Assessment – March 2024
Model Paper – 2
Sub. – MARATHI First Language
इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
I.खालीलपैकी प्रत्येक प्रश्न/अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत.योग्य पर्याय निवडा आणि
प्रश्न क्रमांक 1 ते 20 साठी योग्य पर्यायासह संपूर्ण उत्तर लिहा.
1. ही प्राणी स्त्रोतांपासून मिळणाऱ्या आहार पदार्थांची ही योग्य जोडी आहे.
A. तृणधान्ये – भाजीपाला
B. फळे हिरव्या भाज्या
C. तेलबिया – तृणधान्ये.
D. अंडी – मांस
2. जंक फूड आरोग्यासाठी चांगले नाही.कारण –
A. कमी पौष्टिक घटक
B. यामुळे अनेक आजार सुरू होतात.
C. यामधून विषारी रसायने शरीरात प्रवेश करतात.
D. वरील सर्व
3. सामूहिक निवासस्थानाचा मुख्य उद्देश आहे-
A.वैयक्तिक कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा घरामध्ये उपलब्ध करून देणे.
B.सर्वांसाठी आवश्यक सार्वजनिकरित्या सुविधा पुरविणे.
C.सर्वांसाठी आवश्यक असणारी उद्याने, रुग्णालये निर्माण करणे.
D. वरील सर्व
4.द्रव्याचे कण अत्यंत जवळ जवळ रचलेले असतात अशी पदार्थाची अवस्था –
A. घन
B. द्रव
C. वायू
D. यापैकी नाही
5. हे पाण्यावर तरंगते
A. लोखंड
B. दगड
C. तेल
D. साखर
6. हे एक कृत्रिम मूलद्रव्य आहे.
A. हायड्रोजन
B. प्लुटोनियम
C. ऑक्सिजन
D. सोने
7. माती, हवा हे याचे उदाहरण आहेत.
A. संयुगे
B. मिश्रणे
C. मूलद्रव्य
D. अणू
8. तुम्ही सायकल चालवण्यासाठी वापरता त्या उर्जेचे स्वरूप.
A. रासायनिक ऊर्जा
B. स्नायू ऊर्जा
C. जैविक ऊर्जा
D. विद्युत ऊर्जा
9. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा –
A. यांत्रिक ऊर्जा
B. पवन ऊर्जा.
C. सौर ऊर्जा
D. रासायनिक ऊर्जा
10. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा आहे-
A. बुध
B. गुरु
C. मंगळ
D. पृथ्वी
11. समुद्रकिनाऱ्यापासून दूरवर पसरलेला उंचवट्याचा प्रदेश यामधील पसरलेल्या भूभागाला …….. म्हणतात.
A. उत्तरेकडील मैदाने
B. दख्खनचे पठार.
C. किनारपट्टीचे मैदान.
D. वाळवंटी प्रदेश
12. भारताची राजधानी.
A. दिल्ली.
B. कर्नाटक
C. इटानगर
D. मणिपूर