S.S.L.C. MODEL QUESTION PAPER-4 : 2024-25
Subject : SOCIAL SCIENCE
Subject Code : 85-K
Time : 3 Hours 15 Minutes
Translated by – Smart Guruji

परीक्षार्थींसाठी सामान्य सूचना:
1. या प्रश्नपत्रिकेत एकूण 38 प्रश्न आहेत.
2. प्रश्नांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
3. उजव्या बाजूला दिलेले आकडे प्रश्नांसाठी पूर्ण गुण दर्शवतात.
4. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांसह उत्तर देण्यासाठी दिलेला वेळ, प्रश्नपत्रिकेच्या शीर्षस्थानी दिलेला आहे.
I: खालील प्रश्नांसाठी चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडा आणि अक्षरासह उत्तर लिहा. 8 × 1 = 8
- भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा मुख्य परिणाम कोणता होता?
(A) ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली.
(B) कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले.
(C) झांशी स्वतंत्र राज्य बनले.
(D) नानासाहेब यांना निवृत्ती वेतन देण्यात आले.
2. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे कुठे आहेत?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) जपान
(D) पोलंड
3. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे?
(A) रोम
(B) पॅरिस
(C) जिनिव्हा
(D) न्यूयॉर्क
4. “मानवजात एकच आहे” असे कोणी म्हटले?
(A) महात्मा गांधी
(B) पंपा
(C) ज्योतिबा फुले
(D) बसवण्णा
5. भारताची “सिलिकॉन व्हॅली” कोठे आहे?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) केरळ
6. “भारताचे मँचेस्टर” म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
(A) दावणगेरे
(B) कोइमतूर
(C) मुंबई
(D) इंदूर
7. भारतात आर्थिक वर्षाची सुरुवात केव्हा होते?
(A) एप्रिल 1 पासून
(B) जून 5 पासून
(C) नोव्हेंबर 1 पासून
(D) मार्च 1 पासून
8. भारतात कोणत्या वर्षी जिल्हा औद्योगिक केंद्र सुरू झाले?
(A) 1947
(B) 1954
(C) 1966
(D) 1978
II. खालील प्रत्येक प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या. (8×1=8)
9. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
10. इटलीच्या फॅसिस्ट हुकूमशहाचे नाव सांगा.
11. विश्वस्त समितीची स्थापन का करण्यात आली?
12. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेस बंदी आहे?
13. हिवाळ्यात भारतातील तापमान कमी होण्याचे कारण काय आहे?
14. भारतातील पहिला कागद कारखाना कोठे सुरु झाला?
15. विकेंद्रीकरण म्हणजे काय?
16. पुरवठादार म्हणजे कोण?
III. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते चार वाक्ये / मुद्दे यामध्ये उत्तरे द्या. (8×2=16)
17. केंद्रीय लोकसेवा आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
किंवा
कृषी आणि अन्न संस्थेचे उद्देश स्पष्ट करा.
18. डोंबारी समाजाचे स्वरूप स्पष्ट करा.
किंवा
हुंडा प्रथेमुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट करा.
19. अॅनी बेझंट यांनी थियोसोफिकल सोसायटीच्या कार्यात कसे नवचैतन्य निर्माण केले?
20. जुनागढ भारतीय संघराज्यात कसे विलीन करण्यात आले?
21. भारतातील द्वीपसमूहांबद्दल थोडक्यात माहिती द्या.
22. गहू शेतीसाठी आवश्यक भौगोलिक घटक स्पष्ट करा.
23. शहरी आणि ग्रामीण भागात दरी वाढत आहे. का?
24. ग्राहकांच्या शोषणाची कारणे कोणती?
IV: खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत/मुद्यांत उत्तर द्या: 9 × 3 = 27
25. दुसऱ्या कर्नाटिक युद्धाचे वर्णन करा.
किंवा
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची आर्थिक कारणे स्पष्ट करा.
26. काळी माती आणि गाळाची माती यामध्ये काय फरक आहे?
किंवा
सदाहरित जंगले आणि पानझडी जंगले यामध्ये काय फरक आहे?
27. पंचवार्षिक योजनांचे यश स्पष्ट करा.
किंवा
सार्वजनिक अर्थव्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करा.
28. बँकांची कार्ये कोणती?
किंवा
उद्योजकांच्या कार्यांची माहिती द्या.
29. ब्रिटीश राजवटीतील पोलिस व्यवस्थेत कसे बदल झाले?
30. सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी स्पष्ट करा.
31. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मूलभूत तत्त्वे स्पष्ट करा.
32. बेरोजगारी ही गंभीर सामाजिक समस्या कशी आहे?
33. दूरसंवेदी तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करा.
V: खालील प्रश्नांची प्रत्येकी आठ वाक्यांत उत्तर द्या: 4 × 4 = 16
34. ब्रिटीशांविरुद्ध पुट्टबसप्पांचा लढा सदैव स्मरणात राहील. समर्थन द्या.
किंवा
हिटलरच्या आर्य वंशवाढीच्या महत्वाकांक्षेमुळे सामूहिक हत्याकांड घडले. समर्थन द्या.
35. ब्रिटिशांविरुद्ध संथाल जनजातीचा लढा स्पष्ट करा.
36. केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यक सक्षमीकरणासाठी घेतलेली धोरणे स्पष्ट करा.
37. भूकंपाची कारणे आणि परिणाम कोणते?
VI. खालील भारताच्या नकाशावर दिलेल्यांपैकी कोणतीही पाच स्थाने दाखवा: (1×5=5)
38. खालीलपैकी कोणतेही 5 भारताच्या नकाशावर चिन्हांकित करा: (1×5=5)
(a) कर्कवृत्त
(b) कोसी धरण
(c) कैगा
(d) विशाखापट्टणम
(e) मन्नार आखात
(f) कृष्णा जलसंधारण योजना
(g) गुवाहाटी
दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पर्यायी प्रश्न:
हिमालय पर्वत भारतीयांसाठी कसा उपयुक्त आहे? स्पष्ट करा. (5 गुण)
Translated by – Smart Guruji





