपल्याला राजाने मदत केली.
नवीन शब्दांचे अर्थ (Glossary):
- प्रजा – लोक
- फेरफटका – फिरणे
- घोडेस्वार – घोड्यावर बसलेला
- पुटपुटणे – तोंडातल्या तोंडात अस्पष्ट बोलणे.
- विखुरणे – पसरणे.
- गौरव – कौतुक करणे, मान देणे.
I. बहुपर्यायी प्रश्न (MCQs) – पाठावर आधारित
योग्य पर्याय निवडा.
1. राजा आपल्या प्रजेवर कसे प्रेम करायचा?
सोपे गुण: 12. रस्त्यात राजाला कशामुळे ठेच लागली?
सोपे गुण: 13. दगड कोण हलवतो हे पाहण्यासाठी राजा कोठे लपून बसला?
सोपे गुण: 14. शेतकऱ्याने दगड पाहिल्यावर काय केले?
मध्यम गुण: 15. म्हाताऱ्या आजोबांच्या डोक्यावर कशाची टोपली होती?
सोपे गुण: 16. म्हातारे आजोबा खाली का पडले?
सोपे गुण: 17. विद्यार्थ्याने आजोबांना कशी मदत केली?
सोपे गुण: 18. मुलाला गौरवण्यासाठी राजा कोठे आला?
सोपे गुण: 19. गौरव करणे म्हणजे काय?
मध्यम गुण: 110. राजा कोणत्या स्वभावचा होता?
सोपे गुण: 1II. बहुपर्यायी प्रश्न (MCQs) – चित्रांवर आधारित (पृष्ठ क्र. 22)
खालील चित्रातील गोष्टी पाहून तू काय करशील यावर आधारित योग्य पर्याय निवडा.
11. सार्वजनिक नळातून पाणी वाया जात असेल तर तू काय करशील?
सोपे गुण: 112. रस्त्यात दगड पडलेला असेल तर तू काय करशील?
सोपे गुण: 113. मुले फुलांच्या झाडाची फुले व फांद्या तोडत असतील तर तू काय करशील?
मध्यम गुण: 114. लहान मुलगा कुत्र्याला दगड मारत असेल तर तू काय करशील?
मध्यम गुण: 115. रस्त्यात लहान मुलगा घसरून पडला असेल तर तू काय करशील?
सोपे गुण: 1III. रिकाम्या जागा भरा (Fill in the Blanks)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
16. राजा खूप खूप दयाळू व _________ होता.
सोपे गुण: 117. अचानक वाटेत राजाला _________ लागली.
सोपे गुण: 118. _________ बैलजोडी घेऊन त्याच वाटेने चालला होता.
सोपे गुण: 119. म्हातारा आजोबांना ठेच लागून त्यांची फळे सर्वत्र _________.
मध्यम गुण: 120. आजोबांनी मुलाला _________ दिला व निघून गेले.
सोपे गुण: 1IV. जोड्या जुळवा (Match the Following)
‘अ’ गटातील शब्दांची ‘ब’ गटातील योग्य अर्थाशी जुळवा.
| अ गट | ब गट |
|---|---|
| 21. प्रजा | a) घोड्यावर बसलेला |
| 22. फेरफटका | b) पसरणे |
| 23. घोडेस्वार | c) लोक |
| 24. पुटपुटणे | d) फिरणे |
| 25. विखुरणे | e) तोंडातल्या तोंडात बोलणे |
V. व्यक्ती ओळखा (Identify the Person) – चित्रांवर आधारित (पृष्ठ क्र. 23)
खालील चित्रे पाहून चित्रातील व्यक्ती कोण आहेत ते ओळखून नावे चौकनाेत लिहा.
26. _________
27. _________
28. _________
29. _________
30. _________(टीप: पात्य्यापुस्त्कातील पान नंबर 23 पहावे)
VI. विरुद्धार्थी शब्द लिहा (Write Antonyms)
नमुन्याप्रमाणे योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा.
नमुना: सरळ X वाकडे
31. बाहेर X _________
सोपे गुण: 132. पुढे X _________
सोपे गुण: 133. खाली X _________
सोपे गुण: 1VII. थोडक्यात उत्तरे लिहा (Short Answer Questions)
खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वाक्यात लिहा.
34. राजाला ठेच लागल्यामुळे त्याने कोणता विचार केला?
मध्यम गुण: 235. शेतकरी आणि घोडेस्वाराने दगड पाहून काय केले?
मध्यम गुण: 236. विद्यार्थ्याने म्हाताऱ्या आजोबांना कशी मदत केली?
सोपे गुण: 237. दगड हलविण्यास मुलाला कोणी मदत केली?
सोपे गुण: 138. राजाने मुलाचा गौरव कोठे केला आणि का?
कठीण गुण: 3VIII. कोण काय चालवतो? (Who Drives What?)
घोडेस्वार म्हणजे घोड्यावर बसलेला, तर खालील लोकांना काय म्हणाल?
39. बैलगाडी चालविणारा – _________
सोपे गुण: 140. मोटारगाडी चालविणारा – _________
सोपे गुण: 141. विमान चालविणारा – _________
सोपे गुण: 1IX. शुद्ध शब्द लिहा (Correct the Spelling)
खालील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा.
42. व्यत्की – _________
मध्यम गुण: 143. टेपली – _________
मध्यम गुण: 144. घोडास्वार – _________
मध्यम गुण: 1उत्तरसूची (Answer Key)
I. बहुपर्यायी प्रश्न (MCQs) – पाठावर आधारित
- 1. b) खूप जास्त
- 2. c) एका दगडाने
- 3. c) झाडामागे
- 4. a) बाजूला वळून पुढे गेला
- 5. b) फळांची
- 6. c) ठेच लागली
- 7. b) धावत येऊन उठविले व फळे गोळा केली
- 8. c) पाठशाळेत
- 9. b) कौतुक करणे
- 10. c) दयाळू व न्यायप्रिय
II. बहुपर्यायी प्रश्न (MCQs) – चित्रांवर आधारित (पृष्ठ क्र. 22)
- 11. b) नळ बंद करीन
- 12. b) दगड बाजूला सारून ठेवीन
- 13. b) त्यांना थांबवेन आणि झाडे तोडू नका असे सांगेन
- 14. b) त्याला दगड मारण्यापासून थांबवेन
- 15. b) त्याला मदत करायला धावेन
III. रिकाम्या जागा भरा (Fill in the Blanks)
- 16. न्यायप्रिय
- 17. ठेच
- 18. शेतकरी
- 19. विखुरली
- 20. आशीर्वाद
IV. जोड्या जुळवा (Match the Following)
- 21. प्रजा – c) लोक
- 22. फेरफटका – d) फिरणे
- 23. घोडेस्वार – a) घोड्यावर बसलेला
- 24. पुटपुटणे – e) तोंडातल्या तोंडात बोलणे
- 25. विखुरणे – b) पसरणे
V. व्यक्ती ओळखा (Identify the Person) – चित्रांवर आधारित (पृष्ठ क्र. 23)
- 26. राजा
- 27. शिक्षक / साहेब
- 28. पोलीस
- 29. दूधवाला / गवळी
- 30. डॉक्टर
VI. विरुद्धार्थी शब्द लिहा (Write Antonyms)
- 31. बाहेर X आत / आतमध्ये
- 32. पुढे X मागे
- 33. खाली X वर
VII. थोडक्यात उत्तरे लिहा (Short Answer Questions)
- 34. राजाला ठेच लागल्यामुळे त्याने विचार केला की, हा दगड इथे बऱ्याच दिवसांपासून पडलेला दिसतो पण याला इथून कुणीच कसे बाजूला सारले नाही.
- 35. शेतकऱ्याने दगड पाहिला पण बाजूला वळून तो तसाच पुढे गेला. घोडेस्वारानेही दगड पाहिला आणि रागारागाने पुटपुटत तोही पुढे निघून गेला, त्याने दगड हलवला नाही.
- 36. विद्यार्थ्याने धावत पळत येऊन म्हाताऱ्या आजोबांना हाताला धरून उठवले. त्यांची सर्व फळे गोळा करून टोपलीत भरली आणि त्यांना मदत केली.
- 37. दगड हलविण्यास मुलाला राजाने मदत केली.
- 38. राजाने त्या मुलाचा गौरव पाठशाळेत सर्व गुरुजन आणि विद्यार्थ्यांसमोर केला. कारण त्या मुलाने आजोबांना मदत केली आणि रस्तातील दगड बाजूला सारण्याचे चांगले काम केले होते.
VIII. कोण काय चालवतो? (Who Drives What?)
- 39. बैलगाडी चालविणारा – बैलगाडीवान
- 40. मोटारगाडी चालविणारा – चालक / ड्रायव्हर
- 41. विमान चालविणारा – विमानचालक / वैमानिक
IX. शुद्ध शब्द लिहा (Correct the Spelling)
- 42. व्यत्की – व्यक्ती
- 43. टेपली – टोपली
- 44. घोडास्वार – घोडेस्वार



