Children’s Day Marathi Speech बालदिन मराठी छोटी भाषणे

Children’s Day Speech

मनाची निरागसता, 

हृदयाची कोमलता, 
ज्ञानाची उत्सुकता, 
भविष्याची आशा… 
उद्याचा देश घडविणाऱ्या बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा!
 
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज मी बालदिनाबद्दल काही शब्द बोलणार आहे.
     मुलांवर अपार प्रेम करणारे आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सन्मान करण्यासाठी भारतात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.
     पंडित जवाहरलाल नेहरूंचा असा विश्वास होता की मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना प्रेमाने आणि काळजीने वाढवले पाहिजे.
    बालदिन साजरा करण्यामागे मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.



 


आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो- 
     आज 14 नोव्हेबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करत आहोत.हा दिवस आपल्या देशाचे भविष्य असलेल्या बालकांना समर्पित आहे. 
    देशाच्या विकासात लहान मुलांचा खूप मोठा वाटा आहे,‘मुले ही देवाघरची फुले आहेत’ त्यांना प्रेमाने व आपुलकीने जोपासले पाहिजे असे आपल्या देश्याचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुना वाटत असे.म्हणून यादिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बालकांचा गौरव केलं जातो व उत्साहात बालदिन साजरा केला जातो. 
       तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!!


सर्वांना नमस्कार, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज मी बालदिनाबद्दल काही शब्द बोलणार आहे.
        आधुनिक भारताचे शिल्पकार व मुलांवर अपार प्रेम करणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांविषयी खूप आदर होता.मुले ही फुलाप्रमाणे असतात असे ते म्हणायचे.त्यांचे लहान मुलांवर असणाऱ्या अपार प्रेमाची आठवण म्हणून दरवर्षी पंडित नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो.



 

सर्वांना नमस्कार, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज मी बालदिनाबद्दल काही शब्द बोलणार आहे.
        भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो.कारण पंडित नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते.ते तासंतास लहान मुलांमध्ये रमून जायचे.लाहान मुलेही त्याना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणायची.लहान मुले ही फुलाप्रमाणे नाजूक असतात.लहान मुले ही देशाचे भविष्य असून त्याना प्रेमाने व आपुलकीने सांभाळले पाहिजे असे ते म्हणायचे.पंडित नेहरूंच्या लहान मुलांवरील या अपार प्रेमाची आठवण म्हणून 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो.  

Share with your best friend :)