कर्नाटकात वाहनांना HSRP नंबर प्लेट HSRP NUMBER PLATES KARNATAKA
माहिती
कर्नाटकने रस्ते सुरक्षा उपायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांचे नंबर प्लेट आता बदलावे लागणार आहेत.सर्व वाहनांच्या सुरक्षेसाठी उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) लावून घेणे आवश्यक आहे.
जवळजवळ वर्षभर मुदत वाढ देऊन HSRP नंबर प्लेट लावून घेण्याच्या सूचना कर्नाटक वाहतूक नियंत्रण विभागांकडून देण्यात आल्या आहेत. फक्त कांहीं दिवस मुदत शिल्लक असून या कालावधीत नंबर प्लेट लावून न घेतल्यास वाहतूक नियंत्रण विभागांकडून दंडात्मक कारवाईची शक्यता आहे.तरी 15 सप्टेंबर 2024 पूर्वी सर्व वाहनधारकांनी आपल्या गाड्यांना एचएसआरपी नंबर फलक बसवून घ्यावे.
HSRP म्हणजेच High-Security Registration Plates (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (फलक) असा अर्थ असून ही एक अति सुरक्षित व आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य असलेली नंबर प्लेट आहे.या नंबर प्लेट मध्ये एक अद्वितीय ओळख क्रमांक,एक होलोग्राम आणि क्रोमियमचे अशोक चक्र यांचा समावेश असून यामुळे वाहन चोरी व वाहनांसंबंधी होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
कर्नाटक सरकारने 01 एप्रिल 2019 पूर्वीच्या कर्नाटकात नोंदणी केलेल्या Two & Three wheelers, Light Motor Vehicles, Passenger Cars, Medium & Heavy Commercial Vehicles, Trailer, Tractor etc. यांना HSRP नंबर प्लेट वापरणे बंधनकारक केले आहे.रस्ते सुरक्षा व वाहनांची आधुनिक पद्धतीने सुरक्षा वाढवण्याच्या हेतूने सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर फलक बसवून घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य करण्याचा मुख्य उद्देश या नंबर प्लेटमधील ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) तंत्रज्ञानाची मदत घेऊन CCTV वापरून चोरी झालेल्या वाहनाचा शोध घेणे सोपे होते.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) वापरल्यानंतर, सर्व वाहन डेटा डिजीटल केला जातो आणि भारतीय वाहतूक विभाग किंवा स्थानिक RTO प्राधिकरणांद्वारे सहजपणे ट्रॅक केला जातो, ज्यामुळे सरकारला बनावट गोष्टी कमी करण्यास मदत होते.कलर कोडेड स्टिकर्स अधिका-यांना वाहनातील इंधनाचा प्रकार आणि वाहन वापराचे वर्ष ओळखण्यास मदत करतात,वाहतूक पोलिसांना कोणते वाहन जुने किंवा नवे आहे आणि ते यापुढे रस्त्यावर वापरले जाऊ शकते का हे ओळखण्यास सुलभ होते.
HSRP कसे मिळवाल?
कर्नाटकातील वाहन धारक वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करून व पेमेंट करून या नंबर प्लेट मिळवू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
1.वाहन नोंदणी कार्ड (Vehicle Registration)
2. पेमेंट (ऑनलाईन)
खर्च किती?
एचएसआरपी आणि जोडणीचा खर्च किती आहे?
– हा खर्च तुमच्या वाहनाची नोंदणी आणि वाहन वर्गावर अवलंबून आहे. फिटमेंट(जोडणी) स्थान निवडताना एकुण खर्चाचा तपशील येईल.
–
01.04.2019 पूर्वी वाहन नोंदणी झालेल्या वाहनांचे HSRP नंबर प्लेट साठी अर्ज खालील पद्धतीने करावा.
Step 1: Visit https://transport.karnataka.gov.in OR www.siam.in and click book HSRP
Step 2: Select Affixation Location (Home/office/Dealer)
Step 3: Select Vehicle Class (Private Vehicle/Commercial Vehicle)
Step 4: Select Fuel Type (Petrol, Diesel, EV, CNG, CNG Petrol, Hybrid +Petrol etc.,)
Step 5: Select Vehicle Type (2W/3W/4W, Heavy/ Other Vehicle/ private (Nontransport)/ Transport
Step 6: Select Vehicle Make
Step 7: Choose Your State: Karnataka
Step 8: Select Dealer/Home Affixation
(ज्या सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन आपल्याला नंबर प्लेट लावून घ्यायची आहे असे जवळचे सर्व्हिस सेंटर किंवा घरी नंबर प्लेट हवी असल्यास घराचा पत्ता अचूक द्या.)
Ex: Maruti/Hyundai/Tata/Honda/Mahindra etc,
Step 9: Fill information-Ensure correct
Step 10: Confirm the OTP received on your mobile number
Step 11: Select Date & Time slot
Step 12: Enter your GST number if registered with GST
Step 13: Make online payment.
Step 14: Provide GST No. if you are registered under GST
Step 15: Order confirmation details will be confirmed through SMS/E-mail.
कर्नाटकात HSRP नंबर प्लेट्सची ओळख रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहन ओळख प्रणालीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाहन मालकांना नवीन नियमांचे त्वरित पालन करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.ज्यामुळे प्रत्येकासाठी सुरक्षित रस्ते वाहतूक आणि वाहनांना अधिक सुरक्षा मिळेल.तरी या नवीन प्रणालीचा सर्वांनी फायदा करून घ्यावा.