NMMS ONLINE PRACTICE TEST
कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.
प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.
NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE
NMMS EXAM QUESTION PAPERS PDF – CLICK HERE
8TH CLASS TEXTBOOK SOLUTIONS ALL SUBJECTS – CLICK HERE
NMMS EXAM. PRACTICE TEST SERIES सराव चाचणी – CLICK HERE
ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.
NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)
या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.
NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT
या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.
KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – SCINCE
PART – 2
विषय – विज्ञान
पाठ 6
पाठ 6: प्राण्यांमधील पुनरुत्पादन (Reproduction in Animals)
IMP POINTS –
1. प्रजोत्पादनाचे महत्त्व
• प्रजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पुनरुत्पादन आवश्यक आहे.
• सजीव पिढ्यान् पिढ्या टिकून राहण्यासाठी पुनरुत्पादनाची गरज असते.
2. प्रजननाचे प्रकार
• लैंगिक प्रजनन (Sexual reproduction): नर व मादी युग्मकांच्या संयोगाने नवीन जीव निर्माण होतो.
• अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction): केवळ एकाच पालकापासून नवीन जीव निर्माण होतो.
3. लैंगिक प्रजननातील महत्त्वाचे अवयव
• नर प्रजनन संस्था: वृषण (Testis), रेतवाहिनी (Sperm duct), शिश्न (Penis).
• वृषणांमध्ये शुक्राणू तयार होतात.
• मादी प्रजनन संस्था: अंडाशय (Ovary), अंडवाहिनी (Oviduct), गर्भाशय (Uterus).
• अंडाशयामध्ये बीजांड (Ova) तयार होतात.
4. फलन (Fertilization)
• शुक्राणू आणि बीजांड यांच्या संयोगातून युग्मनजा (Zygote) तयार होतो.
• आंतर फलन (Internal Fertilization): गर्भाशयामध्ये होणारे फलन.
• बाह्य फलन (External Fertilization): पाण्यात होणारे फलन (उदा. मासे, बेडूक).
5. टेस्ट ट्यूब बेबी (Test Tube Baby)
• फलन शरीराबाहेर करून युग्मनजा आईच्या गर्भाशयात ठेवला जातो.
6. गर्भाची वाढ (Development of Embryo)
• युग्मनजा विभाजनाने भ्रूणात रूपांतरित होतो.
• भ्रूण गर्भाशयात विकसित होऊन जन्माला येतो.
तुम्ही काय शिकला ? •
• प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे पुनरुत्पादन आढळते ते म्हणजे :
(i) लैंगिक पुनरुत्पादन
(ii) अलैंगिक पुनरुत्पादन
• पु युग्मक आणि स्त्री युग्मकांच्या संयोगामुळे होणाऱ्या पुनरुत्पादनाला लैंगिक पुनरुत्पादन म्हणतात.
• मादीमधील पुनरुत्पादक इंद्रियामध्ये अंडाशय, अंडवाहिनी व गर्भाशय यांचा समावेश होतो.
• हैड्रामध्ये मुकुलापासून नविन सजीव निर्माण होतात. अशा प्रकारच्या अलैंगिक प्रजननाला मुकुलायन (budding) असे म्हणतात.
• अमिबामध्ये एका अमिबाचे विभाजन होऊन दोन अमिबा निर्माण होतात, अशा प्रकारच्या प्रजननाला द्वि विभाजन असे म्हणतात.
• नर प्रजनन इंद्रियामध्ये वृषण, रेतवाहिनी आणि शिश्नाचा समावेश होतो.
• बीजांड आणि शुक्राणुच्या संयोगाला फलन असे म्हणतात. फलन झालेल्या बीजांडाना युग्मनजा (Zygote) म्हणतात.
• जेव्हा मादीच्या शरिराच्या आतमध्ये फलन होते तेव्हा त्याला आंतर फलन असे म्हणतात. अशाप्रकारचे फलन मानवामध्ये तसेच कोंबडी, गाय आणि कुत्रा यासारख्या प्राण्यां मध्येही पहावयास मिळते. SHEL
• जे फलन मादीच्या शरिराच्या बाहेर घड़ते त्याला बाह्य फलन असे म्हणतात. हे फलन बेडुक, मासा आणि तारा मासा इत्यादी प्राण्यांमध्ये आढळते.
• युग्मनजाचे वारंवार विभाजन होऊन त्याचे भ्रणात (embryo) रुपांतर होते.
• हा भ्रूण गर्भाशयाच्या भित्तीमध्ये पुढील विकास होण्यासाठी रुतून बसतो.
• ज्यावेळी या भ्रूणाचे सर्व अवयव निर्माण होऊन ते स्पष्ट दिसू लागतात तेव्हा भ्रूणाला गर्भ (foetus) म्हणतात.
• मानव, गाय आणि कुत्रा यासारखे प्राणी जे पिलांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी (viviparous animals) म्हणतात.
• कोंबडी, बेडुक, सरडा आणि फुलपाखरु यासारखे प्राणी जे अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी (oviparous animals) म्हणतात.
• अळीमध्ये परिणामकारक बदल होऊन त्यांचे प्रौढ प्राण्यात रुपांतर होते त्या क्रियेला रुपांतरण किंवा अवस्थांतर (metamorphosis) म्हणतात.
• ज्या प्रजननामध्ये केवळ एकाच जनक सजीवाचा समावेश असतो त्याला अलैंगिक प्रजनन म्हणतात.