इयत्ता – दहावी
कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
विषय – समाज विज्ञान
स्वाध्याय
नमूना उत्तरे
12. भारतातील माती
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भराः
1. पर्वत प्रदेशातून नद्यांनी वाहून आणून संचित झालेल्या मातीला गाळाची माती म्हणतात.
2. काळ्या मातीच्या प्रदेशाला रेगुर माती असेही म्हणतात.
3. राजस्थानमध्ये वाळवंटी ही माती दिसून येते.
4. भारतात सर्वात जास्त प्रमाणात सापडणारी माती गाळाची माती
5. नाचणा आणि तेलबिया पिकवण्यासाठी लाल माती योग्य असते.
II. खालील प्रश्नांची उत्तरे समूहात चर्चा करून लिहाः
6. भारतामध्ये दिसून येणारे मातीचे मुख्य प्रकार कोणते?
1) गाळाची
2) काळी माती
3) लाल माती
4) जांब्याची (लॅटरेट) किंवा बाजूकडील माती
5) वाळवंटी माती आणि
6) डोंगरी माती
7. मातीचे संरक्षण म्हणजे काय? त्याच्या विधानांची यादी तयार करा.
उत्तर – मातीची धूप थांबवणे म्हणजेच मातीचे संरक्षण.मातीच्या संरक्षणासोबत सुपीकता राखून ठेवण्यासाठी आवश्यक पद्धतीने मातीचा उपयोग करून सतत पिकांचे उत्पादन घेणे हे मातीचे संवर्धन आहे.
मातीची धूप थांबवण्यासाठी काही योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे
1. बांधाना समांतर नांगरणी करणे.
2. पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांध बांधणे
3. आळीपाळीने वेगवेगळी पिके घेणे.
4. जंगल तोड थांबवणे.
5. जंगल वाढीला प्रोत्साहन देणे.
6. जनावरांच्या चरण्यावर नियंत्रण ठेवणे.
7. पाण्याचा योग्य वापर करणे.
8. धरणे बांधणे इ.
9. मातीची धूप म्हणजे काय ? कारणे स्पष्ट करा.
उत्तर – भूपृष्ठावर दिसून येणाऱ्या वरच्या स्तरावर अनेक नैसर्गिक बदल होतात. या क्रियेला ‘मातीची धूप’ असे म्हणतात.
मातीची धूप होण्याची कारणे :
1.अरण्यांचा नाश
2.जनावरांचे चरणे
3.जुन्या पद्धतीने शेतीची मशागत
4.पाण्याचा जास्त उपयोग उदा. विटा, फरशी, मडके तयार करण्याने वरील माती नाश होऊन निरुपयोगी माती शिल्लक राहते.
9. मातीच्या धुपेचे परिणाम सांगा.
उत्तर – मातीच्या धूपेचे परिणाम : मातीची धूप अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. त्यामध्ये प्रमुख म्हणजे
1. मातीच्या धूपेमुळे नदीत गाळ साचतो, त्यामुळे पूर येण्याची स्थिती निर्माण होते.
2. नद्यांच्या मुखाजवळ गाळ साचल्याने प्रवाह बदलतात.
3. सरोवर तलावांमध्ये गाळ साचून खोली कमी होते
4. मातीच्या धूपेमुळे मातीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते.यामुळे नैसर्गिक झरे आटतात.
भारत हे कृषिप्रधान राष्ट्र असल्यामुळे ज्या धूपेमुळे कृषी उत्पन्नावर वाईट परिणाम होतो व उत्पादनात वाढ करण्यासाठी मातीची धूप थांबवण्याची आवश्यकता आहे
10. हिमालय पर्वतामध्ये कोणत्या प्रकारची माती दिसून येते ?
उत्तर – सेंद्रिय पदार्थ आणि नायट्रोजनने समृद्ध असलेली पर्वतीय माती हिमालयाच्या प्रदेशात आढळते.ही माती कॉफी,चहा,मसाले आणि फळे पिकवण्यासाठी योग्य आहे.