बेळगावी जिल्ह्यातील शाळा कॉलेजना पावसामुळे सुट्टी..
विषय: बेळगाव जिल्ह्यातील सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील खानापुर, बैलहोंगल,कित्तूर, चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये या शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपनिर्देशक,शालेय शिक्षण विभाग,बेळगाव यांनी बेळगांव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शाळेत पाणी भरले आहे आणि अनेक शाळांच्या इमारतींना गळती लागली आहे तसेच पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही.त्यामुळे दिनांक: 25.07.2024 आणि 26.07.2024 या दिवशी बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील सर्व सरकारी,अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना आणि बेळगावी, खानापुर,बैलहोंगल,कित्तुर तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून,बेळगावी, खानापुर, बैलहोंगल आणि कित्तुर तालुक्यांमध्ये अंगणवाड्या व तारीख: 25.07.2024 आणि 26.07.2024 कॉलेजेससाठी दोन दिवसांची सुट्टीची मागणी केली आहे.
आदेश
वरील कारणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 34(एम) नुसार बेळगावी जिल्ह्यातील बेळगावी, खानापूर, बैलहोंगल,कित्तूर, चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील सर्व सरकारी,सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक,उच्च माध्यमिक शाळाना आणि बेळगावी, खानापूर, बैलहोंगल आणि कित्तूर तालुक्यातील पदवीपूर्व कॉलेजना दि. 25.07.2024 आणि 26.07.2024 रोजी सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
उपनिर्देशक,सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगाव उपनिर्देशक, पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव व महिला व बालकल्याण विभाग बेळगाव यांनी हा आदेश काटेकोरपणे अंमलात आणावा व येत्या काही दिवसांत या सुट्टीच्या कालावधी भरून काढण्याचे नियोजन करावे.